अफगाणिस्तान देश सध्या कठीण काळातून जात आहे. तालिबानने संपूर्ण व्यवस्थेवर वर्चस्व मिळवले आहे. तालिबानच्या भीतीमुळे लोक घरे आणि देश सोडून पळून जात आहेत. आम्हाला संकटात मरण्यासाठी सोडले जाऊ नये, असे अफगाणिस्तानचा स्टार क्रिकेटर राशिद खानने याआधी नेत्यांना आवाहन केले होते. राशिदचे कुटुंब अफगाणिस्तानात अडकले असून तो सध्या इंग्लंडच्या ‘द हंड्रेड’ लीगमध्ये खेळत आहे, पण या काळात त्याला आपल्या देशाचीही काळजी आहे.
‘द हंड्रेड’ लीगमधील सामन्यादरम्यानही राशिदने अफगाणिस्तानला पाठिंबा दर्शवला. ट्रेंड रॉकेट्सकडून खेळणाऱ्या राशिदचे देशप्रेम एका कृतीतून सर्वांसमोर आले. लीगच्या एलिमिनेटर सामन्यात साउदर्न ब्रेवविरुद्ध तो जेव्हा मैदानात उतरला, तेव्हा त्याचा चेहरा पाहून सर्वांनी त्यांना सलाम ठोकण्यास सुरुवात केली.
په نن لوبه کې د @rashidkhan_19 پر مخ تور، سور او زرغون بیرغ، اتل او هیوادنۍ مینه pic.twitter.com/8ZHpQHooKj
— Afghan Cricket Association – ACA (@Afghan_cricketA) August 20, 2021
हेही वाचा – अमेरिकेत खेळण्यासाठी भारताच्या अजून एका क्रिकेटपटूची निवृत्ती!
या महत्त्वाच्या सामन्यात राशिदने आपल्या चेहऱ्यावर अफगाणिस्तानचा झेंडा रंगवला होता. त्याच्या या कृतीचे सर्वत्र अभिनंद झाले, मात्र सामन्यात तो अपयशी ठरला. त्याला एकही विकेट घेता आली नाही. परिणामी त्याच्या संघाला ७ गड्यांनी पराभूत व्हावे लागले. आता त्याच्यासाठी ही लीग संपुष्टात आली आहे.
Today let us take some time to value our nation and never forget the sacrifices. We hope and pray for the peaceful , developed and United nation INSHALLAH #happyindependenceday pic.twitter.com/ZbDpFS4e20
— Rashid Khan (@rashidkhan_19) August 19, 2021
राशिद खान आता त्याच्या घरी परततो का, किंवा इंग्लंडमध्ये काही दिवसांच्या मुक्कामानंतर आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्यासाठी यूएईला रवाना होतो का, हे पाहावे लागेल. त्याची आयपीएल फ्रेंचायझी सनरायझर्स हैदराबादने राशिद दुसऱ्या टप्प्यात खेळणार असल्याचे स्पष्ट केले आहे. आयपीएल २०२१चा दुसरा टप्पा १९ सप्टेंबरपासून रंगणार आहे.