IND vs WI 2nd Test: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना पोर्ट ऑफ स्पेन येथील क्वीन्स पार्क ओव्हल मैदानावर खेळला गेला. सामन्याच्या पाचव्या दिवशी पावसामुळे सोमवारी (२४ जुलै) खेळ होऊ शकला नाही. एकही चेंडू शेवटच्या दिवशी टाकता आला नाही. दुसरे सत्र वाहून गेल्यानंतर अंपायरांनी दिवसाचा खेळ रद्द करण्याचा निर्णय घेतला. अशाप्रकारे दुसरी कसोटी अनिर्णित राहिली आणि भारताने वेस्ट इंडीजवर १-०ने मालिका विजय नोंदवला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

दुसरी कसोटी अनिर्णित

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या कसोटीत पाऊस खलनायक ठरला. पोर्ट ऑफ स्पेनमधील क्वीन्स पार्क ओव्हल येथील कसोटी सामन्याच्या पाचव्या दिवसाचा खेळ पावसामुळे पूर्णपणे वाहून गेला. एकही चेंडू टाकता आला नाही. अशा स्थितीत भारताला जवळपास जिंकलेली कसोटी अनिर्णित राहावी लागली. टीम इंडियाने कसोटी मालिका १-० ने जिंकली. भारताने डॉमिनिका येथील पहिली कसोटी एक डाव आणि १४१ धावांनी जिंकली. आता भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात तीन सामन्यांची वन डे मालिका होणार आहे. वन डे मालिकेतील पहिला सामना २७ जुलै रोजी बार्बाडोस येथे होणार आहे.

दुसऱ्या कसोटीत भारताने वेस्ट इंडिजसमोर ३६५ धावांचे लक्ष्य ठेवले होते. रविवारचा खेळ संपला तेव्हा वेस्ट इंडिजच्या २ बाद ७६ धावा झाल्या होत्या. पाचव्या आणि शेवटच्या दिवशी त्याला २८९ धावांची गरज होती. त्याचवेळी भारताला विजयासाठी आठ विकेट्सची गरज होती. मात्र, एकही खेळ होऊ शकला नाही. अशा स्थितीत भारताला १-० वर समाधान मानावे लागले. भारताने पहिल्या डावात ४३८ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजचा पहिला डाव २५५ धावांवर आटोपला. अशा स्थितीत टीम इंडियाला १८३ धावांची आघाडी मिळाली. भारताने दुसरा डाव २ बाद १८१ धावा करून घोषित केला आणि एकूण ३६४ धावांची आघाडी घेतली. अशाप्रकारे वेस्ट इंडिजला ३६५ धावांचे लक्ष्य मिळाले.

पाचव्या दिवसाचा खेळ

पाचव्या दिवशी पावसाने कहर केला. रविवारीही पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे पाचव्या दिवशी सामना अर्धा तास आधी नियोजित करण्यात आला. सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता सुरू होणार होता, पण तेव्हापासून मुसळधार पाऊस पडत होता. रात्री ९.३०च्या सुमारास दुपारचे जेवण घेण्यात आले. तोपर्यंत पाऊस थांबला होता आणि कव्हर्स काढली होती. सामना सुरू होणार तेवढ्यात पुन्हा पावसाने हजेरी लावली आणि खेळपट्टी पुन्हा कव्हर्सने झाकली गेली. यादरम्यान अनेकवेळा पावसाचा हा लपंडाव सुरु होता. असे अनेकवेळा घडले की, कव्हर काढले गेले आणि लगेचच पाऊस सुरू झाला. अशा स्थितीत रात्री उशिरापर्यंत प्रतीक्षा केल्यानंतर अंपायर्सनी पाचव्या दिवसाचा खेळ रद्द करण्याचा निर्णय घेतला. मोहम्मद सिराजला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला आणि रविचंद्रन अश्विन, यशस्वी जैस्वालला सामन्याचे मानकरी म्हणून घोषित करण्यात आले.