अलौकिक कामगिरी

* पेले यांनी ९२ अधिकृत आंतरराष्ट्रीय सामन्यांत ब्राझीलचे प्रतिनिधित्व करताना ७७ गोल नोंदवले. ब्राझीलकडून सर्वाधिक गोलचा विक्रम अनेक वर्षे पेले यांच्या नावेच होता. मात्र, नुकत्याच झालेल्या विश्वचषक स्पर्धेदरम्यान नेयमारने पेले यांच्या विक्रमाशी बरोबरी साधली.

* पेले यांनी ब्राझीलमधील नामांकित क्लब सॅण्टोससाठी ६५९ सामन्यांत सर्वाधिक ६४३ गोल झळकावले.

nashik Police inspected various places to prevent use of nylon manja
पतंगबाजीत सारेच दंग, पोलिसांचे नायलाॅन मांजावर लक्ष
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Image Of Walmik Karad
Walmik Karad : वाल्मिक कराडवर मकोका लावल्यानंतर परळीत तरुणीकडून आत्मदहनाचा प्रयत्न
Suresh Dhas on Walmik Karad
Walmik Karad MCOCA: वाल्मिक कराडवर मकोका, परळी बंदची हाक; सुरेश धस म्हणाले, “SIT ने आता…”
terrorist cases are investigated with caste bias
प्रत्येक दहशतवादी प्रकरणाचा तपास जातीय पूर्वग्रहातून, दोषसिद्ध आरोपींचा उच्च न्यायालयातील अपिलात आरोप
Eknath Shinde , Rickshaw ,
VIDEO : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हाती पुन्हा रिक्षाचे स्टेरिंग, शिंदे यांनी दिला जुन्या आठवणींना पुन्हा उजाळा
Supriya sule and pankaja Munde
Supriya Sule : “बीडची बदनामी केली जातेय”, पंकजा मुंडेंच्या टीकेवर सुप्रिया सुळेंचा पलटवार; म्हणाल्या, “कोणताही जिल्हा…”
2 year old girl die while playing due to car accident
नागपूर : दोन वर्षीय चिमुकलीने आईच्या कुशीत सोडला जीव…

* पेले यांनी आपल्या कारकिर्दीत एकूण १३६३ सामने खेळताना तब्बल १२८३ गोल नोंदवले. यात ९२ हॅट्ट्रिकचाही समावेश होता.

* ब्राझीलच्या तीन विश्वचषक विजेत्या (१९५८, १९६२, १९७०) संघांत पेले यांचा सहभाग होता. खेळाडू म्हणून सर्वाधिक विश्वचषक विजयांचा विक्रम पेले यांच्याच नावे आहे. 

* सर्वात लहान वयात विश्वविजेतेपद (१७ वर्षे २४९ दिवस) मिळवण्याचा विक्रम पेले यांच्या नावे आहे.

* विश्वचषक स्पर्धेत गोल करणारे पेले सर्वात युवा खेळाडू (१७ वर्षे २३९ दिवस, वि. वेल्स १९५८) आहेत.

* १९९० मध्ये वयाच्या ५०व्या वर्षी एका मैत्रीपूर्ण सामन्यात पेले यांनी ब्राझीलचे कर्णधारपद भूषवले होते.

पेले यांच्या खेळाची वैशिष्टय़े

ब्राझीलकडून आंतरराष्ट्रीय पदार्पण केल्यावर १९५८च्या विश्वचषक स्पर्धेपासून पेले यांचे नाव फुटबॉल विश्वात झळकू लागले. इतर खेळाडूंच्या चालींचा अंदाज घेऊन, चेंडूवर नियंत्रण ठेवत अचूक किक मारण्याची त्यांची क्षमता आजही अनेकांसाठी प्रेरक ठरते. चेंडू पायात खेळवून प्रतिस्पर्धी संघाच्या गोलकक्षात धडकून गोल करणे ही पेलेंच्या वैयक्तिक गोलची खासियत. त्यातही गोलकक्षात कॉर्नरवरून किंवा बाजूने हवेतून पास आल्यावर स्वत:ला जागा करून घेत ‘बायसिकल किक’ने गोल करणे ही जणू पेले यांची ओळख झाली. आजही ‘बायसिकल किक’ने गोल झाला की पहिली आठवण पेलेंचीच येते.

