अॅशेस मालिकेत सलग दुसऱया कसोटीतही इंग्लंडचा ऑस्ट्रेलियाकडून दणदणीत पराभव झाला आहे. ऑस्ट्रेलियाने इंग्लंडसमोर विजयासाठी ५३१ धावांचे आव्हान ठेवल्यानंतर इंग्लंडचा दुसरा डाव ३१२ धावांत संपुष्टात आला आणि ऑस्ट्रेलियाने २१८ धावांनी विजय मिळविला.
अॅशेस कसोटी मालिकेत आता ऑस्ट्रेलियाकडे २-० अशी आघाडी आहे.
काल रविवार चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडची सहा बाद २४७ अशी अवस्था झाली होती. पाचव्या म्हणजेच आजच्या दिवशी इंग्लंडला विजयासाठी २८४ धावांची गरज होती. त्यामुळे दुसरी कसोटी अनिर्णीत राखण्यासाठी इंग्लंडच्या अखेरच्या चार फलंदाजांना सोमवारचा पूर्ण दिवस खेळून काढायला लागणार होता. परंतु, ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी सामना जिंकायचा इरादा पक्का केला होता. त्यानुसार स्टुअर्ट ब्रॉडला सिडलने २९ धावांवर बाद केले. त्यानंतर प्रायरने तळाच्या फलंदाजांच्या साथीने अर्धशतक ठोकले पण, संघाचा पराभव काही टळू शकला नाही. ऑस्ट्रेलियाकडून सिडलने ४ तर, हॅरिसने ३ विकेट्स मिळविल्या. सामन्याच्या दोन्हा डावांत एकूण ८ विकेट्स घेणाऱया मिचेल जॉन्सनला सामनाविराचा किताब देण्यात आला.

Story img Loader