T20 World Cup 2024 logo launcehed : नुकतीच आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ स्पर्धा पार पडली. या स्पर्धेतील अंतिम सामन्यात १९ नोव्हेंबर रोजी नरेंद्र मोदी स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाने भारताला पराभूत विश्वचषकावर नाव कोरले. त्यामुळे भारतीय चाहत्यांच्या पदरी निराशा आली. आता चाहत्यांना टी-२० विश्वचषकाची उत्सुकता लागली आहे. आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषकाचा आगामी हंगाम वेस्ट इंडिज आणि यूएसएमध्ये आयोजित केला जाणार आहे. आयसीसीने आगामी स्पर्धेचा नवीन लोगोही जारी केला आहे.
आयसीसीने एक व्हिडीओ शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. त्याचबरोबर जॉन्स नावाच्या एका युजर्सने सोशल मीडियावर नवीन लोगोचे छायाचिकत्र शेअर केले आहे. त्याने हा फोटो एक्सवर शेअर करताना यूजर्सनी लिहिले आहे की, ‘टी-२० विश्वचषक २०२४ चा लोगो….!!!!!’ सर्वांच्या नजरा अमेरिका आणि वेस्ट इंडिजवर आहेत.
आयसीसीने आगामी स्पर्धेशी संबंधित एक व्हिडीओही शेअर केला आहे. शेअर केलेल्या व्हिडिओच्या माध्यमातून आगामी सीझनच्या लोगोची माहिती देण्यात आली आहे. हा व्हिडीओ शेअर करताना बोर्डाने लिहिले आहे की, ‘बॅट, बॉल आणि एनर्जी या तीन गोष्टी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटची व्याख्या सांगतात! आयसीसी टी-२० विश्वचषकासाठी एक आकर्षक नवीन रूप.
हेही वाचा – Brian Lara : विराट कोहली सचिनचा १०० शतकांचा विक्रम मोडू शकत नाही, माजी खेळाडूंने सांगितले कारण
आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक २०२४ स्पर्धेची आगामी आवृत्ती वेस्ट इंडिज आणि यूएसएमध्ये होणार आहे. त्याचबरोबर ४ जून ते ३० जून २०२४ दरम्यान खेळवली जाणार आहे. महिला क्रिकेट टी-२० विश्वचषक बांगलादेशमध्ये आयोजित केला जाणार आहे. सध्या या स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले नाही. आयसीसीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये असे म्हटले आहे की, नवीन लोगो क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये वेगाने बदलणाऱ्या घटनांना प्रतिबिंबित करतो. नवीन लोगो यजमान देशांकडून प्रेरित होऊन बनवला आहे, परंतु हा सतत ऊर्जा प्रतिबिंबित करतो.
जॉन्स नावाच्या युजरने आपल्या दुसऱ्या पोस्टमध्ये आतापर्यंतच्या लोगोंचा फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये २००७ पासून ते २०१४ पर्यंच्या लोगोंचा समावेश आहे. सर्वात पहिला टी-२० विश्वचषक २००७ साली दक्षिण आफ्रिकेत आयोजित केला होता. त्यानंतर इंग्लंड (२००९), वेस्ट इंडिज २०१०, श्रीलंका (२०१२), बांगलादेश (२०१४), भारत (२०१६), ऑस्ट्रेलिया (२०२२) आता वेस्ट इंडिज आणि अमेरिका (२०२४) येथे आयोजन होणार आहे.