ICC has wrested the U19 World Cup from Sri Lanka and has now given it to South Africa : आयसीसीने श्रीलंका क्रिकेट बोर्डावर मोठी कारवाई केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आगामी अंडर-१० वर्ल्ड कपचे यजमानपद काढून घेण्यात आले आहे. १० नोव्हेंबर रोजी आयसीसीने श्रीलंका क्रिकेट बोर्डावर बंदी घातली होती. आता अंडर-19 विश्वचषकाचे यजमानपद दक्षिण आफ्रिकेकडे सोपवण्यात आले आहे. श्रीलंका क्रिकेटमधील प्रशासकीय अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर आयसीसी बोर्डाने हा निर्णय घेतला आहे. अहमदाबादमध्ये झालेल्या बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्यात आला.
वृत्तानुसार, बराच विचारविनिमय केल्यानंतर, आयसीसीने श्रीलंका क्रिकेटला निलंबित करण्याचा निर्णय कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. बोर्डाने सांगितले की, श्रीलंकेच्या संघाचा समावेश असलेले क्रिकेट अखंड सुरू राहील, परंतु निलंबन मागे घेतले जाणार नाही.१४ जानेवारी ते १५ फेब्रुवारी दरम्यान श्रीलंकेत अंडर-19 विश्वचषक होणार होता. आयसीसीने दक्षिण आफ्रिकेला यजमानपदाचे अधिकार दिले आहेत, पण तारखा बदललेल्या नाहीत.
दक्षिण आफ्रिकेत १० जानेवारी ते १० फेब्रुवारी दरम्यान एसए टी-२० स्पर्धाही आयोजित केली जाणार आहे. आयसीसीने नवीन यजमानपदासाठी ओमान आणि यूएईचाही विचार केला, परंतु चांगल्या पायाभूत सुविधांमुळे यजमानपद दक्षिण आफ्रिकेला दिले. स्पर्धेसाठी किमान तीन मैदाने आवश्यक आहेत, परंतु ओमानला एकच मैदान आहे. त्याचबरोबर यूएईमध्ये या स्पर्धेचे आयोजन करणे खूप महागात पडले असते. यासाठी आयसीसीने आफ्रिकन देश निवडला.
हेही वाचा – World Cup 2023: भारताच्या पराभवाचा आनंद बांगलादेमध्ये साजरा? सोशल मीडियावर VIDEO शेअर करून केला जातोय दावा
भारत हा सर्वात यशस्वी संघ –
श्रीलंका, बांगलादेश, इंग्लंड, अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, भारत, आयर्लंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे यांनी स्वयंचलित पात्रता प्रक्रियेद्वारे स्पर्धेत प्रवेश केला आहे. याशिवाय नामिबिया, नेपाळ, न्यूझीलंड, स्कॉटलंड आणि अमेरिका या संघांना क्वालिफायरच्या मदतीने तिकिटे मिळाली. भारत १९ वर्षांखालील ५ विजेतेपदांसह सर्वात यशस्वी संघ आहे. १९९९-००, २००७-०८, २०१२, २०१७-१८ आणि शेवटचा हंगाम २०२१-२२ मध्ये जिंकला. यश धुलच्या नेतृत्वाखाली, भारताने २०२१-२२ मध्ये वेस्ट इंडिजने आयोजित केलेल्या हंगामात शेवटचे विजेतेपद पटकावले.
हेही वाचा – World Cup 2023: डेव्हिड वॉर्नरने निवृत्तीची अटकळ लावली फेटाळून; म्हणाला, “कोण म्हणालं मी…”
श्रीलंकेपूर्वी झिम्बाब्वेवरही घालण्यात आली होती बंदी –
२०१९ मध्ये सरकारी हस्तक्षेपामुळे झिम्बाब्वे क्रिकेटला निलंबित केल्यानंतर गेल्या चार वर्षांत श्रीलंका क्रिकेच बोर्ड हा आयसीसीद्वारे निलंबित केलेला दुसरा पूर्ण सदस्य आहे. मात्र, झिम्बाब्वेमधील सर्व क्रिकेट उपक्रम अचानक बंद करण्यात आले होते. याशिवाय निधी देण्यावरही बंदी घालण्यात आली होती. काही काळानंतर झिम्बाब्वे क्रिकेट पुन्हा सुरू झाले. श्रीलंकेच्या बाबतीत आयसीसी सावधगिरीने पावले उचलेल.