वृत्तसंस्था, पॅरिस
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
क्रीडाविश्वात सर्वांत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धांच्या यंदाच्या पर्वाला आज, शुक्रवारपासून पॅरिस येथे अधिकृतरीत्या प्रारंभ होणार आहे. परंपरेला धरूनच चालणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धा या वेळी मात्र उद्घाटन सोहळ्यापासूनच चौकटीबाहेर पडणाऱ्या ठरणार आहेत. ऑलिम्पिकच्या परंपरेला छेद देत यंदाच्या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा बंदिस्त स्टेडियमऐवजी पॅरिसमधील प्रसिद्ध आयफेल टॉवरच्या शेजारून वाहणाऱ्या सीन नदीच्या पात्रात पार पडणार आहे.
ऑलिम्पिक स्पर्धेच्या १२८ वर्षांच्या इतिहासात प्रथमच असा सोहळा रंगणार आहे. या वेळचा उद्घाटन सोहळा शहरातील खेळाच्या एकात्मतेचे वेगळे प्रतीक म्हणून उभे राहणार आहे. सीन नदीवर होणाऱ्या या सोहळ्यात खेळाडूंचे संचलनच नाही, तर सांस्कृतिक कार्यक्रमही बोटीवरच होणार असून, ऑलिम्पिकचे पदाधिकारीही बोटीवरूनच खेळाडूंची मानवंदना स्वीकारणार आहेत.
उद्घाटन सोहळा सुरुवातीला सर्व प्रेक्षकांसाठी मोफत ठेवण्यात येणार होता. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव केवळ दोन लाख आमंत्रितांनाच नदीच्या काठावरून सोहळा बघायला मिळणार आहे. उर्वरित नागरिक आणि चाहते नदीपात्राच्या वरील बाजूवरून सोहळ्याचा आनंद घेऊ शकणार आहेत. यासाठी परिसरात तब्बल ८० प्रशस्त स्क्रीन लावण्यात आल्या आहेत. खेळाडूंचे संचलन हे या सोहळ्याचे खरे आकर्षण राहणार आहे. फ्रान्समधील वेळेनुसार, संध्याकाळी ७.३० वाजता जॉर्डिन डेस प्लांटेसजवळील ऑस्टरलिट्झ ब्रिजपासून या नदीतील संचलनास सुरुवात होणार आहे. टोरकॅडेरो येथे हे संचलन संपेल आणि तेथे उद्घाटन सोहळ्याचे अन्य कार्यक्रम पार पडतील.
शरथ, सिंधू भारताचे ध्वजवाहक
सीन नदीवर होणाऱ्या ऐतिहासिक उद्घाटन सोहळ्यासाठी भारताचे ध्वजवाहक म्हणून टेबल टेनिसपटू शरथ कमल आणि बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू यांची निवड करण्यात आली आहे. शरथची ही पाचवी ऑलिम्पिक स्पर्धा आहे, तर सिंधू यंदा तिसरे ऑलिम्पिक पदक जिंकण्याच्या प्रयत्नात आहे. उद्घाटन सोहळ्यातील संचलनात भारतीय पथक ८४व्या क्रमांकावर येईल.
उद्घाटन सोहळ्याबाबत…
● कुठे : सीन नदीच्या पात्रात
● किती अंतर : एकूण सहा किलोमीटर संचलन
● किती बोटी : खेळाडू आणि पदाधिकारी, कलाकार अशा सर्वांसाठी एकूण ९५ बोटी
● सहभाग : २०५ देशांच्या खेळाडूंचा सहभाग
● कोणाची उपस्थिती : सांस्कृतिक सोहळा कसा असेल याविषयी गुप्तता बाळगली असली, तरी सेलिन डियॉन आणि लेडी गागा या दोन अभिनेत्री-गायिका, फ्रान्सची प्रसिद्ध गायिका आया नाकामुरा यांचे सादरीकरण
● ऑलिम्पिक ज्योत : अमेरिकन रॅपर स्नूप डॉग आणि अभिनेत्री सल्मा हायेक अखेरचे ज्योतवाहक
● वेळ : रात्री ११ वा.
● थेट प्रक्षेपण : स्पोर्ट्स १८-१, जिओ सिनेमा अॅप