वृत्तसंस्था, पॅरिस

क्रीडाविश्वात सर्वांत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धांच्या यंदाच्या पर्वाला आज, शुक्रवारपासून पॅरिस येथे अधिकृतरीत्या प्रारंभ होणार आहे. परंपरेला धरूनच चालणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धा या वेळी मात्र उद्घाटन सोहळ्यापासूनच चौकटीबाहेर पडणाऱ्या ठरणार आहेत. ऑलिम्पिकच्या परंपरेला छेद देत यंदाच्या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा बंदिस्त स्टेडियमऐवजी पॅरिसमधील प्रसिद्ध आयफेल टॉवरच्या शेजारून वाहणाऱ्या सीन नदीच्या पात्रात पार पडणार आहे.

Sensex Nifty decline on sales in Reliance print eco news
रिलायन्समधील विक्रीची सेन्सेक्स, निफ्टीला झळ
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
Donald trump Vladimir putin
विश्लेषण: ‘मित्र’ पुतिन यांच्या सतत संपर्कात असतात ट्रम्प? नव्या पुस्तकातील दाव्याने युक्रेनच्या चिंतेत भर?
local train new timetable
विश्लेषण: मध्य रेल्वे लोकलच्या नव्या वेळापत्रकाबाबत प्रवासी वर्ग नाराज का?
One crore reward Manyachiwadi, Manyachiwadi,
सातारा : मान्याचीवाडी अव्वलस्थानासह एक कोटीच्या बक्षिसाची मानकरी, ‘माझी वसुंधरा’ अभियानात प्रथम क्रमांकाची ‘हॅट्रिक’
2nd October Gandhi Jayanti Physical Mental Violence Religion
बदलतं जग आणि महात्मा
chess olympiad 2024, india women participants
बुद्धीबळ सम्राज्ञी… बुध्दीबळ ऑलिंपियाडमधल्या ‘त्या’ पाचजणी आहेत तरी कोण?
Manufacturing and service sector activity limited in September print
निर्मिती, सेवा क्षेत्राच्या सक्रियतेला सप्टेंबर महिन्यात मर्यादा,सप्टेंबरमध्ये संमिश्र पीएमआय निर्देशांक २०२४च्या नीचांकावर

ऑलिम्पिक स्पर्धेच्या १२८ वर्षांच्या इतिहासात प्रथमच असा सोहळा रंगणार आहे. या वेळचा उद्घाटन सोहळा शहरातील खेळाच्या एकात्मतेचे वेगळे प्रतीक म्हणून उभे राहणार आहे. सीन नदीवर होणाऱ्या या सोहळ्यात खेळाडूंचे संचलनच नाही, तर सांस्कृतिक कार्यक्रमही बोटीवरच होणार असून, ऑलिम्पिकचे पदाधिकारीही बोटीवरूनच खेळाडूंची मानवंदना स्वीकारणार आहेत.

हेही वाचा >>>Jasprit Bumrah: “सर्वजण एकत्र होतो अन् त्याला…” हार्दिकची हुर्याे उडवली जात असताना MI संघात कसं वातावरण होतं? बुमराहचं मोठं वक्तव्य

उद्घाटन सोहळा सुरुवातीला सर्व प्रेक्षकांसाठी मोफत ठेवण्यात येणार होता. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव केवळ दोन लाख आमंत्रितांनाच नदीच्या काठावरून सोहळा बघायला मिळणार आहे. उर्वरित नागरिक आणि चाहते नदीपात्राच्या वरील बाजूवरून सोहळ्याचा आनंद घेऊ शकणार आहेत. यासाठी परिसरात तब्बल ८० प्रशस्त स्क्रीन लावण्यात आल्या आहेत. खेळाडूंचे संचलन हे या सोहळ्याचे खरे आकर्षण राहणार आहे. फ्रान्समधील वेळेनुसार, संध्याकाळी ७.३० वाजता जॉर्डिन डेस प्लांटेसजवळील ऑस्टरलिट्झ ब्रिजपासून या नदीतील संचलनास सुरुवात होणार आहे. टोरकॅडेरो येथे हे संचलन संपेल आणि तेथे उद्घाटन सोहळ्याचे अन्य कार्यक्रम पार पडतील.

शरथ, सिंधू भारताचे ध्वजवाहक

सीन नदीवर होणाऱ्या ऐतिहासिक उद्घाटन सोहळ्यासाठी भारताचे ध्वजवाहक म्हणून टेबल टेनिसपटू शरथ कमल आणि बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू यांची निवड करण्यात आली आहे. शरथची ही पाचवी ऑलिम्पिक स्पर्धा आहे, तर सिंधू यंदा तिसरे ऑलिम्पिक पदक जिंकण्याच्या प्रयत्नात आहे. उद्घाटन सोहळ्यातील संचलनात भारतीय पथक ८४व्या क्रमांकावर येईल.

उद्घाटन सोहळ्याबाबत…

● कुठे : सीन नदीच्या पात्रात

● किती अंतर : एकूण सहा किलोमीटर संचलन

● किती बोटी : खेळाडू आणि पदाधिकारी, कलाकार अशा सर्वांसाठी एकूण ९५ बोटी

● सहभाग : २०५ देशांच्या खेळाडूंचा सहभाग

● कोणाची उपस्थिती : सांस्कृतिक सोहळा कसा असेल याविषयी गुप्तता बाळगली असली, तरी सेलिन डियॉन आणि लेडी गागा या दोन अभिनेत्री-गायिका, फ्रान्सची प्रसिद्ध गायिका आया नाकामुरा यांचे सादरीकरण

● ऑलिम्पिक ज्योत : अमेरिकन रॅपर स्नूप डॉग आणि अभिनेत्री सल्मा हायेक अखेरचे ज्योतवाहक

● वेळ : रात्री ११ वा.

● थेट प्रक्षेपण : स्पोर्ट्स १८-१, जिओ सिनेमा अॅप