२०२० मध्ये ऑस्ट्रेल्यात होणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठी थेट पात्रता ठरलेल्या संघाची घोषणा आयसीसीने केली आहे. आयसीसीने ट्विट करत ही माहिती दिली आहे. बांगलादेश आणि श्रीलंका या संघाना थेट प्रवेश मिळाला नाही. ३१ डिसेंबर २०१८ रोजी आयसीसी क्रमवारीनुसार थेट प्रवेश दिला आहे. यामध्ये यजमान ऑस्ट्रेलियासह पाकिस्तान, भारत, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, वेस्ट इंडिज आणि अफगाणिस्तान यांना अंतिम १२ मध्ये थेट प्रवेश मिळाला आहे. बांगलादेश आणि श्रीलंका या संघाना अन्य सहा संघांसह साखळी फेरीत खेळतील. हे अन्य सहा संघ पात्रता फेरीतील असतील. १८ ऑक्टोबर २०२० ते १५ नोव्हेंबर २०२० या कालावधीत हा रणसंग्राम स्पर्धा रंगणार आहे.

Story img Loader