सामनेनिश्चिती प्रकरणाने (मॅचफिक्सिंग) संपूर्ण क्रीडाविश्व पोखरले जात असल्याचे काही घटनांवरून दिसून येत आहे. इंग्लिश प्रीमिअर लीगमधील सामने निश्चित केल्याप्रकरणी काही खेळाडू आणि सट्टेबाजांना नुकतीच अटक करण्यात आली होती. त्यांच्या चौकशीतून अनेक धक्कादायक बाबी समोर येऊ लागल्या आहेत. फिफा विश्वचषकाच्या पात्रता फेरीतील काही सामने निश्चित केल्याची खळबळजनक कबुली सट्टेबाजांनी या चौकशीत दिली आहे.
युरोप आणि ऑस्ट्रेलियातील काही सामने निश्चित असल्याचे चौकशीतून समोर आले आहे. ‘‘स्कॉटलंड, ऑस्ट्रेलिया, आर्यलड आणि युरोपमधील काही सामने मी निश्चित केले होते. फिफा विश्वचषकाच्या पात्रता फेरीत सहभागी झालेल्या आफ्रिकन देशांमधील एका संपूर्ण संघावर माझे नियंत्रण होते,’’ असे ध्वनिमुद्रित केलेल्या सट्टेबाजांच्या संभाषणातून समोर येत आहे.
सट्टेबाज म्हणतो, ‘‘बेल्जियम आणि फ्रान्स संघामध्येही आमचा दबदबा आहे. बऱ्याच देशांत खेळाडूंना कमी मानधन दिले जाते. जर्मनीतील खेळाडूंना गलेगठ्ठ मोबदला मिळत असतो. फ्रान्समध्ये मध्यम स्वरूपाचे मानधन मिळते.’’ अनधिकृत सट्टेबाजी रॅकेटमध्ये समावेश असलेल्या दोन व्यक्तींच्या संभाषणातून ही खळबळजनक माहिती पुढे आली आहे. सिंगापूरस्थित चान संकरन (३३ वर्षे) आणि कृष्णा संजय गणेशन या ब्रिटन आणि सिंगापूरचे नागरिकत्व असलेल्या ४३ वर्षीय व्यक्तीमध्ये सामने निश्चित करण्याबाबत सारखे संभाषण होत होते, असे ब्रिटनमधील राष्ट्रीय गुन्हे संस्थेने (एनसीए) म्हटले आहे. या दोघांना १० वर्षांच्या कैदेची शिक्षा होऊ शकते, असे एनसीएने म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा