भारताचा कर्णधार रोहित शर्माने कर्णधारपदाला साजेशी खेळी खेळत भारताला दुसऱ्या सामन्यात विजय मिळवून दिला. भारताने ऑस्ट्रेलियाचे ९१ धावांचे आव्हान षटकात ५ गड्यांच्या मोबदल्यात पार केले. रोहित शर्माने नाबाद २० चेंडूत ४६ धावा केल्या. दिनेश कार्तिकने शेवटच्या षटकाच्या पहिल्याच दोन चेंडूवर एक षटकार एक चौकार मारत सामना संपवला. हार्दिक पांड्याने ९, राहुलने १० आणि विराटने ११ धावा केल्या. झाम्पाने दोन गडी बाद केले.
तत्पूर्वी, भारताचे शेवटच्या षटकांमधील दुखणे जसप्रीत बुमराह संघात परतला तरी कायम राहिले आहे. दुखापतीनंतर पहिलाच सामना खेळणाऱ्या बुमराहने चांगला मारा केला. मात्र यावेळी शेवटचे षटक टाकणाऱ्या हर्षल पटेलने १९ धावांची खैरात वाटली. मॅथ्यू वेडने त्याच्या शेवटच्या षटकात 19 धावा चोपल्या. वेडने २० चेंडून नाबाद ४३ धावा ठोकत ऑस्ट्रेलियाला ८ षटकात ५ बाद ९० धावांपर्यंत पोहचवले. दिनेश कार्तिकच्या चौकाराने भारतीय संघाचा विजय साकार झाला. त्याने एक षटकार आणि एक चौकार मारत भारताला विजय मिळवून दिला.
Ind vs Aus 2nd T20 Highlights Match Updates: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसरा टी २० सामना हायलाइट्स अपडेट्स
दिनेश कार्तिकच्या चौकाराने भारतीय संघाचा विजय साकार झाला. एक षटकार आणि एक चौकार मारत भारताला विजय मिळवून दिला. भारत ९२-४
भारतीय संघाला ७ चेंडूत १४ धावांची गरज असताना हार्दिक पांड्या झेलबाद झाला. त्याने ९ चेंडूत ९ धावा केल्या. भारत ७७-४
भारताला १२ चेंडूत २२ धावांची गरज आहे. नाहीतर भारत मालिका गमावू शकतो. रोहित अजूनही खेळपट्टीवर टिकून आहे. भारत ६९-३
भारतीय संघाला शेवटच्या तीन षटकात १८ चेंडूत ३३ धावांची आवश्यकता आहे. भारतासाठी जमेची बाजू म्हणजे कर्णधार अजूनही खेळपट्टीवर टिकून आहे. भारत ५८-३
एकाच षटकात भारतीय संघाला दोन धक्के ऍडम झम्पाने दिले. ऑस्ट्रेलिया पुन्हा सामन्यात आला आहे. भारत ५५-३
कोहलीला ऍडम झम्पाने आठव्यांदा बाद केले. ६ चेंडूत ११ धावा केल्या. भारत ५५-२
भारतीय संघाला पहिला धक्का केएल राहुल बाद झाला आहे. त्याने ६ चेंडूत १० धावा केल्या. भारत ३९-१
पहिल्या पॉवर प्ले नंतर भारतीय संघाची उत्तम सुरुवात केली झाली आहे. रोहित शर्माने तुफानी सुरुवात करत तीन षटकार मारले. भारत ३०-०
भारतीय संघाची रोहित शर्माने धडाकेबाज सुरुवात केली. रोहितने मार्टिन गप्टिलचा १७२ षटकांचा विक्रम मोडला. भारत- २०-०
भारतीय संघाला आठ षटकात ९१ धावा हव्या आहेत. मॅथ्यू वेडने ऑस्ट्रेलिया संघाला षटकात सलग तीन षटकार खेचत ९० धावा पर्यंत पोहचवले. शेवटच्या चेंडूवर स्टीव्ह स्मिथ धावचीत झाला. ऑस्ट्रेलिया ९०-५
कर्णधार ऍरॉन फिंच एक बाजू लढवत होता पण त्याला जसप्रीत बुमाराहने बाद केले. त्याने १५ चेंडूत ३१ धावा केल्या. ५ षटकांत ऑस्ट्रेलियाच्या समाधानकारक धावा झाल्या आहेत. ऑस्ट्रेलिया ४६-४
अक्षर पटेलची आठ षटकांच्या सामन्यात उत्तम गोलंदाजी केली. ऑस्ट्रेलिया ३५-३
अक्षर पटेलची जादू चालली. डेविडने ३ चेंडूत २ धावा केल्या. ऑस्ट्रेलिया ३१-३
पॉवर प्ले मध्ये ऑस्ट्रेलियाची खराब सुरुवात झाली आहे. मॅक्सवेलला अक्षर पटेलने बाद केले.
