बरखास्त भारतीय बॉक्सिंग महासंघाने आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संघटनेचा राग ओढवून घेतला आहे. दोन संघटनांच्या या वादात भारतीय बॉक्सिंगपटूंचे मात्र नुकसान झाले आहे. आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संघटनेच्या धोरणानुसार वर्तन करण्यास नकार देण्याचा फटका भारतीय बॉक्सिंगपटूंना बसला आहे.
आंतरराष्ट्रीय संघटनेच्या अनुमतीविना भारतीय बॉक्सिंगपटूंच्या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमाची माहिती जाहीर करण्याच्या भारतीय बॉक्सिंग महासंघाच्या कृतीने आंतररराष्ट्रीय महासंघ नाराज आहे.
या नाराजीमुळे भारतीय संघाचा क्युबा येथे होणारा प्रशिक्षण आणि स्पर्धा दौरा रद्द करण्यात आला आहे. २७ मे ते १७ जून या कालावधीत हा दौरा होणार होता.
२० भारतीय बॉक्सिंगपटू या दौऱ्यात सहभागी होणार होते. मात्र आंतरराष्ट्रीय संघटनेने मान्यता न दिल्याने भारतीय बॉक्सिंगपटूंना सहभागी होता येणार नाही. मात्र ही परवानगी नाकारण्याचे कारण आंतरराष्ट्रीय संघटनेने स्पष्ट केलेले नाही. बरखास्त महासंघ आंतरराष्ट्रीय संघटनेच्या परवानगीशिवाय भविष्यातील दौऱ्यांची माहिती कशी जाहीर करू शकतो, असा सवाल आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संघटनेने केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दोन संघटनांच्या या वादामध्ये भारतीय बॉक्सिंगपटूंची ससेहोलपट झाली आहे. क्युबा येथे होणाऱ्या अभ्यास दौऱ्यात त्यांनी सामील होता येणार नाही.

दोन संघटनांच्या या वादामध्ये भारतीय बॉक्सिंगपटूंची ससेहोलपट झाली आहे. क्युबा येथे होणाऱ्या अभ्यास दौऱ्यात त्यांनी सामील होता येणार नाही.