भारत आणि बांगलादेश यांच्यातील तीन एकदिवसीय मालिकेला रविवारी (४ डिसेंबर) ढाका येथे सुरुवात होणार आहे. न्यूझीलंडमधील मालिका संपल्यानंतर टीम इंडिया नव्या तयारीसह बांगलादेशविरुद्ध मैदानात उतरणार आहे. कर्णधार रोहित शर्मा, माजी कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार केएल राहुल संघात पुनरागमन करत आहेत. न्यूझीलंडमध्ये संघाचे नेतृत्व करणारा शिखर धवनही संघात आहे.
भारतीय संघ सात वर्षांनंतर बांगलादेशमध्ये एकदिवसीय मालिका खेळणार आहे. शेवटच्या वेळी २०१५ मध्ये तीन एकदिवसीय मालिकेत १-२ नेराभव पत्करावा लागला होता. तेव्हा महेंद्रसिंग धोनी टीम इंडियाचा कर्णधार होता. भारताने तेथे प्रथमच एकदिवसीय मालिका गमावली होती. यावेळी रोहित शर्माचा संघ त्या पराभवाचा बदला घेण्यासाठी सज्ज झाला आहे.
भारत विरुद्ध बांगलादेश हेड टू हेड –
टीम इंडियाने बांगलादेशमध्ये आतापर्यंत २२ एकदिवसीय सामने खेळले आहेत. या दरम्यान त्यांनी १७ जिंकले आहेत. त्याचबरोबर बांगलादेशने ४ जिंकले आहेत. तसेच एका सामन्याचा निकाल गालला नाही. एकूण विक्रमाबद्दल बोलायचे तर दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत ३६ सामने झाले आहेत. यामध्ये भारताने ३० जिंकले आहेत, तर पाचमध्ये बांगलादेशने विजय मिळवला आहे. दरम्यान एका सामन्याचा निकाल लागला नाही.
जाणून घेऊया मॅचच्या प्रक्षेपण आणि ऑनलाइन टेलिकास्टशी संबंधित सर्व माहिती –
भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिला वनडे कधी आहे?
भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना आज (४ डिसेंबर) म्हणजेच रविवारी होणार आहे.
भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना कोठे खेळला जाईल?
भारत आणि बांगलादेश यांच्यातील सामना ढाका येथील शेर-ए-बांगला नॅशनल स्टेडियमवर होणार आहे.
भारत विरुद्ध बांगलादेश सामना कधी सुरू होईल?
भारत आणि बांगलादेश सामना भारतीय वेळेनुसार सकाळी ११:३० वाजता आहे.
सामना कोणत्या टीव्ही चॅनलवर प्रसारित होईल?
सोनी स्पोर्ट्सच्या वेगवेगळ्या चॅनेलवर तुम्ही हिंदी आणि इंग्रजीशिवाय देशातील इतर भाषांमध्ये कॉमेंट्रीसह हा सामना पाहू शकता. डीडी स्पोर्ट्स (डीडी फ्री डिश) वरही या सामन्याचे थेट प्रक्षेपण केले जाईल.
फोन किंवा लॅपटॉपवर लाईव्ह मॅच कशी बघायची?
या सामन्याचे लाईव्ह-स्ट्रीमिंग भारतात सोनी लिव्ह अॅपवर पाहता येईल. तसेच जियो टी.व्ही. अॅपवर थेट क्रिकेट सामन्यांचा आनंदही घेऊ शकता.
वनडे मालिकेसाठी दोन्ही संघ –
भारताचा एकदिवसीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, लोकेश राहुल, ऋषभ पंत, इशान किशन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, दीपक चहर, कुलदीप सेन, शाहबाज अहमद, उमरान मलिक</p>
बांगलादेशचा एकदिवसीय संघ: लिटन दास (कर्णधार, यष्टीरक्षक), नजमुल हुसेन शांती, यासिर अली, आसिफ हुसैन, महमुदुल्लाह रियाद, मेहिदी हसन, शकीब अल हसन, अनामुल हक (यष्टीरक्षक), मुशफिकुर रहीम (यष्टीरक्षक), नुरुल हसन, इबादत हुसेन, हसन महमूद, मुस्तफिजुर रहमान, नसम अहमद, तस्किन अहमद