ZIM Afro T10 League starts from 20th July: झिम्बाब्वेमध्ये विश्वचषक पात्रता फेरीनंतर २० जुलैपासून झिम आफ्रो टी १० लीग खेळवली जाणार आहे. पहिल्या सत्रात एकूण ५ संघ सहभागी होतील. या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानचे अनेक माजी दिग्गज चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडताना दिसणार आहेत. २००७ टी-२० विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघातील ४ खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

त्यात वेगवान गोलंदाज एस श्रीशांत, युसूफ आणि इरफान पठाण आणि रॉबिन उथप्पा यांचा समावेश आहे. याशिवाय स्टुअर्ट बिन्नी आणि पार्थिव पटेल हे देखील झिम आफ्रो टी-१० लीगच्या पहिल्या सत्रात खेळताना दिसणार आहेत. लीगचा उद्घाटन हंगामा २० जुलैपासून सुरू होईल आणि अंतिम सामना २९ जुलै रोजी होईल. स्पर्धेतील सर्व सामने झिम्बाब्वेची राजधानी हरारे येथे होणार आहेत. २०१७ मधील अबू धाबी टी-१० लीग नंतर ही सर्वात हाय-प्रोफाइल टी-१० लीगपैकी एक असेल. २०१७ पासून, कतार टी-१० लीग आणि युरोपियन क्रिकेट लीगसह अनेक १० षटकांच्या लीग उदयास आल्या आहेत.

झिम आफ्रो टी-१० लीगबद्दल बोलायचे झाले, तर या स्पर्धेत पाच संघ आहेत. हे सर्व झिम्बाब्वे आणि दक्षिण आफ्रिकेतील ५ वेगवेगळ्या शहरांचे प्रतिनिधीत्व करतील. हे संघ हरारे हरिकेन्स, जोहान्सबर्ग बफेलोज, डर्बन कलंदर, बुलावायो ब्रेव्ह्स आणि केप टाउन सॅम्प आर्मी आहेत. प्रत्येक संघात किमान १६ खेळाडू असतील. त्यापैकी ६ झिम्बाब्वेचे असतील. या ६ खेळाडूंपैकी किमान एक खेळाडू ‘इमर्जिंग प्लेयर्स’ श्रेणीतील असणार आहे. प्रत्येक संघ ४ परदेशी क्रिकेटपटूंना साइन अप करू शकतो.

हेही वाचा – ENG vs AUS: ब्रिटनच्या पंतप्रधानांना ऑस्ट्रेलियाच्या पीएमने दिले प्रत्युत्तर; म्हणाले, “आम्हाला आमच्या खेळाडूंचा…”

केप टाउन सॅम्प आर्मी(१७): रहमानउल्ला गुरबाज, शॉन विल्यम्स, भानुका राजपक्षे, महेश तिक्षना, शेल्डन कॉट्रेल, करीम जनात, चमिका करुणारत्ने, पीटर हेजलोगो, मॅथ्यू ब्रेट्झके, रिचर्ड नगारावा, झुवाओ सेफास, हॅमिल्टन मसाकादझा,तडशवानी मारुमणी, तिनाशे कामुक्वे, पार्थिव पटेल, मोहम्मद इरफान आणि स्टुअर्ट बिन्नी.

डर्बन कलंदर्स(१५): आसिफ अली, मोहम्मद अमीर, जॉर्ज लिंडे, हजरतुल्ला झाझाई, टिम सिफर्ट, सिसांडा मगाला, हिल्टन कार्टराईट, मिर्झा ताहिर बेग, तैब अब्बास, क्रेग एर्विन, तेंडाई चतारा, ब्रॅड इव्हान्स, क्लाइव्ह मदांडे, निक वेल्च आणि आंद्रे फ्लेचर.

हरारे हरिकेन्स (१७): इऑन मॉर्गन, मोहम्मद नबी, एव्हिन लुईस, रॉबिन उथप्पा, डोनोव्हन फरेरा, शाहजवाज डहानी, डुआन जॅनसेन, समित पटेल, केविन कोथेगोडा, ख्रिस्तोफर मॅपोफू, रेगिस चकाबवा, ल्यूक जॉनवे, ब्रँडन मावुता, तशिंगा मुशिवा, इरफान शाह, खलिद शाह आणि एस. श्रीशांत,

हेही वाचा – Babar Azam: दीड महिन्यानंतर बाबर आझम परतला मायदेशात, नवा लूक पाहून चाहते झाले चकीत, पाहा VIDEO

बुलावायो ब्रेव्ह्स (१५): सिकंदर रझा, तस्किन अहमद, अॅश्टन टर्नर, टायमल मिल्स, थिसारा परेरा, बेन मॅकडरमॉट, ब्यू वेबस्टर, पॅट्रिक डूली, कोबे हर्फ्ट, रायन बर्ल, टिमिसेन मारुमा, जॉयलॉर्ड गुम्बी, इनोसंट काया, फराज अक्रम आणि मुजीब उर रहमान.

जोहान्सबर्ग बफेलोः मुशफिकुर रहीम, ओडियन स्मिथ, टॉम बॅंटन, युसूफ पठाण, विल स्मेड, नूर अहमद, रवी बोपारा, उस्मान शिनवारी, ज्युनियर डाला, ब्लेसिंग मुजरबानी, वेलिंग्टन मसाकादझा, वेस्ली मधवेरे, व्हिक्टर न्युची, मोहम्मद शुम्फे, राहुल शुम्बा आणि मिल्टन शुम्बा

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The five team zim afro t10 league will begin from july 20 in zimbabwe vbm