वृत्तसंस्था, हॅम्बर्ग (जर्मनी)

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुढील वर्षी जून-जुलैमध्ये जर्मनी येथे होणाऱ्या युरो अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेची कार्यक्रमपत्रिका शनिवारी जाहीर करण्यात आली. गतविजेते इटली, दोन वेळचे विजेते स्पेन आणि गतवर्षीच्या विश्वचषकातील उपविजेते क्रोएशिया या बलाढय़ संघांचा समावेश असलेला ब-गट हा ‘ग्रुप ऑफ डेथ’ म्हणजेच सर्वात अवघड गट मानला जात आहे. या गटात अल्बेनियाचाही समावेश आहे.

यजमान जर्मनीच्या संघाने गेल्या काही काळात निराशाजनक कामगिरी केली आहे. मात्र, नवे प्रशिक्षक ज्युलियन नागेल्समन यांच्या मार्गदर्शनाखाली मायदेशात होणाऱ्या युरो स्पर्धेत चमकदार कामगिरीचा जर्मनीचा मानस आहे. जर्मनी संघाचा अ-गटात समावेश असून त्यांना स्कॉटलंड, हंगेरी आणि स्वित्र्झलडचे आव्हान असेल.

त्याचप्रमाणे १९६६ सालापासून मोठय़ा स्पर्धेत विजेतेपदाच्या शोधात असलेल्या इंग्लंडला क-गटात डेन्मार्क, स्लोव्हेनिया आणि सर्बियाचा सामना करावा लागेल. २०२१मध्ये झालेल्या गेल्या स्पर्धेत इंग्लंडला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. आता विजेतेपद मिळवण्यासाठी इंग्लंडचा संघ सज्ज असल्याचे प्रशिक्षक गॅरेथ साऊथगेट यांनी नमूद केले.

हेही वाचा >>>IND vs AUS 5th T20 : भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या तोंडचा घास हिरावला, रोमहर्षक सामन्यात सहा धावांनी विजयी

युरो स्पर्धेला पुढील वर्षी १४ जूनपासून सुरुवात होणार असून सलामीची लढत जर्मनी आणि स्कॉटलंड यांच्यात रंगणार आहे. अंतिम लढत १४ जुलै रोजी बर्लिनच्या ऑलिम्पियास्टेडियोनमध्ये खेळवली जाणार आहे. या स्पर्धेसाठी आतापर्यंत २४ पैकी २१ संघ निश्चित झाले असून उर्वरित तीन संघ पुढील वर्षी मार्चमध्ये होणाऱ्या पात्रता फेरीनंतर मिळतील. 

’ अ गट : जर्मनी (यजमान), स्कॉटलंड, हंगेरी, स्वित्र्झलड

’ क गट : स्लोव्हेनिया, डेन्मार्क, सर्बिया, इंग्लंड

’ ड गट : प्ले-ऑफ विजेता ‘अ’ (पोलंड/वेल्स/फिनलंड/इस्टोनिया), नेदरलँड्स, ऑस्ट्रिया, फ्रान्स.

’ इ गट : बेल्जियम, स्लोव्हाकिया, रोमानिया, प्ले-ऑफ विजेता ‘ब’ (इस्रायल/बोस्निया/युक्रेन/आईसलँड)

’ फ गट : तुर्की, प्ले-ऑफ विजेता ‘क’(जॉर्जिया/ग्रीस/कझाकस्तान/

लक्समबर्ग), पोर्तुगाल, चेक प्रजासत्ताक

’ ब गट : स्पेन, क्रोएशिया, इटली, अल्बेनिया

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The schedule of next year euro football tournament has been announced sport news amy