ICC Men’s World Cup 2023 Full Schedule Announced: आयसीसी वन डे विश्वचषक २०२३ च्या वेळापत्रकाची प्रतीक्षा आज संपली आहे. टूर्नामेंट सुरू होण्याच्या अगदी १०० दिवस आधी म्हणजेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) आज वेळापत्रक जाहीर करण्यात आले. मुंबईत सकाळी ११.३० वाजता बीसीसीआयने एक पत्रकार परिषद घेत विश्वचषक २०२३चे वेळापत्रक जाहीर केले. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या निमंत्रणानुसार हा कार्यक्रम मुंबईतील एस्टर बॉलरूम, सेंट रेजिस, लोअर परेल येथे संपन्न झाला. भारत-पाकिस्तान हा बहुचर्चित महामुकाबला अहमदाबादमध्येच खेळवण्यात येणार आहे.

अहवालात असा दावा करण्यात आला आहे की भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) या स्पर्धेसाठी प्रस्तावित सामने आणि स्थळांची रूपरेषा देणारा मसुदा वेळापत्रक जूनमध्ये देशांना पाठवला होता. मात्र, या मसुद्यावर पाकिस्तानने खोडा घातला होता. मसुद्यानुसार, सलामीचा सामना ५ ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर क्रिकेटच्या या कुंभमेळ्याला सुरुवात होणार आहे, ज्यामध्ये गतविजेत्या इंग्लंडचा उपविजेता न्यूझीलंडशी सामना होणार आहे. तर, अंतिम सामना १९ नोव्हेंबरला खेळवला जाईल.

Maharashtra Kesari 2025 Kustigir Parishad Offical Sandip Bhondave Statement on Shivraj Rakshe and Mahendra Gaikwad
Maharashtra Kesari 2025: “रिप्लेमध्ये दिसतंय पंचांचा निर्णय चुकलाय पण…”, महाराष्ट्र केसरीमधील वादानंतर परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचं मोठं वक्तव्य
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Union Budget 2025 nirmala sitharaman sensex
Union Budget 2025 Highlights : “देशावर ६० वर्षे राज्य करूनही, काँग्रेस ५ लाखांपेक्षा जास्त उत्पन्नावर कर सवलत…”, काँग्रेसच्या टीकेवर भाजपाचा पलटवार
Narendra Modi
Narendra Modi : देश आता ‘मिशन मोड’मध्ये; अर्थसंकल्पाच्या आधीच मोदींनी सांगितली विकसित भारतासाठी त्रिसुत्री!
Champions Trophy opening ceremony to be held in Lahore sports news
चॅम्पियन्स करंडक स्पर्धेचे उद्घाटन तीन दिवस आधीच? सोहळा लाहोरला घेण्याची योजना
All-party meetings in Parliament
अर्थअधिवेशन आजपासून, पहिला टप्पा १३ फेब्रुवारीपर्यंत; अर्थसंकल्पाबाबत उत्सुकता
ISS Mahakumbh
Mahakumbh 2025 : लखलखता महाकुंभ! रात्रीच्या अंधारात उजाळून निघालीय गंगा नदी; अंतराळातून काढलेले फोटो तर पाहा!
Mumbai eligibility changes for postgraduate medical courses State Board announced third round schedule
वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशाचे पुन्हा वेळापत्रक बदलले

उपांत्य फेरीचे सामने मुंबई आणि कोलकाता येथे होणार आहेत

विश्वचषकादरम्यान, ४५ सामन्यांचा समावेश असलेल्या राउंड रॉबिन लीगमध्ये १० संघ एकमेकांशी स्पर्धा करतील. यानंतर उपांत्य फेरी आणि अंतिम फेरी खेळली जाईल. पहिला उपांत्य सामना १५ नोव्हेंबरला मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर तर दुसरा उपांत्य सामना १६ नोव्हेंबरला कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर खेळवला जाईल. जर भारत उपांत्य फेरीसाठी पात्र ठरला तर त्याचा उपांत्य सामना मुंबईत होईल. वेळापत्रकानुसार भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लीग सामना १५ ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे.

