महिला आयपीएलचा पहिला हंगाम ४ मार्चपासून सुरू होत आहे. पहिल्या हंगामातील पहिल्या सामन्यात मुकेश अंबानींचा मुंबई आणि गौतम अंबानींचा अहमदाबाद संघ आमनेसामने असतील. महिला आयपीएलचे सर्व सामने मुंबईत खेळवले जाणार असले, तरी ते वानखेडेवर होणार नाहीत.
बीसीसीआय महिला प्रीमियर लीगची धमाकेदार सुरुवात करण्याचा विचार करत आहे. क्रिकबझच्या वृत्तानुसार, प्रसारित करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार, पहिला सामना मुंबई आणि अहमदाबाद संघांमध्ये शनिवार ४ मार्च रोजी होणार आहे. देशातील दोन मोठ्या उद्योगपतींच्या संघात हा सामना होणार आहे. एकीकडे मुंबई संघाचे मालक मुकेश अंबानी आहे, तर दुसरीकडे अहमदाबाद संघाचे मालक गौतम अदानी आहेत.
रिपोर्टनुसार, संपूर्ण महिला प्रीमियर लीगचे आयोजन मुंबईतील दोन मैदानांवर केले जाईल. पाच संघांची ही स्पर्धा ब्रेबॉर्न स्टेडियम आणि डीवाय पाटील स्टेडियमवर होणार आहे. तसेच हे सामने डबल हेडरमध्य खेळवले जातील. परंतु या स्पर्धेचा कोणताही सामना मुंबईतील सर्वात मोठे स्टेडियम वानखेडेवर होणार नाही. खरं तर, पुरुषांची आयपीएल आणि भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया एकदिवसीय मालिका पाहता महिला प्रीमियर लीगचे सामने वानखेडेवर खेळवला जाणार नाहीत.
हेही वाचा – Jay Shah vs Najam Sethi: आशिया कप २०२३ साठी टीम इंडिया पाकिस्तानात जाणार? आज होणार निर्णय
वेळापत्रकानुसार, गट टप्प्यातील सामन्यांनंतर जो संघ गुणतालिकेत अव्वल असेल तो थेट अंतिम फेरीत प्रवेश करेल. दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावरील संघामध्ये एकमेव एलिमिनेटर असेल तर गुणतालिकेतील तळाचे २ संघ बाहेर पडतील. एलिमिनेटर सामन्यातील विजेता दुसरा अंतिम फेरीत पोहोचणारा संघ असेल. या स्पर्धेत एकूण २२ सामने खेळवले जाणार आहेत.
स्पर्धेच्या मधोमध ५ दिवस असे असतील, जेव्हा कोणतेही सामने होणार नाहीत. १७ ते १८ मार्च रोजी कोणतेही सामने होणार नाहीत. ग्रुप स्टेजचे सर्व सामने खेळल्यानंतर २ दिवसांचा ब्रेक असेल. एलिमेंटरचा सामना २४ मार्च रोजी होणार आहे. यानंतर २५ तारखेला ब्रेक असेल. त्यानंतर २६ तारखेला स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जाईल.
महिला प्रीमियर लीग २०२३चे संघ –
१- अहमदाबाद महिला आयपीएल संघ<br>मालक: अदानी स्पोर्ट्सलाइन प्रायव्हेट लिमिटेड
किंमत: १२८९ कोटी
२- मुंबई महिला आयपीएल संघ
मालक: इंडियाविन स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड
किंमत: ९१२.९९कोटी
३- रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू महिला आयपीएल संघ
मालक: रॉयल चॅलेंजर्स स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड
किंमत: ९०१ कोटी
४- दिल्ली महिला आयपीएल संघ
मालक: जेएसडब्लयू जीएमआर क्रिकेट प्रायव्हेट लिमिटेड
किंमत: ८१० कोटी
५- लखनऊ महिला आयपीएल संघ
मालक: कॅप्री ग्लोबल होल्डिंग्स प्रायव्हेट लिमिटेड
किंमत: ७५७ कोटी