यंदाच्या ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेतील एकेरीच्या अजिंक्यपदावर आपली मोहोर उमटवत रॉजर फेडरर व कॅरोलीन वोझ्नियाकी यांनी आपल्या अथक जिद्दीचे दर्शन घडवले.
ग्रँड स्लॅम स्पर्धाना टेनिस क्षेत्रात अनन्यसाधारण महत्त्व दिले जाते. एकवेळ ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धामध्ये भाग घेता आला नाही तरी चालेल पण ग्रँड स्लॅम स्पर्धामध्ये भाग घ्यायचाच याच हेतूने अनेक व्यावसायिक खेळाडू विविध स्पर्धामधील सहभाग, सराव व दुखापतींवरील उपचार याचे नियोजन करीत असतात. अथक परिश्रम व सातत्यपूर्ण कामगिरी याला जिद्दीची जोड दिली तर ग्रँड स्लॅम विजेतेपद मिळविता येते हेच रॉजर फेडरर व कॅरोलीन वोझ्नियाकी यांनी दाखवून दिले. ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेतील अनुक्रमे पुरुष व महिला एकेरीच्या अजिंक्यपदावर त्यांनी आपली मोहोर नोंदविली.
ऑस्ट्रेलियन स्पर्धा ही ग्रँड स्लॅम स्पर्धाच्या मोसमातील पहिली स्पर्धा असते. तसेच वर्षांच्या सुरुवातीला ही स्पर्धा असल्यामुळे अनेक खेळाडूंना आपल्या शारीरिक क्षमता व तंदुरुस्तीचा अंदाज घेणे सोपे असते. अमेरिकन खुली स्पर्धेनंतर या स्पर्धेपर्यंत चार महिन्यांचा कालावधी असतो. या कालावधीत जागतिक मालिकांची अंतिम स्पर्धा वगळता अन्य फारशा महत्त्वाच्या स्पर्धा नसतात. त्यामुळेच या कालावधीत दुखापतींवरील उपचार घेणे किंवा शस्त्रक्रिया करून घेण्याचे नियोजन खेळाडू करीत असतात. डिसेंबर महिन्यातील ख्रिसमसच्या सुट्टीनंतर १५ दिवसांनी ऑस्ट्रेलियन स्पर्धा असल्यामुळे भक्कम मानसिक तंदुरुस्तीसह खेळाडू या स्पर्धेत सहभागी होतात. कडक उन्हाचा खेळाडूंच्या तंदुरुस्ती व कामगिरीवर झालेला अनिष्ट परिणाम, मान्यवर खेळाडूंच्या दुखापती यामुळे यंदाची ही स्पर्धा अधिक गाजली. या पाश्र्वभूमीवर फेडरर याने शारीरिक व मानसिक तंदुरुस्तीबाबत दाखविलेले सातत्य खरोखरीच सर्वासाठी प्रेरणादायक आहे.
नोवाक जोकोव्हिच, रॅफेल नदाल, स्टॅनिस्लास वॉवरिंक, अँडी मरे व फेडरर यांच्या कामगिरीबाबत उत्सुकता होती. मरे याने दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घेतली होती. साहजिकच विजेतेपदासाठी जोकोव्हिच, नदाल, वॉविरक व फेडरर हे दावेदार मानले जात होते. जोकोव्हिच याला गतवर्षी काही महिने दुखापतीमुळे स्पर्धात्मक टेनिसपासून दूर राहावे लागले होते. तो ऑस्ट्रेलियन स्पर्धेत सहभागी झाला तरीही तो या अव्वल दर्जाच्या स्पर्धेसाठी १०० टक्के तंदुरुस्त नाही याचा प्रत्यय दिसून आला. जर शारीरिक तंदुरुस्ती नसेल तर मानसिक तंदुरुस्तीवर त्याचा परिणाम होतो. जोकोव्हिचला चौथ्या फेरीतच ह्य़ुयोन चुंग या कोरियन खेळाडूने घरचा रस्ता दाखविला. या स्पर्धेतील प्रत्येक सामन्यात जोकोव्हिच याने अनेक वेळा त्रागा केला. त्याचाही अनिष्ट परिणाम त्याच्या खेळावर झाला. ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविणारा चुंग हा पहिला कोरियन खेळाडू आहे. चुंग याच्याप्रमाणेच अमेरिकन खेळाडू टेनिसी सँडग्रेन यानेही उपांत्यपूर्व फेरीपर्यंत धडक मारताना शानदार कामगिरी केली. उपांत्यपूर्व फेरीत चुंग याने सँडग्रेन याच्यावर मात करीत उपांत्य फेरीबाबत अपेक्षा उंचावल्या. तथापि फेडररसारख्या अनुभवी खेळाडूपुढे त्याची डाळ शिजली नाही. पहिला सेट गमावल्यानंतर व दुसऱ्या सेटमध्येही पिछाडी असताना चुंग याने दुखापतीमुळे माघार घेतली.
