आयसीसी महिला टी-२० विश्वचषक २०२३ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात १२ फेब्रुवारी रोजी सामना खेळला गेला. या सामन्यात भारताने पाकिस्तानवर ७ विकेट्सने दमदार विजय मिळवला. या विजयानंतर भारत आणि पाकिस्तान संघातील खेळाडूंचा एक सुंदर व्हिडिओ समोर आला आहे. जो पाकिस्तान क्रिकेट मंडळाने ट्विट केला आहे.
प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानच्या महिला क्रिकेट संघाने २० षटकात ४ गडी गमावून १४९ धावा केल्या होत्या, प्रत्युत्तरात भारतीय महिला क्रिकेट संघाने १९ षटकात ३ गडी गमावून १५१ धावा करत सामना जिंकला. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील प्रतिस्पर्धी मैदानावर भयंकर असेल, परंतु मैदानाबाहेर दोन्ही संघांमधील केमिस्ट्री तुमचे मन नक्कीच जिंकेल.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यानंतर दोन्ही संघांचे खेळाडू एकमेकांना भेटले आणि खूप चेष्टा मस्करी केली. त्याचा व्हिडिओ पाकिस्तान क्रिकेटने ट्विट केला आहे. दोन्ही संघातील क्रिकेटपटूंनी एकमेकांना मिठी मारली, सेल्फी काढले आणि जर्सीचीही देवाणघेवाण केली.
भरातीय महिला संघाने रचला इतिहास –
महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेमध्ये भारतीय महिला संघाने आतार्यंतच्या दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात जास्त धावसंख्येचा यशस्वीरित्या पाठलाग केला आहे. पाकिस्तानने भारतासमोर विजयासाठी १५० धावांचे लक्ष्य ठेवले होते. ही धावसंख्या भारताने सात गडी राखून गाठली. सुरुवातीला १५० धावांचे हे लक्ष्य अशक्य वाटत होते. मात्र भारताच्या जेमिमाह रॉड्रिग्जने (५३, नाबाद) आक्रकपणे फलंदाजी केल्यामुळे भारताला हे लक्ष्य गाठणे शक्य झाले. या विजयासाठी भारताने महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेमध्ये दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक धावसंख्येचा यशस्वीपणे पाठलाग केला आहे.
हेही वाचा – WPL Auction 2023: आज, स्मृती मंधाना… हरमनप्रीतशिवाय, कोणत्या भारतीयांवर होऊ शकतो पैशांचा पाऊस? घ्या जाणून
सामन्याबद्दल बोलायचे तर कर्णधार बिस्माह मारूफने ५५ चेंडूत नाबाद ६८ आणि आयशा नसीमने २५ चेंडूत नाबाद ४३ धावा केल्या. या दोघींच्या खेळीच्या जोरावर पाकिस्तानने १४९ धावा केल्या. भारताकडून राधा यादवने ४ षटकांत २१ धावा देत दोन बळी घेतले. प्रत्युत्तरात भारताकडून जेमिमाह रॉड्रिग्जने नाबाद ५३ धावा केल्या. जेमिमाला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.