आणखी वाचा – अग्रलेख : फुटबॉलसिम्फनी संपली!

भारताशी नाते

पेले १९७७मध्ये पहिल्यांदा कोलकातामध्ये आले होते. २४ सप्टेंबर १९७७ रोजी इडन गार्डन्स मैदानात न्यूयॉर्क कॉसमॉस संघाकडून मोहन बागानविरुद्ध खेळणाऱ्या पेलेंकडे सर्वाचे लक्ष होते. या सामन्यात मोहन बागानने पेलेंना गोल करू दिला नाही. मोहन बागानने संध्याकाळी पेले यांचा सत्कार समारंभ ठेवला होता. या कार्यक्रमात पेले यांचे लक्ष खेळाडूंना भेटण्याकडे होते. पेले ऑक्टोबर २०१५मध्ये दिल्ली येथे आले होते आणि त्यांनी फुटबॉलपटू म्हणून नाही तर, खेळाचा दूत म्हणून लोकांचे मने जिंकली होती. १७ ऑक्टोबर २०१५ रोजी आंबेडकर स्टेडियमवर सुब्रोतो चषक आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

वयाच्या १६व्या वर्षीच व्यावसायिक पदार्पण

त्रेस कोराकोएस या एका लहानशा शहरात जन्मलेल्या पेले यांच्यातील फुटबॉल गुण एका स्थानिक खेळाडूने हेरले. त्याने पेले यांना वयाच्या ११व्या वर्षी सॅण्टोस क्लबच्या युवा संघात दाखल करून घेतले. त्यानंतर पेले यांना वरिष्ठ संघात प्रवेश मिळवण्यासाठी वेळ लागला नाही. ५ फूट ८ इंच उंची आणि कमी वय असूनही पेले यांना आपल्यापेक्षा वयाने कितीतरी मोठय़ा खेळाडूंविरुद्ध गोल करण्यात सहज यश येत होते. त्यामुळे १९५६ मध्ये वयाच्या १६व्या वर्षीच पेले यांना सॅण्टोस संघाकडून व्यावसायिक फुटबॉलमध्ये पदार्पणाची संधी मिळाली. त्यानंतर पुढील वर्षीच त्यांना ब्राझीलकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये पदार्पण केले.

१९५८च्या विश्वचषकासाठी पेले यांची केवळ राखीव खेळाडू म्हणून निवड झाली होती, पण ही स्पर्धा संपेपर्यंत ते ब्राझीलचे प्रमुख खेळाडू बनले. त्यांनी प्रतिस्पर्धी संघातील बचावपटूच्या डोक्यावरून चेंडू ‘फ्लिक’ करत नंतर उत्कृष्ट फटका मारून विश्वचषकातील आपला पहिला गोल केला होता. हा विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वोत्तम गोलपैकी एक मानला जातो.

हेही वाचा – ब्राझील फुटबॉलपटू पेले यांचा जीवनप्रवास पाहायचा आहे का? नेटफ्लिक्सवरील ‘हा’ बायोपिक नक्की पाहा

अमेरिकेत फुटबॉलच्या लोकप्रियतेला हातभार

पेले यांनी जवळपास दोन दशके सॅण्टोस संघाचे प्रतिनिधित्व केले. त्यानंतर १९७५मध्ये त्यांनी उत्तर अमेरिकन सॉकर (फुटबॉल) लीगमधील न्यूयॉर्क कॉसमॉस संघाशी करार केला. कारकीर्दीच्या अंतिम टप्प्यावर असूनही पेले यांनी तीन हंगामांतील १०७ सामन्यांत ६६ गोल केले. तसेच १९७७मध्ये त्यांनी कॉसमॉस संघाला या स्पर्धेचे जेतेपद मिळवून दिले. पेले यांच्यामुळे अमेरिकेत फुटबॉलच्या लोकप्रियतेला हातभार लागला. पेले यांनी १९७७मध्ये न्यूयॉर्क कॉसमॉस आणि सॅण्टोस यांच्यातील मैत्रीपूर्ण सामन्यासह फुटबॉलमधून निवृत्ती स्वीकारली. न्यू जर्सीमध्ये झालेला हा सामना पाहण्यासाठी ७७ हजार प्रेक्षक स्टेडियममध्ये उपस्थित होते.

आणखी वाचा – विश्लेषण: पेले… फुटबॉलमधील अद्भुत दंतकथा!

