Umpire Killed for Giving No Ball: क्रिकेट हा खेळ भारतात धर्म मानला जातो. पराभव कोणत्याही खेळाडूला किंवा संघाला आवडत नाही. त्यामुळेच खेळाडू मैदानात एकमेकांशी हुज्जत तर घालतातच, पण अंपायरशीदेखील हमरीतुमरीवर येतात. एखाद्या खेळाडूने फक्त एका नो-बॉलसाठी अंपायरला मारले तर?

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘आज तक’च्या वृत्तानुसार, स्पर्धा समितीने नियुक्त केलेले अंपायर लकी यांनी ब्रह्मपूर संघाविरुद्ध चुकीचा निर्णय दिला. स्मृती रंजन राऊत नावाच्या तरुणाला अंपायरच्या निर्णयाचा राग आला आणि त्याने वाद घालण्यास सुरुवात केली. हळूहळू वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. दरम्यान, स्मृती रंजन याने शेतातील चाकू काढून अंपायरवर एकामागून एक वार करण्यास सुरुवात केली. चाकूच्या हल्ल्यात अंपायर गंभीर जखमी झाला.

ही घटना प्रत्यक्षात घडली असल्याने चाहते हा प्रश्न विचारत आहेत की, “नक्की क्रिकेट खेळ कुठल्या दिशेने जात आहे? ओडिशामध्ये खेळल्या जात असलेल्या क्रिकेट टूर्नामेंटच्या सामन्यादरम्यान जी धक्कादायक घटना घडली त्यामुळे क्रिकेटच ओशाळले आहे. या स्पर्धेच्या सामन्यादरम्यान एका अंपायरने ‘नो-बॉल’ न दिल्याने एक तरुण इतका संतापला की, त्याने आधी अंपायरशी बराच वेळ वाद घातला आणि नंतर त्याचा भोसकून खून केला. हे खूप गंभीर आहे.

कटकमधील महिशीलंदा गावातील या घटनेने क्रिकेट चाहत्यांना हादरवून सोडले आहे. ‘नो-बॉल’साठी कोणी अंपायरचा खून झाला, यावर विश्वास ठेवणे खरेच कठीण आहे. पण अंपायर लकी राऊत यांच्याबाबत हेच घडले. या तरुणाने लकी राऊत यांची चाकूने वार करून निर्घृण हत्या केली. राऊतना मारल्यानंतर तरुणाने पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र गावकऱ्यांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

मीडिया रिपोर्ट्सनुसार घडले असे की, अंपायरने नो-बॉल न दिल्याने मुख्य आरोपी संग्राम राऊत  (रा. बेरहामपूर) याने अन्य दोन तरुणांसह पंचाला धक्काबुक्की करून मारामारी सुरू केली. अशा परिस्थितीत जेव्हा अन्य एक २२ वर्षीय तरुण अंपायरला वाचवण्यासाठी मैदानावर पोहोचला तेव्हा वाद आणखी वाढला. आरोपींनी त्याच्यावर आधी बॅटने हल्ला केला आणि त्यानंतर चाकूने त्याच्या छातीत वार केले. त्यानंतर जखमी अवस्थेत अंपायर लकी राऊत यांना एससीबी रुग्णालयात नेण्यात आले मात्र तेथे अंपायरला मृत घोषित केले. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण आहे. पोलिसांनी सांगितले की, संग्रामला ताब्यात घेण्यात आले असून त्याची चौकशी करण्यात येत आहे. सहाय्यक पोलिस आयुक्त (एसीपी) अरुण कुमार स्वैन म्हणाले, “आम्ही एक टीम तयार केली असून संग्रामच्या उर्वरित साथीदारांना पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत.”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The ground was full of spectators the umpire gave no ball the angry youth killed him with a knife in front of everyone avw