Maharashtra Premier League 2023: महाराष्ट्र प्रीमियर लीगचा (एमपीएल) पहिला हंगाम आजपासून (१५ जून) सुरू होणार आहे. तब्बल सहा संघ प्रतिष्ठित ट्रॉफी जिंकण्यासाठी एकमेकांशी भिडतील. या स्पर्धेत एकूण १९ सामने खेळले जातील आणि साखळी टप्प्यात राऊंड-रॉबिन फॉरमॅटचा अवलंब केला जाणार आहे. पहिल्या हंगामातील पहिला सामना आज एमसीएच्या पुणे येथील स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्यात पुणे बाप्पा आणि कोल्हापूर टस्कर्स संघ आमनेसामने असणार आहेत. या सामन्याला संध्याकाळी आठला सुरुवात होईल.
या सामन्यात पुणे बाप्पा संघाचे नेतृत्व रुतुराज गायकवाड असणार आहे. त्याचबरोबर दुसरा पुणेरी बॉय केदार जाधव कोल्हापूर टस्कर्स संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. त्यामुळे पहिल्या सामन्यात कोण बाजी मारणार याबाबत दोन्ही संघांच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. त्याचबरोबर राहुल त्रिपाठी आणि राजवर्धन हंगरगेकर या आयपीएलमधील काही अव्वल परफॉर्मर्स लीगमध्ये खेळताना दिसणार आहेत.
कोल्हापूर टस्कर्स संघ –
केदार जाधव (कर्णधार), नौशाद शेख, कीर्तिराज वाडेकर, मनोज यादव, विद्या तिवारी, आत्मा पोरे, अक्षय दरेकर, श्रेयश चव्हाण, सिद्धार्थ म्हात्रे, तरणजीत धिल्लों, निहाल तुसामद, रवी चौधरी, अंकित बावणे, सचिन धस, निखिल मदहोद, सचिन धस, निखिल मडके.
पुणेरी बाप्पा संघ –
ऋतुराज गायकवाड (कर्णधार), रोहन दामले, प्रशांत कोरे, अद्वय शिधये, अझहर अन्सारी, शुभंकर हर्डीकर, वैभव चौघुले, रोशन वाघसरे, पियुष साळवी, आदित्य डवरे, सौरभ दिघे, शुभम कोठारी, सोहन जमाले, साईश दिघे, सचिन भोळे, सचिन भोळे, अशोक चव्हाण , पवन शहा, श्रीपाद निंबाळकर, हर्ष संघवी, दिग्विजय पाटील, अजय बोरुडे, आदर्श बोथरा, भूषण नावंदे, कुंश दीक्षित, हर्ष ओसवाल, सूरज शिंदे.
हेही वाचा – Team India: रोहित शर्मानंतर भारतीय कसोटी संघाचा कर्णधार कोण? रहाणेशिवाय ‘हे’ चार खेळाडू प्रबळ दावेदार
सामना कुठे आणि कसा पाहता येणार?
दरम्यान, हे सर्व सामने एमसीए क्रिकेट स्टेडियम, गहुंजे, पुणे येथे होणार आहेत. तसेच, प्रेक्षक स्टेडियमवर लीगच्या पहिल्या सत्रातील सामने विनामूल्य पाहू शकतील. क्रिकेटप्रेमींना मोबाईल अॅपच्या माध्यमातून महाराष्ट्र प्रीमियर लीग सामन्याचा आनंद घेता येणार आहे. फॅनकोड सामना थेट प्रवाहित करेल. तसेच सामन्याचे थेट प्रक्षेपण डीडी स्पोर्ट्सवर केले जाईल.