विश्वचषक आणि पेले

’विश्वचषक फुटबॉल स्पर्धा आणि पेले हे जणू एक समीकरण होते. त्यांनी चार विश्वचषकांमध्ये (१९५८, १९६२, १९६६, १९७०) ब्राझीलचे प्रतिनिधित्व करताना १४ सामन्यांत १२ गोल केले होते.

’१९५८मध्ये विश्वचषक पदार्पणात केलेल्या कामगिरीमुळे पेले यांना वेगळी ओळख मिळाली. त्यांनी या स्पर्धेच्या चार सामन्यांत सहा गोल नोंदवले होते. यापैकी स्वीडनविरुद्धच्या अंतिम सामन्यातही त्यांनी दोन गोल केले.

’पुढे १९६२च्या स्पर्धेत त्यांना स्नायूची दुखापत झाली आणि त्यांना दोन सामनेच खेळता आले. मात्र, ब्राझीलने विश्वविजेतेपद राखले. १९६६च्या स्पर्धेत ब्राझीलचे आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आले. त्यामुळे पेलेंनी निवृत्तीचा निर्णय घेण्याची तयारी दर्शवली.

’पेलेंचे मन वळविण्यात यश आले आणि १९७०मध्ये ते पुन्हा विश्वचषक स्पर्धेत खेळले. तेव्हा ब्राझीलने तिसरे विजेतेपद पटकावले.

मैदानाबाहेरचे पेले

पेले १९९४मध्ये युनेस्कोचे शांतता राजदूत होते. त्यानंतर १९९५ ते १९९८ ते ब्राझीलमध्ये क्रीडामंत्री राहिले. ब्राझील फुटबॉल संघटनेतील भ्रष्टाचार दूर करण्यासाठी त्यांनी एक कायदाच केला. तो ‘पेले लॉ’ म्हणून ओळखला गेला. पेले ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी उत्सुक होते, पण त्यांचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. त्यांनी अनेक यशस्वी माहितीपटात आणि लघुपटात काम केले. त्यांना संगीताचीही जाण होती. त्यांनी अनेक संगीतमय रचनाही केल्या. त्यांनी १९९७मध्ये प्रसारित झालेल्या पेले या चरित्रपटाच्या संगीत नियोजनाचीही जबाबदारी सांभाळली होती. त्यांनी अनेक प्रसिद्ध आत्मचरित्रेही प्रकाशित केली.

हेही वाचा – Colon Cancer: प्रसिद्ध फुटबॉलपटू पेले यांचे कोलन कॅन्सरमुळे निधन; जाणून घ्या ‘या’ आजाराची लक्षणे आणि योग्य उपचार

सॅण्टोस शहरात अंत्यसंस्कार

साओ पावलो : पेले यांनी ज्या मैदानावर कारकीर्दीतील संस्मरणीय सामने खेळले, त्याच मैदानावर सोमवार (२ जानेवारी) आणि मंगळवारी (३ जानेवारी) त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.  चाहत्यांना व्हिला बेलमिरो स्टेडियममध्ये पेले यांचे अंतिम दर्शन घेता येईल, असे सॅण्टोस क्लबकडून सांगण्यात आले. पेले यांचे पार्थिव अ‍ॅल्बर्ट आइन्स्टाइन रुग्णालयातून निघेल आणि मैदानाच्या मधोमध त्यांना ठेवण्यात येईल. लोकांना सोमवार सकाळी दहा वाजल्यापासून मंगळवारी सकाळी दहा वाजेपर्यंत त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेता येणार आहे. सॅण्टोसच्या रस्त्यांवर पेले यांची अंतिम यात्रा काढली जाईल आणि ही यात्रा त्यांची १०० वर्षीय आई सेलेस्टे यांच्या घराच्या समोरून जाईल.

सन्मान

१९७८ : आंतरराष्ट्रीय शांतता पुरस्कार.

१९८० : फ्रान्समधील एल इक्विपे या क्रीडा प्रकाशनाने त्यांना शतकातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरवले.

१९९७ : ब्रिटिश राजघराण्याचा नाईटहूड पुरस्कार.

१९९९ : आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीकडूनही शतकातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून सन्मान.

२०१४ : ब्राझीलमध्ये सॅण्टोस येथे पेलेंच्या नावाने संग्रहालय.

Story img Loader