Bangladesh vs Sri Lanka, World Cup 2023: एकदिवसीय विश्वचषक २०२३च्या ३८व्या सामन्यात प्रचंड गोंधळ झाला. उपांत्य फेरीच्या शर्यतीच्या दृष्टीने हा सामना फारसा महत्त्वाचा नव्हता. कारण, बांगलादेशचा संघ आधीच उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला होता. त्याचवेळी श्रीलंकेची अंतिम चारमध्ये पोहोचण्याची शक्यता नगण्य होती, असे असूनही हा सामना खूप खास होता त्यामुळे तो क्रिकेटप्रेमींच्या दीर्घकाळ स्मरणात राहील. या सामन्यात खिलाडूवृत्तीला ठेच पोहोचल्याचे दिसते. श्रीलंकेचा अनुभवी फलंदाज अँजेलो मॅथ्यूज याच्या टाईम आऊटपासून सुरू झालेला हाय व्होल्टेज ड्रामा संपूर्ण सामन्यादरम्यान पाहायला मिळाला. सामन्यानंतर दोन्ही संघांच्या खेळाडूंनी हातमिळवणी करण्यास देखील नकार दिला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या सामन्यातील नाट्याची सुरुवात श्रीलंकेच्या अँजेलो मॅथ्यूजने वेळ घेतल्याने झाली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टाइमआउट होणारा तो पहिला खेळाडू ठरला. बांगलादेशचा कर्णधार शाकिब-अल-हसनने तो वेळकाढूपणा करत असल्याचे अपील करत त्याला बाद करण्याचे आवाहन केले होते. २५व्या षटकात मॅथ्यूज सदीरा समरविक्रमा बाद झाल्यानंतर फलंदाजीला आला, परंतु त्याच्या हेल्मेटचा पट्टा तुटलेला आढळून आला आणि गोलंदाज शाकिब-अल-हसनचा चेंडू खेळण्याआधी लगेचच नवीन हेल्मेट घेण्याचा संकेत दिला. दुसरा खेळाडू हेल्मेट घेऊन येत होता पण त्याला थोडा वेळ लागला. यामुळे बांगलादेशने ‘टाईम आऊट’ करण्याचे आवाहन केले आणि लगेचच पंचांनी त्याला बाद दिले.

मॅथ्यूस पंच मारायस इरास्मस आणि रिचर्ड इलिंगवर्थ यांच्याशी खूप चर्चा करताना दिसला, त्याने स्पष्ट केले की त्याच्या हेल्मेटच्या पट्ट्यामध्ये काही समस्या आहे. त्याने शाकिबशीही बोलण्याचा प्रयत्न केला मात्र, त्याने आपले अपील मागे घेतले नाही आणि श्रीलंकन ​​क्रिकेटपटूला मैदान सोडण्यास भाग पाडले. यानंतर चिडलेल्या मॅथ्यूजने डगआऊटकडे जात सीमारेषेवर आपले हेल्मेट फेकले.

हेही वाचा: AUS vs AFG: सेमीफायनलची चुरस वाढली! ‘करो किंवा मरो’ सामन्यात अफगाणिस्तान करणार ऑस्ट्रेलियाशी दोन हात, जाणून घ्या प्लेईंग-११

हा बाद इथेच संपला नाही. अँजेलो मॅथ्यूजने शाकिब-अल-हसनला बाद करून त्याला वेळेची आठवण करून देत हातातील घड्याळाकडे इशारा केला आणि मैदान सोडण्याचे संकेत दिले. २०२३च्या विश्वचषकासाठी आयसीसीच्या नियमांनुसार, “विकेट पडल्यानंतर किंवा फलंदाजाच्या निवृत्तीनंतर, येणार्‍या फलंदाजाने दोन मिनिटांत चेंडू खेळण्यासाठी तयार असणे आवश्यक आहे. तसे न झाल्यास, फलंदाजाला टाईम आऊट घोषित केले जाऊ शकते.”

सामन्यानंतर दोन्ही संघांच्या खेळाडूंनी हस्तांदोलन केले नाही

सामना संपल्यानंतर दोन्ही संघातील खेळाडूंनी एकमेकांच्या संघातील खेळाडूंशी हस्तांदोलन केले नाही. पराभवानंतर श्रीलंकेचे खेळाडू लगेचच ड्रेसिंग रूममध्ये परतले. त्याच वेळी, श्रीलंकेचे प्रशिक्षक आणि कर्मचारी निश्चितपणे बांगलादेशी खेळाडू आणि कर्मचारी यांच्याशी हस्तांदोलन करत होते. श्रीलंकेचे मुख्य प्रशिक्षक ख्रिस सिल्व्हरवूड हे बांगलादेशचे गोलंदाजी प्रशिक्षक अॅलन डोनाल्ड यांच्याशी बोलताना दिसले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The argument did not stop even after the match let alone shake hands the players did not even look at each other video viral avw