Ireland Qualifies for 2024 T20 World Cup: एडिनबर्गमधील युरोप रीजन क्वालिफायरमधील सामना पावसामुळे रद्द झाल्याने आयर्लंडने २०२४ टी-२० विश्वचषकासाठी पात्रता मिळवली आहे. जर्मनीविरुद्धच्या वॉशआउटने आयर्लंडला ९ गुणांसह सात संघांच्या गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवून दिले. आयर्लंडने पाचपैकी चार सामने जिंकले आणि एकाचा निकाल लागला नाही. हा संघ शुक्रवारी यजमान स्कॉटलंडविरुद्ध शेवटचा सामना खेळणार आहे. मात्र याआधीच हा संघ टी-२० विश्वचषकासाठी पात्र ठरला आहे.

पॉल स्टर्लिंगने व्यक्त केला आनंद –

आयर्लंडचा कर्णधार पॉल स्टर्लिंग म्हणाला, “आज आम्हाला मैदानावर जिंकायचे होते, हे खरे असले तरी पुढील वर्षी होणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठी पात्र ठरल्याचा आम्हाला आनंद आहे. आम्ही एक स्पष्ट योजना घेऊन स्कॉटलंडला आलो होतो. मला वाटते की, आम्ही त्या योजनेवर काम केले आहे. म्हणून आम्ही आज दुपारी केलेल्या कामाचा उत्सव साजरा करू, परंतु उद्या एक ट्रॉफी पणाला लागली आहे. पुढील महिन्यात भारताच्या टी-२० मालिकेत ही विजयी मालिका सुरू ठेवण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.”

ajit pawar
उद्या मंत्रिमंडळ विस्तार? अजित पवार यांचा दावा; दोन दिवसांच्या चर्चेत सूत्र निश्चित
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
IND vs AUS 3rd Test Match Timing Date Venue What Time Does the Gabba Test Start
IND vs AUS: भारत-ऑस्ट्रेलिया गाबा कसोटी पहाटे किती वाजता सुरू होणार? जाणून घ्या योग्य वेळ
IND vs AUS 3rd Test Rain to Play Spoilsport in Brisbane Weather Update India WTC Qualification
IND vs AUS: ब्रिस्बेनमधील पाऊस आणणार भारताच्या WTC फायनलच्या शर्यतीत अडथळा, गाबा कसोटी रद्द झाली तर काय होणार?
NEET Postgraduate Exam Schedule Announced Wardha news
नीट पदव्युत्तर परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; वैद्यक आयोग म्हणतो…
WTC Final Qualification Scenario How Team India Can Qualify After Falling Behind South Africa and Australia
WTC Qualification Scenario: टीम इंडिया आफ्रिका-ऑस्ट्रेलियाने मागे टाकल्यानंतर WTC फायनलमध्ये कशी पोहोचणार? कसं आहे समीकरण
Devendra Fadnavis returns as Chief Minister and visits his hometown for first time at 3 pm Thursday
मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला १०० दिवसांचे लक्ष्य
UPSC CSE Mains Result 2024 : यूपीएससी नागरी सेवा मुख्य परीक्षा 2024 चा निकाल जाहीर; ‘येथे’ ऑनलाइन पाहा निकाल

इटलीला पात्र ठरण्यासाठी काय समीकरण आहे?

स्कॉटलंड स्वतः पात्र ठरण्याच्या मार्गावर आहे. त्यांनी चार सामन्यांत चारही सामने जिंकले आहेत. त्याचा नेट रन रेट ५.७३२ इटली (-१.३८८) पेक्षा खूप जास्त आहे. पात्र होण्यासाठी, इटलीला ऑस्ट्रिया आणि जर्मनीविरुद्धचे त्यांचे उर्वरित दोन्ही सामने जिंकावे लागतील. त्याचबरोबर स्कॉटलंडने डेन्मार्क आणि आयर्लंडविरुद्धचे दोन्ही सामने गमावावे, अशी आशा करावी लागेल.

हेही वाचा – Arjun Tendulkar: विराट कोहलीच्या वाटेवर उतरला अर्जुन तेंडुलकर, शर्टलेस सेल्फीमध्ये दाखवले सिक्स पॅक ॲब्स

आयर्लंड आणि स्कॉटलंडने २०२२ मध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या टी-२० विश्वचषकातील कामगिरीच्या आधारे युरोपियन पात्रता फेरीत स्वयंचलितपणे प्रवेश मिळवला. जर्मनी आणि जर्सी यांनी २०२२ च्या जागतिक पात्रता फेरीत सहभागी होऊन पात्रता फेरीत स्थान मिळवले, तर ऑस्ट्रिया, डेन्मार्क आणि इटलीने आपापल्या प्रादेशिक पात्रता जिंकून त्यांचे स्थान मिळवले.

विश्वचषक ही २० संघांची स्पर्धा असेल –

२०२४ टी-२० विश्वचषक, वेस्ट इंडिज आणि यूएसएद्वारे संयुक्तपणे आयोजित केला जाणार आहे. ही २० संघांची स्पर्धा असणार आहे. पहिल्या फेरीसाठी संघांची प्रत्येकी पाचच्या चार गटात विभागणी केली जाईल. प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ सुपर ८ साठी पात्र ठरतील. सुपर ८ संघांना प्रत्येकी चारच्या दोन गटात विभागले जाईल आणि प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत पोहोचतील.

हेही वाचा – IND vs WI ODI Series: टीम इंडियाचे खेळाडू संतापल्याने व्यवस्थापनाचे बीसीसीआयला पत्र, जाणून घ्या काय आहे कारण?

१२ संघ सहभागी होणार आहेत –

प्रादेशिक पात्रता फेरीतून बारा संघ आधीच पुढील टी-२० विश्वचषकासाठी पात्र ठरले आहेत. यजमान वेस्ट इंडिज आणि यूएसए व्यतिरिक्त ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, नेदरलँड, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, अफगाणिस्तान आणि बांगलादेश पात्र ठरले आहेत. ईस्ट एशिया पॅसिफिक क्वालिफायर सध्या पापुआ न्यू गिनी येथे सुरू आहे. यजमान चार संघांच्या टेबलमध्ये अव्वल स्थानावर आहेत. या स्पर्धेतील अव्वल संघ टी-२० विश्वचषकासाठी पात्र ठरेल. येत्या काही महिन्यांत अमेरिका, आफ्रिका आणि आशियासाठी पात्रता स्पर्धा होणार आहेत. आठ जागांसाठी स्पर्धा होणार आहे.

Story img Loader