नदाल याला गेल्या तीन-चार वर्षांमध्ये अनेक वेळा तंदुरुस्तीच्या समस्येने ग्रासले आहे. ऑस्ट्रेलियन स्पर्धेतील उपांत्य फेरीपर्यंत मजल गाठतानाही त्याला या समस्यांचा त्रास होत होता. उपांत्य फेरीत मरीन चिलीच याच्याविरुद्ध पाच सेटपर्यंत त्याला झुंज द्यावी लागली. पाचव्या सेटमध्ये पिछाडीवर असताना त्याने मांडीच्या स्नायूंच्या दुखापतीमुळे सामना सोडून दिला. जोकोव्हिच व नदाल यांच्यासह अनेक खेळाडूंनी मेलबर्नमधील कडक उन्ह व एकूणच वर्षभरातील स्पर्धाच्या कार्यक्रमपत्रिकेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. अनेक ज्येष्ठ खेळाडूंनीही त्यांच्या या टीकेचे समर्थन केले. फेडरर याने मात्र याबाबत कोणतीही तक्रार किंवा नाराजीचा सूर दाखविला नाही. व्यावसायिक टेनिसमध्ये भाग घेतला म्हणजे त्याच्यासोबत येणाऱ्या अडचणीही स्वीकारल्या पाहिजेत असेच त्याचे मत आहे. त्यालाही दीड वर्षांपूर्वी दुखापतीमुळे ग्रासले होते. तरीही त्याने कधीही स्पर्धाच्या कार्यक्रमपत्रिकेबाबत टीका केलेली नाही. तो खऱ्या अर्थाने संयमी खेळाडू आहे. त्याची ही संयमी वृत्तीच विजेतेपदासाठी उपयोगी ठरली. त्याने पाच सेट्सपर्यंत झालेल्या लढतीत चिलीच याच्यावर मात केली. ग्रँड स्लॅम स्पर्धेतील त्याचे हे विसावे अजिंक्यपद आहे. वयाच्या ३६ व्या वर्षीही ग्रँड स्लॅम विजेतेपद मिळविण्यासाठी आवश्यक असणारी शारीरिक तंदुरुस्ती, क्षमता व मनोधैर्य त्याच्याकडे आहे हे नवोदित खेळाडूंसाठी प्रेरणादायक आहे.
महिलांमध्ये विजेतेपदाच्या दावेदारांपैकी सेरेना विल्यम्स हिने या स्पर्धेतून माघार घेतली होती. गतवर्षी सप्टेंबरमध्ये कन्यारत्न झाल्यानंतर खरं तर ऑस्ट्रेलियन स्पर्धेद्वारे टेनिसमध्ये पुनरागमन करण्याचा तिचा निर्धार होता. तथापि ग्रँड स्लॅम स्पर्धेत केवळ सहभागी न होता सर्वोत्तम कामगिरी करण्याचीच तिची जिद्द होती व त्यासाठी आवश्यक असणारी तंदुरुस्ती नाही हे लक्षात आल्यानंतर तिने या स्पर्धेत भाग घेतला नाही. तिची बहीण व्हीनस, तसेच उत्तेजकामुळे बंदीच्या कारवाईस सामोरे जावे लागलेली मारिया शारापोवा यांच्याकडून चांगल्या यशाची अपेक्षा होती. तथापि त्यांना निराशाजनक कामगिरीस सामोरे जावे लागले. जागतिक क्रमवारीतील अग्रस्थानावर असलेली सिमोना हॅलेप, द्वितीय मानांकित वोझ्नियाकी, चौथी मानांकित एलिना स्वितोलिना, माजी विजेती अँजेलिक कर्बर यांच्यात विजेतेपदासाठी चुरस होती. बेल्जियमच्या एलिस मर्टन्स हिने स्वितोलिना हिला उपांत्यपूर्व फेरीतच गारद केले. मर्टन्सची अनपेक्षित विजयाची मालिका खंडित करण्यात वोझ्नियाकी हिला अडचण आली नाही. वोझ्नियाकी हिला अनेक वेळा ग्रँड स्लॅम स्पर्धाच्या विजेतेपदाने हुलकावणी दिली आहे. तथापि तिने कधीही हार मानली नाही. त्यामुळेच अंतिम सामन्यात हॅलेपविरुद्ध तिला विजयश्री खेचून आणता आली. ग्रँड स्लॅम विजेतेपदाचे स्वप्न तिला साकार करता आले. अंतिम सामन्यात दोन्ही खेळाडूंना वैद्यकीय मदत घ्यावी लागली होती.
