भारतीय संघ निवडताना पक्षपातीपणा झाल्याचा तीन खेळाडूंनी केलेल्या आरोपांची दखल भारतीय बॉक्सिंग महासंघाने घेतली असून त्याबाबत तीन सदस्यांची समिती नियुक्त केली आहे.
समितीमध्ये महासंघाचे उपाध्यक्ष आय.डी.नानावटी, निरवान मुखर्जी व पंच मंडळाचे प्रमुख नरोत्तमसिंग रावत यांचा समावेश आहे. अर्जुन पुरस्कार विजेता दिनेशकुमार (९१ किलो), राष्ट्रीय विजेता दिलबागसिंग (६९ किलो) व प्रवीणकुमार (९१ किलोवरील) यांनी भारतीय संघ निवडताना त्यांच्यावर अन्याय झाल्याचा आरोप केला होता. या तीनही खेळाडूंना महासंघाच्या संबंधित समितीकडून मंगळवारी कारणे दाखवा नोटीस पाठविली जाणार आहे, असे महासंघाचे अध्यक्ष अभिषेक मतोरिया यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, खेळाडूंना त्यांची बाजू मांडण्याची संधी दिली जाणार आहे व त्यानंतरच पुढची कार्यवाही केली जाईल. जर खेळाडूंनी केलेल्या आरोपांमध्ये तथ्य नसेल तर खेळाडूंकडून लेखी माफी मागितली जाईल. त्यानंतर महासंघाच्या शिस्तपालन समितीकडून या खेळाडूंवर कारवाई केली जाणार आहे.

Story img Loader