वानखेडे स्टेडियमवर २०११च्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्याचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने २८ वर्षांनंतर एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचे विजेतेपद मिळवण्यासाठी श्रीलंकेचा पराभव केला होता. तसे, १९८७च्या स्पर्धेत ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील विजेतेपदाचा सामना ईडन गार्डनने आयोजित केला होता जो ऑस्ट्रेलियाने जिंकला होता.

अहमदाबादमध्ये खेळण्यास पाकिस्तान बोर्डाने सहमती दर्शवली

आधी माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वर्ल्डकपच्या वेळापत्रकात फारसा बदल होणार नाही हे यातून स्पष्ट होते. याशिवाय पाकिस्तानला ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना बंगळुरूमध्ये खेळायचा आहे आणि अफगाणिस्तानविरुद्धचा सामना चेन्नईत होणार आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने या तीन सामन्यांवर आक्षेप घेतल्याचे वृत्त होते. पाकिस्तान आणि भारत यांच्यात अहमदाबादमध्ये स्पर्धा व्हावी अशी पीसीबीची इच्छा नव्हती. तसेच, पीसीबीने ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानच्या सामन्याचे ठिकाण बदलण्याची विनंतीही केली होती. आता बातमी येत आहे की, पाकिस्तानने अहमदाबादमध्ये भारत विरुद्धचा सामना खेळण्यास सहमती दर्शवली आहे.

हेही वाचा: Sarfaraz Khan: सरफराजच्या बचावासाठी MCA उतरली मैदानात म्हणाले, “त्याने कधीही क्रिकेटचा अपमान केला नाही BCCIला…”

संपूर्ण भारतीय संघाचे वेळापत्रक

८ऑक्टोबर वि ऑस्ट्रेलिया चेन्नई

११ ऑक्टोबर वि अफगाणिस्तान दिल्ली १

१५ ऑक्टोबर वि पाकिस्तान अहमदाबाद

१९ ऑक्टोबर वि बांगलादेश पुणे

२२ ऑक्टोबर वि. न्यूझीलंड धरमशाला

२९ ऑक्टोबर वि. इंग्लंड लखनऊ

२ नोव्हेंबर वि. क्वालिफायर २ मुंबई

५ नोव्हेंबर वि. दक्षिण आफ्रिका कोलकाता

११ नोव्हेंबर वि. क्वालिफायर १ बंगळुरू

आयसीसीने २०२३ एकदिवसीय विश्वचषकाचे वेळपत्रक जाहीर केले.

नॉकआउट स्टेज सामने – राखीव दिवस कधी आहेत?

पहिला उपांत्य सामना बुधवारी १५ नोव्हेंबर रोजी मुंबईत तर दुसरा उपांत्य सामना दुसऱ्या दिवशी कोलकाता येथे होणार आहे. दोन्ही उपांत्य फेरीतील सामन्यांसाठी राखीव दिवस असेल. अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर १९ नोव्हेंबर रोजी कुठल्याही कारणास्तव नाही झाला तर त्यासाठी २० नोव्हेंबरला राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. तीनही बाद फेरीचे सामने दिवस-रात्रीचे असतील. स्थानिक वेळेनुसार दुपारी २.०० वाजता सुरू होईल.

सराव सामने आणि स्पर्धेची ठिकाणे

विश्वचषकाचे सामने खेळण्यासाठी एकूण १० स्थळे असतील. हैदराबाद, अहमदाबाद, धरमशाला, दिल्ली, चेन्नई, लखनऊ, पुणे, बंगळुरू, मुंबई आणि कोलकाता आहेत. हैदराबाद व्यतिरिक्त, गुवाहाटी आणि तिरुअनंतपुरममध्ये २९ सप्टेंबर ते ३ऑक्टोबर दरम्यान सराव सामने होणार आहेत.

Story img Loader