ऑस्ट्रेलिया १९-२
ऑस्ट्रेलियाने पहिल्या पॉवर प्ले नंतरअडखळत सुरुवात केली आहे. विराटने ग्रीनचा झेल सोडला. पण त्याला धावबाद केले. ऑस्ट्रेलिया १४-१
कमी षटकांचा असल्याने दिनेश कार्तिक आणि ॠषभ पंत या दोघांना संघात स्थान देण्यात आले आहे.
नाणेफेकीचा कौल हा भारतीय संघाकडून गेला असून त्यांनी गोलंदाजी घेतली आहे. भारतीय संघाने अंतिम अकरा मध्ये जसप्रीत बुमराहचा समावेश केला आहे.
दोन षटकांचा पॉवर प्ले असणार असून २ षटकं कमीतकमी एक गोलंदाज गोलंदाजी करू शकतो. आजच्या सामन्यात मध्यांतर नसेल. तसेच ड्रिंक्स ब्रेक पण नसणार आहे.
https://twitter.com/BCCI/status/1573333896997003266?s=20&t=vslYqTVa3Rf0RZRj2MmZpw
आनंदाची बातमी ८ षटकांचा सामना होऊ शकतो. दोन्ही पंचानी खेळपट्टीचे पाहणी केली आहे. त्यानंतर दोन्ही संघांच्या कर्णधारांना नियमांचे कागद दिले आहे. ९.१५ वा. नाणेफेक होणार आहे.
नितीन मेमन आणि पद्मनाभन मुरली कार्तिक सामन्यासंदर्भात बोलत आहेत. ८.४५ वाजता सामना होणार का नाही याचा निर्णय येऊ शकतो. मैदानावरील खेळपट्टीच्या शेजारील भाग थोडा ओलसर आहे.
सामना सुरु होण्यासाठी अजूनही विलंब होत असल्याने सामन्यातील षटकं कमी होऊ शकतात. जसजसा वेळ जाईल तसतसा दोन्ही संघासाठी परिस्थिती अवघड होत जाईल. डकवर्थ लुईसच्या नियमानुसार सामन्यातील षटक देखील कमी होऊ शकतात.
नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर ड्रेनेजची व्यवस्था अतिशय उत्तम आहे. . कितीही पाऊस आला तरीही १५ ते२० मिनिटांत सामना सुरु होऊ शकतो. असे मत पीच क्यूरेटर यांनी मांडले.
७.०० वाजता होणारी नाणेफेक ८ वाजता होणार आहे. मैदान अजूनही दोन्ही बाजूने ओलसर आहे. दोन्ही कर्णधार हे पंचांशी संवाद साधत आहे. पंच अजूनही परीक्षण करत आहे.
मैदान अजूनही दोन्ही बाजूने ओलसर आहे. पण खेळाडू मैदानावर सरावासाठी आले आहे. दोन्ही कर्णधार हे पंचांशी संवाद साधत आहे.
पंचानी केलेल्या परीक्षणानुसार संध्याकाळी ७.०० वाजता नाणेफेक होणार आहे.
ओलसर मैदान आणि खेळपट्टीमुळे नाणेफेकीस उशीर होत आहे. दोन्ही संघाचे कर्णधार परत आतमध्ये गेले आहे. पंच मैदानावरील सर्व परिस्थिती तपासून पाहत आहे.
रवी शास्त्रींसोबत दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी मैदानात पोहचले. जो नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न असेल.
भारत वि. ऑस्ट्रेलिया दुसऱ्या सामन्यात पावसाची शक्यता नाही ही भारतीय चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सुनील गावसकरांनी सध्या सांगितले की ही फलंदाजीला पोषक आहे.