Asian Kabaddi Championship 2023: कोरिया प्रजासत्ताकमधील बुसान येथील ‘डोंग-युई इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सेओकडांग कल्चरल सेंटर’ येथे शुक्रवारी झालेल्या आशियाई कबड्डी चॅम्पियनशिप २०२३च्या अंतिम फेरीत भारतीय कबड्डी संघाने इराणचा ४२-३२ असा धुव्वा उडवत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. याआधीही अशी अप्रतिम कामगिरी केली असून भारताचे हे नऊ आवृत्त्यांमध्ये आठवे विजेतेपद ठरले आहे.

भारतीय कर्णधार पवन सेहरावतने सुपर १० बरोबर आघाडी केली. सामन्याच्या सुरुवातीच्या पाच मिनिटांत भारतीय पुरुष कबड्डी संघ इराणविरुद्ध गारद झाला. मात्र, खेळाच्या १०व्या मिनिटाला बचावाच्या काही टॅकल पॉइंट्स आणि पवन सेहरावत आणि अस्लम इनामदार यांच्या यशस्वी चढाईनंतर इराणला ऑलआऊट करण्यात टीम इंडियाला यश आले. इराणच्या मोहम्मदने भारताच्या अर्जुन देश्वालच्या काही चढाया अपयशी ठरल्यानंतर त्यांच्या संघासाठी खाते उघडले. मात्र, अखेर भारतीय संघाचा खेळाडू अर्जुनने पहिला गुण मिळवून दिला. ३-३ अशी गुणसंख्या असताना सामना अटीतटीचाच वाटत होता, पण सामन्यात नितेशची मजबूत पकड अन् पवन शेहरावतच्या जबरदस्त चढायांच्या जोरावर भारताने १०-४ अशी आघाडी घेतली. त्यानंतर टीम इंडियाने मागे वळून पाहिले नाही. नितिन रावतनेही चांगल्या कामगिरी केली. पहिल्या हाफमध्ये भारताने २३-११ अशी आघाडी मजबूत केली होती.

Pakistan Opener Fakhar Zaman says Will miss playing in India in future ICC events ahead Champions Trophy 2025
Champions Trophy 2025 : ‘भारतात खेळण्याची उणीव भासेल…’, पाकिस्तानच्या खेळाडूचं मोठं वक्तव्य; म्हणाला, ‘पण दुबईत…’
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
novak djokovic breaks roger federer record
ऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा : जोकोविचचे ऐतिहासिक यश ; फेडररला मागे टाकत सर्वाधिक ग्रँडस्लॅम सामन्यांत सहभाग
Why Rohit Sharma Will Visit Pakistan Ahead of ICC Champions Trophy 2025 According To Reports
Champions Trophy: रोहित शर्माला चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी पाकिस्तानला का जावं लागणार? का सुरू आहे चर्चा? वाचा कारण
Rishabh Pant to play Ranji Trophy after 7 years
टीम इंडियाचा ‘हा’ विस्फोटक फलंदाज ७ वर्षांनी रणजी ट्रॉफी खेळणार, जैस्वाल-गिलही देशांतर्गत सामने खेळण्यासाठी सज्ज
Kho-Kho World Cup Delhi, Kho-Kho ,
विश्लेषण : दिल्लीत चक्क खो-खो विश्वचषक? किती संघ सहभागी? स्पर्धेमुळे या मराठमोळ्या खेळाला संजीवनी मिळेल?
Champions Trophy 2025 India Squad Announcement Date Declared by BCCI Vice President Rajeev Shukla
Champions Trophy: चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कधी होणार टीम इंडियाची घोषणा? BCCIने सांगितली तारीख
Vijay Hazare Trophy Maharashtra Haryana Karnataka and Vidarbha qualify for the semi finals 2024-25
Vijay Hazare Trophy : महाराष्ट्रासह ‘या’ चार संघांनी उपांत्य फेरीत मारली धडक! जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

या हाय-व्होल्टेज फायनलमध्ये भारताने पहिल्या हाफमध्ये २३-११ असे वर्चस्व राखले. पण नंतर कर्णधार मोहम्मदरेझा शादलुई छायानेहच्या सुरेख खेळामुळे इराणने उत्तरार्धात उत्तेजित पुनरागमन केले आणि हे अंतर बरेच कमी केले. दुसऱ्या सत्रात इराणकडून चांगला खेळ पाहायला मिळाला. ३३-१४ अशा पिछाडीवर असलेल्या इराणने सामना ३८-३० असा चुरशीचा बनवला. त्या सत्रात भारताला केवळ पाच गुण मिळवता आले, पण दुसऱ्या बाजूला इराणने १६ गुणांची कमाई केली करत सामन्यात रोमांचकता आणली. शेवटच्या टप्प्यात भारताच्या खेळाडूंनी दमदार खेळ करत ४२-३२ असा रोमहर्षक विजय निश्चित केला.

मात्र, शदालुईची शेवटच्या क्षणी झालेली चूक भारताला कोणत्याही अडचणीशिवाय विजेतेपद मिळवून देऊ शकली. पिचादिवरून आघाडी घेत भारतीय कबड्डी संघाचा स्टार कर्णधार पवन सेहरावतने विरोधी संघाकडून विजय खेचून आणला. त्यानेच सर्वाधिक गुण मिळवले आणि विजयात मोलाची भूमिका बजावली.

हेही वाचा: Inzamam-ul-Haq: “तुम्हाला सेहवागविरुद्ध ९ फिल्डर नाही तर १९…”, पाकिस्तानचा माजी खेळाडू इंझमाम उल हकचे मोठे विधान

साखळी सामन्यातही इराणला हरवले होते

कोरिया प्रजासत्ताकातील बुसान येथे सुरू असलेल्या आशियाई कबड्डी चॅम्पियनशिप २०२३ मधील साखळी सामन्यात या अंतिम सामन्याआधी साखळी फेरीत गुरुवारी भारताने इराणचा ३३-२८ असा पराभव केला होता. गुरुवारी झालेल्या पहिल्या सामन्यात कोरियाचा ७२-१७ असा पराभव करणाऱ्या इराणच्या संघाने स्पर्धेत प्रथमच भारताला ऑलआऊट केले होते. मात्र, नंतर भारताने चांगले पुनरागमन केले आणि सामन्यात एक मिनिट शिल्लक असताना विजयातील फरक केवळ दोन गुणांवर आणला. याआधी स्पर्धेत भारताने जपानचा ६२-१७, कोरियाचा ७६-१३, चायनीज तैपेईचा ५३-१९ आणि हॉंगकॉंगचा ६४-२० असा पराभव केला होता.

Story img Loader