India vs Australia World Cup Final 2023: ऑस्ट्रेलियन संघाने पुन्हा एकदा विश्वचषक जिंकला. फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाचा सहा गडी राखून पराभव केला. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत २४० धावा केल्या, त्यानंतर ऑस्ट्रेलियाने ४ गडी गमावून लक्ष्य गाठले. ऑस्ट्रेलियन संघ सहाव्यांदा विजेतेपद पटकावण्यात यशस्वी ठरला आहे. ऑस्ट्रेलियाच्या विजयात ट्रॅविस हेड नक्कीच सामन्याचा हिरो ठरला, पण त्याशिवाय टीमचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगच्या एका सल्ल्याने ऑस्ट्रेलियाला सामना बदलण्यात मदत झाली. स्वत: पाँटिंगने याबाबत खुलासा केला. तसेच, त्याने टीम इंडियाच्या पराभवावर वादग्रस्त विधान केले आहे.

खरे तर ऑस्ट्रेलियन संघ जेतेपद पटकावण्यात यशस्वी ठरला असताना समालोचन करणाऱ्या पाँटिंगने याबाबत सांगितले की, सामन्यापूर्वी त्याने संघाच्या खेळाडूंशी चर्चा केली होती आणि खेळपट्टीचा जास्त विचार करू नका असे सांगितले होते. पाँटिंग म्हणाला, “मी खेळाडूंशी बोललो, काही खेळाडू खेळपट्टीबद्दल गोंधळले होते, मग मी त्यांच्याशी बोललो. मी त्यांना म्हणालो, खेळपट्टीबद्दल काहीही विचार करू नका. ही फलंदाजीला पोषक अशी खेळपट्टी आहे. २०-२२ यार्डच्या या खेळपट्टीबद्दल जास्त विचार करू नका… तुम्ही जा आणि तुमचे सर्वोत्तम क्रिकेट खेळा, विजय तुमचाच असेल.”

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

याशिवाय पाँटिंगने समालोचन करताना सामन्यादरम्यान भारताच्या पराभवाबाबत धक्कादायक विधान केले. तो बोलताना म्हणाला की, “जी खेळपट्टी भारताला मदत होईल अशी बनवली गेली, त्या खेळपट्टीनेच टीम इंडियाचा विश्वासघात केला.” पाँटिंग पुढे म्हणाला, “खेळपट्टी ही अशियाई उपखंडात जशी असते तशीच होती पण भारतावर त्याचा विपरीत परिणाम झाला.”

हेही वाचा: IND vs AUS: भारताच्या पराभवानंतर वसीम अक्रमने खेळपट्टीबाबत केला प्रश्न उपस्थित; म्हणाला, “दोन्ही संघांना समान संधी…”

ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून भारताविरुद्ध प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सचा हा निर्णय योग्य ठरला. भारतीय संघ केवळ ५० षटकात केवळ २४० धावा करू शकला, त्यानंतर ऑस्ट्रेलियाने ४ गडी गमावून लक्ष्य गाठले. ऑस्ट्रेलियन डावाच्या पहिल्या १० षटकांमध्ये भारतीय संघ सामना जिंकू शकेल असे वाटत होते परंतु नंतर खेळपट्टीने आपला रंग बदलला, ज्यामुळे नंतर खेळपट्टी फलंदाजांसाठी सोपी झाली. ज्यावर ट्रॅविस हेडने आपले शतक पूर्ण केले आणि लाबुशेनने ११० चेंडूत ५८ धावा केल्यानंतर नाबाद राहिला आणि संघाला विजयाकडे नेले. याशिवाय हेडने १३७ धावांची शानदार खेळी खेळली, हेडला सामनावीराचा किताब देण्यात आला. दुसरीकडे, विराट कोहलीला टूर्नामेंटचा सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरविण्यात आले. कोहलीने या विश्वचषकात सर्वाधिक धावा करत सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला.

Story img Loader