Ajay Jadeja on Indian Cricket System: भारताच्या युवा संघाने अलीकडेच पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत ऑस्ट्रेलियाचा ४-१ने पराभव केला. या विजयाने चाहते कमालीचे आनंदित असतानाच माजी क्रिकेटपटू अजय जडेजाने भारतीय क्रिकेटमधील संघातील खेळाडूंची निवड आणि संघातून वगळण्याच्या बीसीसीआयच्या धोरणांवर जोरदार टीका केली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत तीन टी-२० सामन्यांनंतर इशान किशनचे नाव प्लेइंग-११ मधून गायब असल्याचे पाहून जडेजाला आश्चर्य वाटले.

इशानने तीन सामन्यांत दोन अर्धशतके झळकावली

वास्तविक, इशानने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेतील तीन सामन्यांमध्ये ३६.६७च्या सरासरीने आणि १४४.७४च्या स्ट्राइक रेटने ११० धावा केल्या होत्या. यामध्ये दोन अर्धशतकांचा समावेश आहे. इशानने पहिल्या दोन सामन्यात अर्धशतके झळकावली होती. मात्र, तिसऱ्या सामन्यात खराब फलंदाजी आणि यष्टिरक्षणानंतर संघ व्यवस्थापनाने त्याला प्लेइंग-११ मधून वगळले. गेल्या दोन सामन्यांमध्ये त्याच्या जागी जितेश शर्मा खेळला. नॅशनल क्रिकेट अकादमीचे संचालक व्हीव्हीएस लक्ष्मण यांना ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी प्रशिक्षकाची भूमिका देण्यात आली होती.

IND vs AUS Paine criticism of Gautam Gambhir ahead Border Gavaskar Trophy
IND vs AUS : ‘… तो भारतीय क्रिकेट संघासाठी योग्य नाही’, रिकी पॉन्टिंगनंतर टिम पेनने गौतम गंभीरवर साधला निशाणा
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Sachin Tendulkar Cryptic post about Steve Bucknor
Sachin Tendulkar : सचिन तेंडुलकरच्या ‘त्या’ पोस्टने चाहत्यांच्या वाईट आठवणी झाल्या ताज्या, ‘हा’ अनुभवी अंपायर पुन्हा आला चर्चेत
uddhav thackeray replied to devendra fadnavis dharmayudhha criticism
“आधी स्वत:चं जॅकेट सांभाळा, मग धर्मयुद्ध करा”, उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना टोला!
bjp leader Kiren rijiju
“राहुल गांधी अजुनही अपरिपक्व नेते”, संसदीय कार्यमंत्री किरण रिजिजू यांची टीका
Tilak Varma Statement on Maiden T20I Century Flying Kiss Celebration He Said It is For Suryakumar Yadav Gives credit to him IND vs SA
IND vs SA: तिलक वर्माने शतकानंतर कोणाला फ्लाईंग किस दिला? सामन्यानंतर स्वत:च सांगितलं…
Tilak Verma becomes 2nd youngest player to score a T20I century for India
Tilak Verma : तिलक वर्माने वादळी शतक झळकावत घडवला इतिहास, भारतासाठी ‘हा’ खास पराक्रम करणारा ठरला दुसरा खेळाडू
What Prakash Ambedkar Said?
Prakash Ambedkar : राहुल गांधींवर टीका करताना प्रकाश आंबेडकरांची जीभ घसरली, अपशब्द वापरत म्हणाले, “ते आपल्याला..”

हेही वाचा: Warner vs Johnson: जॉन्सनच्या वॉर्नरवरील टीकेला ऑस्ट्रेलियन निवड समितीने दिले प्रत्युत्तर; म्हणाले, “कोणाची पात्रता किती…”

अजय जडेजा बीसीसीआय आणि संघ व्यवस्थापनावर संताप व्यक्त केला

इशान किशनला विश्वचषकात फक्त दोन सामन्यात खेळवले होते. तसेच, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दोन सामन्यानंतर इशानला बाकावर बसवल्यामुळे केल्यामुळे, अजय जडेजा प्रचंड संतापला होता. इशानला आयसीसी विश्वचषक स्पर्धेत केवळ दोन सामने खेळण्याची संधी मिळाली. जडेजा म्हणाला, “भारतीय क्रिकेटमध्ये बाहेर बसवणे खूप सोपे आहे. निवडीचा फारसा विचार कोणी करत नाही. इथे रिजेक्शन आहे, सिलेक्शन नाही आणि हे अनेक दशकांपासून सुरु आहे. आम्ही नुकतीच पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळली. इशान किशनला केवळ तीन सामने मिळाले. मला तो खेळाडू आवडतो कारण, तो एकदिवसीय सामन्यांमध्ये भारतासाठी द्विशतक झळकावणाऱ्या मोजक्या खेळाडूंपैकी एक आहे.”

जडेजाने संघ व्यवस्थापनाला प्रश्न विचारले

जडेजा पुढे म्हणाला, “मानसिक आणि शारीरिक थकव्यामुळे त्याला परत पाठवले होते? तीन सामने खेळून तो खरोखरच इतका थकला होता का की, त्याला विश्रांती देण्यात आली? हा खूप मोठा चर्चेचा विषय आहे. गेल्या दोन वर्षांपासून भारतीय संघ व्यवस्थापन त्याची ट्रायल घेण्यात व्यस्त आहे. तुम्ही त्याची सतत परीक्षा घेत राहिल्यास तो संघाचा भाग कसा बनवणार? इशानने गेल्या दोन वर्षात किती सामने खेळले आहेत? टीम इंडियाची ही समस्या आजची नाही, खूप जुनी आहे. आम्ही खेळाडूंची योग्य निवड करत नाही पण त्यांना सहज बाहेर काढतो. यामुळेच मोठ्या स्पर्धांमध्ये संघाचे नुकसान होते.”

हेही वाचा: भारताविरुद्धची मालिका बॅझबॉलची खरी कसोटी! इंग्लंडचा मुख्य प्रशिक्षक ब्रेंडन मॅककलमचे मत

इशानने ५८ आणि ५२ धावांची खेळी खेळली

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत इशान किशन तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करत होता. यशस्वी जैस्वाल आणि ऋतुराज गायकवाड यांच्यावर सलामीची जबाबदारी देण्यात आली. इशानला वगळून संघ व्यवस्थापनाने तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या श्रेयस अय्यरला संधी दिली. किशनला तिसऱ्या टी-२०मध्ये खातेही उघडता आले नाही. किशनने याआधी विशाखापट्टणममध्ये ३९ चेंडूत ५८ धावांची दमदार खेळी करत मालिकेची सुरुवात केली होती. यानंतर त्याने तिरुअनंतपुरममधील दुसऱ्या टी-२० सामन्यात ३२ चेंडूत ५२ धावांची शानदार खेळी केली. अजय जडेजा म्हणाला, “इशान किशनला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच सामन्यांची संपूर्ण टी-२० मालिका खेळायला मिळाली नाही. हे असेच चालू राहिल्यास, तो पूर्णपणे तयार असल्याची खात्री तुम्ही कशी कराल?” असा प्रश्न विचारात संताप व्यक्त केला.