Photo of Virat Kohli moving bells went viral on social media : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला कसोटी सामना सेंच्युरियन येथे खेळला जात आहे. या सामन्यात विराट कोहली आपल्या फलंदाजीने चाहत्यांचे लक्ष वेधून घेऊ शकला नसला, तरी क्षेत्ररक्षण करताना विराटने असे काहीसे केले. त्यानंतर आता त्याचा फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. विराट कोहलीने मैदानात एक युक्ती केल्याचे चाहते आता गंमतीने सांगत आहेत. त्यानंतर जसप्रीत बुमराहने विकेट घेत दक्षिण आफ्रिकेची भागीदारी तोडली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विराटच्या युक्तीने टीम इंडियाला मिळाली विकेट –

खरं तर, जेव्हा डीन एल्गर आणि टोनी डी जॉर्जी क्रीझवर फलंदाजी करत होते, तेव्हा टीम इंडियाला बराच वेळ एकही विकेट मिळत नव्हती. त्यानंतर ओव्हर संपल्यानंतर विराट कोहली स्टंपजवळ जाऊन बेल्स हलवल्या. यानंतर गोलंदाजीसाठी आलेल्या जसप्रीत बुमराहने विकेट घेत दक्षिण आफ्रिकेची भागीदारी तोडली. बुमराहने टोनी डीजॉर्जला बाद केले. यानंतर विराट कोहलीने बेल्सला हात लावतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत.

विराटपूर्वी इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडनेही इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यादरम्यान असेच काहीसे केले होते. त्यानंतर पुढच्याच षटकात इंग्लंड संघालाही एक विकेट मिळाली होती. आता अनेक यूजर्स विराट कोहली आणि स्टुअर्ट ब्रॉडचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहेत.

हेही वाचा – ODI : स्टार स्पोर्ट्सने २०२३ मधील निवडला सर्वोत्तम एकदिवसीय संघ, आठ भारतीयांसह ‘या’ तीन विदेशी खेळाडूंना दिले स्थान

भारतीय संघाचा पहिला डाव २४५ धावांवर आटोपला –

नाणेफेक हारून प्रथम फलंदाजी स्वीकारल्यानंतर भारतीय संघाचा पहिला डाव दुसऱ्या दिवशी ६७.४ षटकांत २४५ धावांवर आटोपला. आज भारताने आठ विकेट्सवर २०८ धावांवर खेळण्यास सुरुवात केली आणि संघाला ३७ धावांची भर घालता आली. आजचा पहिला धक्का मोहम्मद सिराजच्या (२२ चेंडूत ५ धावा) गेराल्ड कोएत्झीने पॅव्हेलियनमध्ये पाठवला. त्याचवेळी नांद्रे बर्जरने राहुलला क्लीन बॉलिंग देत भारताचा डाव संपवला.

हेही वाचा – World Cup 2024 : युवराज सिंग आणि गौतम गंभीर यांना वाटत नाही भारत टी-२० विश्वचषक जिंकू शकेल, पाहा VIDEO

आज टीम इंडिया मैदानात आली तेव्हा राहुल ७० धावा करून खेळत होता. यानंतर त्याने कोएत्झीच्या चेंडूवर षटकार ठोकून आपल्या कसोटी कारकिर्दीतील आठवे शतक पूर्ण केले. १३७ चेंडूंत १४ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने १०१ धावा करून तो बाद झाला. दक्षिण आफ्रिकेकडून कागिसो रबाडाने सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या आहेत. नांद्रे बर्जरने तीन विकेट्स घेत त्याला मदत केली. मार्को जान्सेन आणि जेराल्ड कोएत्झी यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.