भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनचा विश्वास आहे की लोकेश राहुलला त्याच्या कामगिरीमध्ये अधिक सातत्य राखण्याची गरज आहे आणि राष्ट्रीय संघाच्या प्रशिक्षकासोबत त्याच्या तांत्रिक त्रुटींवर काम करणे आवश्यक आहे. आपल्या कलात्मक खेळासाठी ओळखला जाणारा ५७ वर्षीय अझहर राहुलच्या प्रतिभेचा खेळाडू त्याच्या पूर्ण क्षमतेने खेळत नसल्याने तो थोडा निराश आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पीटीआयला दिलेल्या एका खास मुलाखतीत अझरुद्दीन म्हणाला, “मला वाटते की राहुलच्या बाबतीत सातत्याची समस्या आहे, परंतु मला वाटते की असे प्रशिक्षक आहेत ज्यांनी त्याच्या चुका सुधारल्या पाहिजेत.” माझ्या दृष्टिकोनातून तो चांगला खेळाडू आहे पण कामगिरीत सातत्याचा अभाव आहे.आंतरराष्ट्रीय स्तरावर पुनरागमन केल्यापासून राहुलला चांगली कामगिरी करण्यात अपयश आले आहे. मंगळवारी गुवाहाटी येथे श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यातही तो ३९ धावांवर बाद झाला.

अझहर म्हणाला, “मला वाटतं राहुल अनेक प्रकारे आऊट होत आहे. मुख्य म्हणजे चांगले चेंडू त्याला आऊट करत नाहीत. खराब शॉट निवडीमुळे समस्या निर्माण होत आहे.अझरुद्दीनचे मत आहे की सर्व वरिष्ठ खेळाडूंनी वेळ काढून देशांतर्गत क्रिकेट खेळले पाहिजे. मर्यादित षटकांचा कर्णधार रोहित शर्मा आणि सुपरस्टार विराट कोहली यांनी पहिल्या एकदिवसीय सामन्यात प्रभावी खेळी खेळली आणि अझरुद्दीन यांना वाटते की या वर्षाच्या अखेरीस ५० षटकांच्या विश्वचषकात भारतासाठी हे दोघे महत्त्वाचे खेळाडू असतील.

अझहर पुढे म्हणाला, “दोघेही खूप चांगले आणि दर्जेदार खेळाडू आहेत आणि त्यांनी भूतकाळात चांगली कामगिरी केली आहे तसेच रेकॉर्ड सांगतात. मला खात्री आहे की कोहली आणि रोहित वर्ल्ड कपमध्ये चांगली कामगिरी करतील. एकदिवसीय फॉर्मेटमध्ये त्याच्या कामगिरीत नेहमीच सातत्य राहिले आहे. १९९० ते १९९९ दरम्यान सुमारे एक दशक दोन कार्यकाळात भारतीय संघाचे नेतृत्व करणाऱ्या अझरुद्दीनचा असा विश्वास आहे की नवीन टी२० कर्णधार हार्दिक पांड्यामध्ये चांगले नेतृत्व गुण आहेत.

हेही वाचा: IND vs SL 2nd ODI: आठ वर्षापूर्वीची पुनरावृत्ती रोहित शर्मा करणार का? ईडन गार्डनची खेळपट्टी काय रंग दाखवणार, जाणून घ्या प्लेईंग ११

भारताचा माजी कर्णधार पुढे म्हणाला, “हार्दिक एक कर्णधार म्हणून चांगला दिसत आहे आणि तो संघाला पुढे नेऊ शकतो असे दिसते पण त्याला त्याच्या पाठीची काळजी घेणे आवश्यक आहे कारण तो बराच काळ बाहेर आहे. अझरुद्दीन म्हणाला, “भारताला सर्वांची गरज असून आम्हाला अष्टपैलू हार्दिक पांड्याची दुखापती परवडणारी नाही. हार्दिककडे तरुण संघ आहे आणि भारतीय क्रिकेटकडे तोच पुढे जाण्याचा मार्ग आहे. आगामी टी२० मालिकेत विजयी संघ तयार करण्यासाठी मजबूत समन्वयाची आवश्यकता असेल.”

भारतीय निवडकर्त्यांना मागच्या काही काळात मोठ्या प्रमाणावर टीकेला सामोरे जावे लागले आहे. अझरुद्दीन यांच्या मते त्यांचा माजी सहकारी आणि निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांनी काही खेळाडूंबाबतीत सर्वकाही स्पष्ट करावे जेणेकरून पुढे काही शंका नाही. ते म्हणतात, “नक्कीच, चेतनने किमान एक किंवा दोन पत्रकार परिषदा घेतल्या पाहिजेत आणि सध्याच्या भारतीय संघासाठी पुढे जाण्याचा मार्ग काय आहे ते सांगावे.”

अझरुद्दीन हे हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचे एक वर्षाहून अधिक काळ अध्यक्ष आहेत, परंतु प्रशासनावरून त्यांचे अर्शद अयुब आणि शिवलाल यादव यांसारख्या माजी भारतीय खेळाडूंशी मतभेद आहेत. माजी भारतीय कर्णधार म्हणाले, “आतापर्यंतचा हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचा प्रवास चांगला राहिला आहे. हैदराबाद क्रिकेट असोसिएशनची गमावलेली प्रतिष्ठा परत मिळवण्यासाठी आम्ही लढत आहोत. आम्ही स्टेडियममध्ये तसेच ड्रेसिंग रूममध्ये (नुतनीकरणाच्या दृष्टीने) खूप काम केले आहे.”

हेही वाचा: मिस्टर ३६० हा एकच! “सूर्यकुमारची स्टाईल मारायला गेला आणि…!” ऑस्ट्रेलियाच्या ‘या’ फलंदाजाच्या शॉटचा Video व्हायरल

पुढे बोलताना ते म्हणतात,“जेव्हा मी पदभार स्वीकारला, तेव्हा सर्व परिस्थिती अत्यंत दयनीय होती. आम्ही तीन महिन्यांत आमचा दुसरा आंतरराष्ट्रीय सामना (भारत विरुद्ध न्यूझीलंड) आयोजित करणार आहोत. बीसीसीआयने आमची मेहनत ओळखली याचा आम्हाला खूप आनंद आहे आणि आम्हाला सामन्यांचे आयोजन करण्याची संधी दिली आहे.अत्यल्प कालावधीत टी२० आणि एकदिवसीय दोन्ही सामने आयोजित करत आहोत.”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The former player mohammed azharuddin believes that kl rahul is very talented but is unable to tap into his potential and coach dravid should look into it avw