India vs Australia 3rd T20: २०२३ विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताचा पराभव करणारा ऑस्ट्रेलियन संघ पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात अपयशी ठरला आहे. एकदिवसीय विश्वचषकानंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात टी-२० मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. आता तिसरा टी-२० आज गुवाहाटी येथे खेळवला जाणार आहे. याआधी कांगारूंनी आपल्या संघात ६ मोठे बदल केले आहेत. अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलियाची आजची प्लेइंग इलेव्हन कशी असेल, ते जाणून घ्या.
भारताविरुद्ध सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेदरम्यान ऑस्ट्रेलियाने आपल्या संघात मोठे बदल केले आहेत. गुवाहाटीमधील सामन्यापूर्वी स्टीव्ह स्मिथ-ग्लेन मॅक्सवेलसह सहा ऑस्ट्रेलियन खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे, हे सर्व खेळाडू ऑस्ट्रेलियन विश्वचषक संघाचा भाग होते. विश्वचषक २०२३ संपल्यानंतर या खेळाडूंचा पहिल्या दोन टी-२० सामन्यांमध्ये समावेश होता. स्टीव्ह स्मिथ आणि अॅडम झाम्पा मायदेशी परतले आहेत, तर ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉयनिस, जोश इंग्लिश आणि शॉन अॅबॉट आज ऑस्ट्रेलियाला जाणार आहेत.
भारताविरुद्धच्या उर्वरित तीन सामन्यांसाठी यष्टिरक्षक-फलंदाज जोश फिलिप, बेन मॅकडरमॉट, बेन द्वारशुइस आणि फिरकीपटू ख्रिस ग्रीन यांचा संघात समावेश करण्यात आला आहे. फिलिप्स आणि मॅकडरमॉट हे आधीच संघाबरोबर होते, त्यामुळे ते आज गुवाहाटी येथे होणाऱ्या तिसऱ्या टी-२० सामन्यासाठी उपलब्ध असतील. इतर तीन खेळाडू रायपूरमध्ये होणाऱ्या चौथ्या सामन्यापूर्वी संघात सामील होतील. मायदेशी परतणाऱ्या खेळाडूंच्या बदलीची घोषणा ऑस्ट्रेलियन निवडकर्त्यांनी केली आहे.
काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियाच्या विश्वचषक अंतिम विजयात मोलाची भूमिका बजावणारा ट्रॅविस हेड वगळता उर्वरित टी-२० मालिकेसाठी भारतात राहणारा विश्वचषक विजेत्या संघातील तो एकमेव खेळाडू आहे. मात्र, हेडने या मालिकेत तो अद्याप एकही सामना खेळलेला नाही.
उर्वरित तीन टी-२० सामन्यांसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ
भारताविरुद्धच्या उर्वरित तीन टी-२० मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाच्या या संघावर एक नजर टाकली की कळते की, हा युवा खेळाडूंचा संघ आहे. स्मिथ आणि मॅक्सवेल गेल्यानंतरही हा संघ कमकुवत दिसत नाहीये. त्यामुळे टीम इंडियाला कितपत टक्कर देऊ शकेल, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
मॅथ्यू वेड (कर्णधार), जेसन बेहरेनडॉर्फ, टीम डेव्हिड, बेन ड्वार्शुईस, नॅथन एलिस, ख्रिस ग्रीन, आरोन हार्डी, ट्रॅव्हिस हेड, बेन मॅकडॉर्मॉट, जोश फिलिप्स, तन्वीर संघा. मॅट शॉर्ट, केन रिचर्डसन