Team India management’s letter to BCCI: रोहितच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया आजपासून (२७ जुलै) यजमान विंडीजविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळणार आहे. मात्र सोमवारी रात्री, कसोटी मालिका संपल्यानंतर अवघ्या एका दिवसानंतर, असे काही घडले की, खेळाडूंचा मूड इतका खराब झाला की व्यवस्थापनाला बीसीसीआयला पत्र लिहावे लागले. खरेतर, ज्या दिवशी पोर्ट ऑफ स्पेनमध्ये दुसरा कसोटी सामना संपला, त्याच दिवशी भारतीय खेळाडूंना रात्री ११ वाजता बार्बाडोसला जाण्यासाठी विमान पकडायचे होते.

त्यासाठी खेळाडूंनी ८:४० वाजता हॉटेल सोडले, परंतु खेळाडूंना विमानतळावर बराच वेळ थांबावे लागले. त्यामुळे खेळाडूंमध्ये बीसीसीआयबद्दल नाराजी निर्माण झाली. त्यानंतर प्रकरण इथपर्यंत पोहोचले की, वरिष्ठ खेळाडूंनी सरावातून एक दिवसाची रजा मागितली.खरं तर असं झालं की वाट पाहत एवढा वेळ निघून गेला की ११ ऐवजी पहाटे तीन वाजता फ्लाइट मिळाली. त्यामुळे दिवसभर क्रिकेट खेळून एवढा उशीर झाल्यानंतर दमलेल्या कोणत्याही माणसाचा मूड खराब होणार हे उघड आहे.

IND vs AUS virat Kohli Is Emotional Said Glenn MacGrath Urges Australia to Go Hard on Him in Border Gavaskar Trophy
IND vs AUS: “विराट कोहली भावनिक आहे, त्याचा फायदा…”, ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूने कांगारू संघाला दिला मोलाचा सल्ला
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
Sourav Ganguly agrees with Gautam Gambhir opinion
Sourav Ganguly : ‘तो जे बोलला ते योग्यच…’, गौतम गंभीरने रिकी पॉन्टिंगला दिलेल्या प्रत्युत्तरावर सौरव गांगुलीचे वक्तव्य
aishwarya rai and abhishek bachchan
“सेटवर आम्ही कधीच त्यांना…”, ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चनबाबत अभिनेता म्हणाला, “त्यांच्या नात्यामुळे…”
IND vs AUS Paine criticism of Gautam Gambhir ahead Border Gavaskar Trophy
IND vs AUS : ‘… तो भारतीय क्रिकेट संघासाठी योग्य नाही’, रिकी पॉन्टिंगनंतर टिम पेनने गौतम गंभीरवर साधला निशाणा
Sachin Tendulkar Cryptic post about Steve Bucknor
Sachin Tendulkar : सचिन तेंडुलकरच्या ‘त्या’ पोस्टने चाहत्यांच्या वाईट आठवणी झाल्या ताज्या, ‘हा’ अनुभवी अंपायर पुन्हा आला चर्चेत
KL Rahul Injured in Intra Squad Match Simulation Session Perth Walks Off Field for Scanning Ahead Border Gavaskar Trophy IND vs AUS
IND vs AUS: भारताला पर्थ कसोटीपूर्वी मोठा धक्का, केएल राहुलला सराव सामन्यात दुखापत, सोडावं लागलं मैदान!

एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, व्यवस्थापनाने बीसीसीआयला पत्र लिहून उड्डाणाबाबत चांगले नियोजन करण्याची विनंती केली आहे. रात्रीच्या प्रवासामुळे खेळाडूंना आवश्यक विश्रांती मिळत नसल्याने रात्रीऐवजी सकाळच्या विमानाची व्यवस्था करण्यास व्यवस्थापनाने सांगितले आहे. बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले की, खेळाडू हॉटेलमधून रात्री ८:४० वाजता विमानतळासाठी निघाले होते, मात्र त्यांना विमानतळावर बराच वेळ थांबावे लागले. त्यामुळे व्यवस्थापनाने आम्हाला रात्रीच्या फ्लाइटऐवजी सकाळचे फ्लाइट बुक करण्याची विनंती केली आहे. यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे दिवसभर खेळल्यानंतर खेळाडूंना विश्रांती न मिळणे आहे. सामन्यानंतर खेळाडूंना विश्रांती हवी आहे. त्यांची मागणी आम्ही मान्य केली असून पुढील वेळापत्रकात बदल करण्याचा आमचा विचार असल्याचे सूत्राने सांगितले.

हेही वाचा – Arjun Tendulkar: विराट कोहलीच्या वाटेवर उतरला अर्जुन तेंडुलकर, शर्टलेस सेल्फीमध्ये दाखवले सिक्स पॅक ॲब्स

२४ जुलैच्या रात्री तीन वाजता उड्डाण घेतल्यानंतर भारतीय संघ पहाटे पाच वाजता बार्बाडोसला पोहोचला. अहवालानुसार, काही वरिष्ठ खेळाडूंनी विलंबामुळे सरावातून एक दिवस सुट्टी देण्याची विनंतीही केली होती. भारतीय संघ तिसऱ्या वनडे आणि पहिल्या टी-२० सामन्यासाठी पुन्हा त्रिनिदादला परतणार आहे. दुसरा आणि तिसरा टी-२० गयाना येथे खेळवला जाईल, तर चौथा आणि पाचवा टी-२० फ्लोरिडा (यूएसए) येथे खेळवला जाईल.