IPL 2024 starts from March 22 1st Match CSK vs RCB : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्या १७ व्या हंगामाचे वेळापत्रक गुरुवारी (२२ फेब्रुवारी) जाहीर करण्यात आले आहे. गतविजेता चेन्नई सुपर किंग्ज संघ पहिल्या सामन्यात खेळणार आहे. हा सामना २२ मार्च रोजी त्याच्या घरच्या मैदानावर एमए चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे. चेन्नईचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी (आरसीबी) होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सध्या फक्त २१ सामन्यांचे वेळापत्रक नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. चेन्नईचा संघ विक्रमी नवव्यांदा आयपीएलच्या मोसमातील पहिला सामना खेळणार आहे. यापूर्वी, संघाने २००९, २०११, २०१२, २०१८, २०१९, २०२०, २०२२ आणि २०२३ मध्ये उद्घाटन सामना खेळला आहे.
दिल्ली कॅपिटल्सचे पहिले दोन सामने विशाखापट्टणम येथे होणार आहेत.

महिला प्रीमियर लीगचा अंतिम सामना दिल्लीत खेळवला जाईल, त्यानंतर लगेचच आयपीएलसाठी मैदान तयार करण्यास वेळ लागेल. त्यामुळे दिल्लीचे पहिले दोन सामने विशाखापट्टणम येथे होणार आहेत. देशात यावर्षी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांमुळे आयपीएलचे पूर्ण वेळापत्रक जाहीर झालेले नाही. आता १७ दिवसांचा कार्यक्रम समोर आला आहे. लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर उर्वरित सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले जाईल.

हेही वाचा – IND vs ENG 4th Test : रांची कसोटीत पाऊस व्यत्यय आणणार? जाणून घ्या पाच दिवसांच्या हवामानाची माहिती

पहिल्या आठवड्यात दोन डबल हेडर सामने –

“दोन आठवड्यांच्या कालावधीत १० शहरांमध्ये २१ सामने खेळले जातील, प्रत्येक संघ किमान तीन सामने आणि जास्तीत जास्त पाच सामने खेळेल,” असे बीसीसीआयने आपल्या निवेदनात म्हटले आहे. पहिल्या आठवड्यात दोन डबल हेडर सामने असतील, ज्याची सुरुवात शनिवारी दुपारी दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स सामन्याने होईल. त्यानंतर संध्याकाळी कोलकाता नाइट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होईल. यानंतर घरचा संघ राजस्थान रॉयल्सचा सामना रविवारी दुपारी (२४ मार्च) जयपूरमध्ये लखनऊ सुपर जायंट्सशी होणार आहे. त्यानंतर दुसरा सामनागुजरात टायटन्सचा आणि पाच वेळा विजेत्या मुंबई इंडियन्सशी होणार आहे.

बीसीसीआयने निवेदनात पुढे म्हटले आहे की, “भारतातील आगामी लोकसभा निवडणुकांशी संबंधित सर्व आवश्यक प्रोटोकॉल आणि सल्ल्यांचे पालन करून बीसीसीआय सरकार आणि सुरक्षा एजन्सीसोबत जवळून काम करेल. अठराव्या लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर, बोर्ड पहिल्या दोन आठवड्यांच्या वेळापत्रकाशी संबंधित कोणत्याही समस्यांचे निराकरण करेल. यानंतर बीसीसीआय मतदानाच्या तारखा लक्षात घेऊन उर्वरित हंगामासाठी वेळापत्रक निश्चित करण्यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांसोबत काम करेल.”

हेही वाचा – Ranji Trophy 2024 : रणजीपासून दूर राहण्यासाठी श्रेयसची पाठदुखीची खोटी तक्रार? एनसीएकडून पूर्णपणे तंदुरुस्त घोषित

आयपीएलचा संपूर्ण हंगाम भारतातच होणार –

आयपीएलचे अध्यक्ष अरुण धुमाळ म्हणाले होते की, संपूर्ण स्पर्धा भारतातच आयोजित केली जाईल. केवळ २००९ मध्ये आयपीएल संपूर्णपणे परदेशात (दक्षिण आफ्रिका) खेळली गेली, तर २०१४ मध्ये, सार्वत्रिक निवडणुकांमुळे, काही सामने यूएईमध्ये खेळले गेले होते. तथापि, २०१९ मध्ये सार्वत्रिक निवडणुका असूनही ही स्पर्धा भारतात आयोजित करण्यात आली होती.