रोहन बोपण्णा याने मिश्र दुहेरीत मिळविलेले उपविजेतेपद वगळता अन्य भारतीय खेळाडूंना फारसा प्रभाव दाखविता आला नाही. बोपण्णा याने गतवर्षी गॅब्रिएला दोब्रावस्की हिच्या साथीत फ्रेंच स्पर्धेतील मिश्रदुहेरीत अजिंक्यपद मिळविले होते. यंदा तो हंगेरीच्या तिमिआ बाबोसच्या साथीत उतरला आहे. या जोडीला ऑस्ट्रेलियन स्पर्धेतील विजेतेपदाने हुलकावणी दिली. दोब्रावस्की व मॅट पेव्हिक यांनी त्यांना अंतिम लढतीत पराभूत केले. खरं तर पहिला सेट घेत बोपण्णा व बाबोस यांनी चांगली सुरुवात केली होती. तथापि त्यांना हार मानावी लागली. तिसऱ्या सेटमध्ये त्यांनी चिवट झुंज दिली. मात्र त्यांना अजिंक्यपदावर मोहोर उमटवता आली नाही. महत्त्वाच्या क्षणी त्यांना परतीचे फटके, व्हॉलीज, सव्र्हिस यावर अपेक्षेइतके नियंत्रण ठेवता आले नाही. त्याचाच पुरेपूर फायदा घेत दाब्रोवस्की व पेव्हिक यांनी सव्र्हिस, परतीचे फटके, व्हॉलीज व नेटजवळील प्लेसिंग यावर सुरेख नियंत्रण ठेवीत विजयश्री खेचून आणली.
कडक उन्हामुळे काही नामांकित खेळाडूंचे सामने आच्छादित असलेल्या रॉड लिव्हर स्टेडियमवर ठेवण्यात आले होते. त्याबाबतही संयोजकांवर खेळाडू व प्रशिक्षकांनी टीका केली. ग्रँड स्लॅमचे सामने पाहण्यासाठी येणाऱ्या प्रेक्षकांना खेळाडूंचे कौशल्य पाहिजे असते. अव्वल खेळाडूंनी उन्हामुळे किंवा दुखापतीमुळे सामने सुरू असताना माघार घेतली तर त्यांची निराशा होते. याबाबत संयोजकांनी गांभीर्याने विचार केला पाहिजे. खेळाडूंना उन्हाचा त्रास होणार नाही व प्रेक्षकांचा अपेक्षाभंग होणार नाही या दृष्टीने सामन्यांची कार्यक्रमपत्रिका निश्चित केली पाहिजे. त्याचप्रमाणे लागोपाठच्या स्पर्धामुळे खेळाडूंच्या तंदुरुस्तीवर अनिष्ट परिणाम होत असेल तर वर्षभरातील स्पर्धाचे नियोजन करताना व्यावसायिक टेनिसपटूंच्या संघटनेने योग्य काळजी घेतली पाहिजे. टेनिसचा निखळ आनंद खेळाडू व प्रेक्षकांना मिळाला पाहिजे. खेळाडूंनी खेळ हे उपजीविकेचे साधन म्हणून स्वीकारले असले तरीही खेळाडूंना काही भावना असतात. त्यांनाही काही वेळा आपल्या देशाकरिता खेळावे लागत असते हेही लक्षात घेतले पाहिजे. तरच टेनिस क्षेत्रातील गोडवा कायम राहील.
मिलिंद ढमढेरे – response.lokprabha@expressindia.com
सौजन्य – लोकप्रभा