आजकाल विविध डेटिंग साईट्सचा वापर करून जोडीदार शोधण्यावर तरुणाईचा जास्त भर आहे. विशेषत: युरोपीयन देशांमध्ये ही संस्कृती जास्त जोरावर आहे. तेखील तरुण मुले-मुली किंवा जोडीदाराच्या शोधात असलेल्या बहुतेक व्यक्ती टिंडरसारख्या डेटिंग साईट्सचा वापर करतात. याचाच फायदा घेत युनायडेट किंग्डममधील एका स्थानिक क्रिकेट क्लबने घेतला आहे. नवीन खेळाडूंना आकर्षित करण्यासाठी या क्रिकेट क्लबने चक्क एका महिलेच्या नावाने टिंडर या डेंटिंग साईटवर एक अकाउंट सुरू केले आहे.

सरेमधील (यूके) एंगलफील्ड ग्रीन क्रिकेट क्लबने एक ३६ वर्षीय महिला म्हणून आपले टिंडर अकाउंट उघडले आहे. या टिंडर अकाउंटसाठी क्लबने प्रोफाईल चित्र आणि थोडक्यात माहितीदेखील दिली आहे. या माहितीच्यामागे सुरू असलेला सामन्याचे छायाचित्र लावण्यात आले आहे.

‘जॉर्ज, ३६, एंगलफिल्ड क्रिकेट क्लबसाठी नवीन खेळाडू शोधत आहे, अशी ओळही त्याठिकाणी देण्यात आली आहे. ज्या इच्छित उमेदवारांना क्लबमध्ये यायचे आहे त्यांच्यासाठी क्लबचा ईमेल आयडी (egcchub@gmail.com) ट्विटर आयडी (@Egcc1) आणि इन्स्टाग्राम आयडीचे (englefieldgreencc) तपशीलही देण्यात आले आहेत.

दॅट्ससोव्हिलेज (@ThatsSoVillage) या ट्विटर पेजवर क्रिकेट क्लबच्या या टिंडर अकाउंटची माहिती उघड करण्यात आली आहे. त्याला सोशल मीडिया वापरकर्त्यांनी जोरदार प्रतिसाद दिला आहे. लोकांनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका क्रिकेट फॅनने लिहिले आहे की, ‘तुमचे वय जर ३६असेल तर तुमचा संघ खरोखर तीशीपेक्षा जास्त वय असलेल्या पुरुषांनी भरलेला दिसेल. असे झाले तर मला स्लिपमध्ये क्षेत्ररक्षण करणारे खेळाडू बघायला नक्की आवडेल!’

Story img Loader