Ashes 2023 ENG vs AUS: एजबॅस्टन कसोटीत स्लो-ओव्हर रेटमुळे आयसीसीने ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडला मोठा दंड ठोठावला आहे. दोन्ही संघांच्या खेळाडूंच्या ४० टक्के मॅच फीसह डब्ल्यूटीसीचे २-२ गुणही कापण्यात आले आहेत. २०२३ची अ‍ॅशेसची पहिली कसोटी जिंकून ऑस्ट्रेलियाने डब्ल्यूटीसी पॉइंट्स टेबलमध्ये १२ गुणांसह खाते उघडले होते, परंतु आता आयसीसीच्या दंडानंतर त्यांच्या खात्यात फक्त १० गुण शिल्लक आहेत. त्याचबरोबर इंग्लंडच्या खात्यात -२ गुण आहेत. याचा अर्थ गुणतालिकेत असलेल्या सर्व संघांच्या तुलनेत ते मागे पडले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आयसीसीच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांना आढळले की दोन्ही संघ निर्धारित वेळेपेक्षा दोन षटके मागे आहेत, त्यामुळे त्यांना दंड ठोठावण्यात आला. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स आणि इंग्लंडचा बेन स्टोक्स यांनी निर्बंध स्वीकारले, म्हणजे औपचारिक सुनावणीची गरज नव्हती.

नियम काय आहेत?

जर आपण आयसीसीच्या नियमांबद्दल बोललो तर, आचारसंहिता अनुच्छेद २.२२नुसार, जर एखादा संघ स्लो ओव्हर रेटसाठी दोषी आढळला, तर त्यांच्या खेळाडूंना प्रत्येक षटकासाठी मॅच फीच्या २० टक्के दंड आकारला जातो. तसेच, कलम १६.११.२ नुसार, WTC सायकलमध्ये स्लो ओव्हर रेटसाठी दोषी आढळलेल्या संघांना टाकलेल्या प्रत्येक षटकासाठी १ गुण वजा केला जातो.

इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया एजबॅस्टन कसोटीबद्दल बोलायचे झाले तर या सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना ३९३ धावांवर डाव घोषित केला. या काळात जो रूटने आपल्या कसोटी कारकिर्दीतील ३०वे शतक झळकावले. या धावसंख्येसमोर ऑस्ट्रेलियाचा डाव ३८६ धावांवर आटोपला आणि इंग्लंडने ७ धावांची आघाडी घेतली. उस्मान ख्वाजा ऑस्ट्रेलियाकडून शतक झळकावण्यात यशस्वी ठरला. यानंतर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात २७३ धावा केल्या आणि कांगारूंसमोर विजयासाठी २८१ धावांचे लक्ष्य ठेवले. पाहुण्यांनी २ विकेट्स शिल्लक असताना ही धावसंख्या गाठली.

ख्वाजाच्या खेळीने पहिल्या डावातील जो रूटचे शतक झाकोळले गेले

इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर जॅक कॉर्लीच्या (६१ धावा) खेळीने संघाला चांगली सुरुवात करून दिली. जो रूटने १५२ चेंडूंचा सामना करत ७ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ११८ धावांची नाबाद खेळी केली. प्रदीर्घ कालावधीनंतर पुनरागमन करणाऱ्या जॉनी बेअरस्टोने ७८ चेंडूत ७८ धावांची खेळी केली. प्रत्युत्तरात पहिल्या डावात फलंदाजीला उतरलेल्या ऑस्ट्रेलियाला सुरुवातीलाच धक्का बसला. डेव्हिड वॉर्नर (९ धावा), मार्नस लाबुशेन शून्य आणि स्टीव्ह स्मिथ (१६ धावा) बाद झाले. पण त्यानंतर उस्मान ख्वाजाने ३२१ चेंडूत १४ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने १४१ धावांची शानदार खेळी केली.

हेही वाचा: Ashes series 2023: डेव्हिड वॉर्नरने भारताच्या ‘या’ धडाकेबाज सलामीवीराचा मोडला विक्रम, टॉप-५ फलंदाजांच्या यादीत मिळवले स्थान

दुसऱ्या डावात इंग्लंडचे फलंदाज सपशेल अपयशी ठरले

दुसऱ्या डावात फलंदाजीला उतरताना इंग्लिश फलंदाज ऑस्ट्रेलियन गोलंदाजांच्या जाळ्यात अडकले. सलामीवीर जॅक कॉर्ली (७ धावा) आणि बेन डेकेट (१९ धावा) यांनी विकेट्स गमावल्या. जो रूट (४६ धावा) आणि हॅरी ब्रूक (४६ धावा) यांनी डाव सावरला. त्याचवेळी कर्णधार बेन स्टोक्सने (४३ धावा) महत्त्वाची खेळी खेळली. यांच्या व्यतिरिक्त एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही.

ऑस्ट्रेलियाकडून दुसऱ्या डावात पॅट कमिन्स आणि नॅथन लायनने ४-४ बळी घेतले. त्याचवेळी १-१ विकेट्समध्ये जोश हेझलवूड आणि स्कॉट बोलँड यांच्या नावाचा समावेश होता. २८१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात चांगली झाली. डेव्हिड वॉर्नर आणि उस्मान ख्वाजा यांनी पहिल्या विकेटसाठी ६१ धावांची भागीदारी केली.

हेही वाचा: Virat Kohli on Shubman: शुबमन गिलने किंग कोहलीला टाकत केला विक्रम, एका वर्षात टीम इंडियासाठी केल्या सर्वाधिक धावा, जाणून घ्या

चांगली सुरुवात केल्यानंतर (३६ धावा) डेव्हिड वॉर्नरला ऑली रॉबिन्सनने बाद केले. पण त्यानंतर मार्नस लॅबुशेन, स्टीव्ह स्मिथ आणि ट्रॅव्हिस हेडसारख्या फलंदाजांनी स्वस्तात विकेट्स गमावल्या. उस्मान ख्वाजा चांगली खेळी खेळू पाहत होता पण बेन स्टोक्सने (६५ धावा) त्याला बाद केले. मात्र पॅट कमिन्सच्या नाबाद ४४ धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The icc has imposed heavy fines on australia and england due to slow over rate in edgbaston test avw