IND vs IRE T20 Series: भारतीय संघ वनडे विश्वचषकापूर्वी आयर्लंडविरुद्ध टी-२० मालिका खेळणार आहे. भारत आणि आयर्लंड यांच्यातील ही टी-२० मालिका १८ ते २३ ऑगस्ट दरम्यान खेळवली जाणार आहे. गेल्या वर्षीही टीम इंडियाने आयर्लंडचा दौरा केला होता, तर यावेळीही मालिका आयोजित केली जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

१८ ते २३ ऑगस्ट दरम्यान सामने होणार आहेत –

क्रिकेट आयर्लंडकडून सांगण्यात आले आहे की, टीम इंडिया १८ ते २३ ऑगस्ट दरम्यान आयर्लंडसोबत तीन सामन्यांची टी-२०मालिका खेळणार आहे. मात्र, अद्याप फारशी माहिती समोर आलेली नाही. मात्र सलग दुसऱ्या वर्षी टीम इंडिया आयर्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. २०२२ मध्ये देखील, टीम इंडियाने आयरिश संघासोबत दोन सामन्यांची मालिका खेळली, जी भारताने हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली २-० ने जिंकली.

आयर्लंडने केले होत प्रभावित –

विशेष म्हणजे भारताने मालिका २-० अशी जिंकली होती. मात्र आयर्लंडच्या खेळाडूंनी भारताविरुद्ध शानदार खेळ दाखवून आपल्या खेळाची छाप पाडली होती. अशा स्थितीत यावेळीही दोन्ही संघांमध्ये चांगलीच स्पर्धा पाहायला मिळू शकते. प्रथमच ही मालिका दोन सामन्यांची होती, मात्र यावेळी मालिका आणखी एका सामन्याने वाढवण्यात आली आहे. ही मालिका आयरिश क्रिकेटच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जाते. कारण टीम इंडियासोबत मालिका खेळल्यास आयर्लंड क्रिकेट बोर्डाच्या कमाईतून त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल. ही मालिका १८ ते २३ ऑगस्ट दरम्यान आयोजित केली जाणार आहे. आयपीएलनंतर आयर्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा केली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा – IND vs AUS 1st ODI: ‘यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते…’, ऑस्ट्रेलियन संघाचा डाव गुंडाळल्यानंतर मोहम्मद सिराजची प्रतिक्रिया

क्रिकेट आयर्लंडचे मुख्य कार्यकारी अधिकारी वॉरेन ड्युट्रोम म्हणाले, “२०२३ चा उन्हाळा पुरुष क्रिकेटसाठी उत्सवाचा असेल. चाहत्यांसाठी ते खूप खास असेल. आम्ही आज पुष्टी करू शकतो की भारत सलग दुसऱ्या वर्षी आयर्लंडचा दौरा करणार आहे. आमचा संघ यापूर्वी विश्वचषक सुपर लीग अंतर्गत मे महिन्यात बांगलादेशविरुद्धच्या वनडे मालिकेत भाग घेईल. आम्ही आधीच जाहीर केले आहे की, आम्ही जूनमध्ये लॉर्ड्सवर एक कसोटी सामना खेळू आणि त्यानंतर सप्टेंबरमध्ये इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळू.”

आयर्लंडचा संघ विश्वचषकासाठी कसा पात्र ठरू शकतो?

वर्ल्ड सुपर लीगबद्दल बोलायचे झाले, तर बांगलादेशचा संघ विश्वचषकासाठी पात्र ठरला आहे, मात्र आयर्लंड संघाला बांगलादेशविरुद्धची मालिका जिंकून पात्रता मिळवायची आहे. मात्र, आयर्लंडला विश्वचषकासाठी पात्र ठरणे सोपे जाणार नाही. वास्तविक, जर आयर्लंड संघाने बांगलादेशविरुद्धची वनडे मालिका ३-० ने जिंकली तर तो विश्वचषकासाठी पात्र ठरू शकतो.

हेही वाचा – Tim Paine: ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार टीम पेन क्रिकेटमधून झाला निवृत्त; अश्लील फोटो प्रकरणामुळं सापडला होता अडचणीत

त्याचवेळी, भारत-आयर्लंड मालिकेत हार्दिक पांड्या भारतीय संघाचे नेतृत्व करणार असल्याचे मानले जात आहे. याआधी जेव्हा दोन संघांमध्ये दोन वनडे सामन्यांची मालिका खेळली गेली होती, तेव्हा त्या भारतीय संघाचा कर्णधारही हार्दिक पांड्या होता.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The indian team will travel to ireland for a three match t20i series vbm