Afghanistan T20 squad announced : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन टी-२० सामन्यांसाठी अफगाणिस्तान संघाची घोषणा करण्यात आली आहे. इब्राहिम झद्रानच्या नेतृत्वाखालील संघात एकूण १९ खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. या संघात आयपीएलमध्ये शानदार कामगिरी करणाऱ्या अनेक खेळाडूंचा समावेश आहे. राशिद खान आणि रहमानउल्ला गुरबाज हे त्यापैकीच एक आहेत. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील टी-२० मालिका ११ जानेवारी ते १७ जानेवारी दरम्यान खेळवली जाणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

टी-२० मालिकेतील पहिला सामना ११ जानेवारीला मोहालीत होणार आहे. दुसरा सामना १४ जानेवारीला इंदूरमध्ये तर तिसरा सामना १७ जानेवारीला बंगळुरूमध्ये खेळवला जाईल. या मालिकेसाठी अफगाणिस्तान संघात दोन बदल करण्यात आले आहेत. मुजीब उर रहमान नुकत्याच यूएईविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत संघाचा भाग नव्हता. तो पुनरागमन करत आहे. इकराम अलीखिल हा यूएईविरुद्ध राखीव खेळाडू होता, तो आता मुख्य संघात बॅकअप यष्टीरक्षक-फलंदाज म्हणून आहे.

भारताविरुद्धच्या मालिकेसाठी अफगाणिस्तान संघ –

इब्राहिम झद्रान (कर्णधार), रहमानउल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), इकराम अलीखिल (यष्टीरक्षक), हजरतुल्ला झाझाई, रहमत शाह, नजीबुल्ला झदरन, मोहम्मद नबी, करीम जनात, अजमोउल्ला ओमरझाई, शरफुद्दीन अश्रफ, मुजीब उर रहमान, फजलहक फारुकी, फरीद अहमद, नवीन उल हक, नूर अहमद, मोहम्मद सलीम, कैश अहमद, गुलबदिन नायब, राशिद खान.

हेही वाचा – AUS vs PAK : “लोकांनी मला एक…”, कसोटी आणि वनडेमधील निवृत्तीनंतर डेव्हिड वॉर्नरचे मोठे विधान

राशिद खान खेळणे कठीण –

अफगाणिस्तान संघाचा नियमित कर्णधार राशिद खानचा संघात समावेश करण्यात आला आहे, परंतु तो कोणत्याही सामन्यात खेळणार नाही, असे अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. नुकतीच त्याच्या पाठीवर शस्त्रक्रिया झाली असून तो या दुखापतीतून सावरत आहे. दरम्यान, इब्राहिम झद्रान संघाची धुरा सांभाळेल, ज्याने अलीकडेच अफगाणिस्तानला शारजाह येथे यूएई विरुद्ध २-१ने मालिका जिंकून दिली.

हेही वाचा – David Warner : ‘…म्हणून माझी आई डेव्हिडला ‘शैतान’ म्हणते’, वॉर्नरच्या निवृत्तीनंतर ऑस्ट्रेलियन खेळाडूचा खुलासा

रोहित-कोहली भारतीय संघात पुनरागमन करू शकतात –

या मालिकेसाठी विराट कोहली आणि रोहित शर्मा भारतीय संघात पुनरागमन करू शकतात. या दोन्ही दिग्गज खेळाडूंनी २०२२ टी-२० विश्वचषक उपांत्य फेरीनंतर देशासाठी एकही टी-२० सामना खेळलेला नाही. या वर्षी जूनमध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषकाला डोळ्यासमोर ठेवून कोहली आणि रोहितचा टी-२० संघात समावेश केला जाऊ शकतो.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The afghanistan cricket board has announced its 19 member squad for the t20i series against india vbm