पीटीआय, नवी दिल्ली

भारतीय कुस्ती महासंघाच्या (डब्लूएफआय) निवडणुकीवर पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाने आणलेली स्थगिती सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी उठवली. त्यामुळे आता ‘डब्लूएफआय’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. निवडणुकीसाठी हंगामी समिती तयारीला लागली असून, निवडणूक निर्णय अधिकारी महेश मित्तल कुमार आज, बुधवारी निवडणुकीची तारीख निश्चित करतील, अशी माहिती हंगामी समितीचे सदस्य भूपेंदरसिंग बाजवा यांनी दिली.

maharashtra vidhan sabha election 2024 uncle dharmarao baba atram vs nephew ambrishrao atram in aheri assembly constituency gadchiroli print politics news
अहेरीत आत्राम काका-पुतण्यात थेट लढत? अपक्षांमुळे प्रस्थापितांच्या मनात धाकधूक…
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Supreme Court On NCP :
Supreme Court : “स्वत:च्या पायावर उभे राहा”, शरद पवारांचे फोटो न वापरण्याची अजित पवारांना सर्वोच्च न्यायालयाची ताकीद
congress mp abhishek manu singhvi remarks on cji chandrachud
चंद्रचूड यांच्या कार्यकाळात सत्तासंघर्षाचा निकाल लांबणीवर पडणे अतर्क्य ; सिंघवी
bombay high court slams bmc officer over cm order
मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला महत्व नाही का? उच्च न्यायालयाची महापालिका प्रशासानाला विचारणा
bombay high ourt remark on delay in building repairing
इमारत दुरुस्तीतील विलंब हा छळच ! उच्च न्यायालयाची टिप्पणी
The Supreme Court directed the Ajit Pawar group from the clock symbols
‘घड्याळ’ न्यायप्रविष्ट असल्याचे जाहीर करा! सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार गटाला पुन्हा बजावले
Supreme Court On Uttar Pradesh Government
Supreme Court : “ही मनमानी…”, बुलडोझर कारवाईवरून योगी सरकारला सर्वोच्च न्यायालयाने फटकारलं; २५ लाखांच्या भरपाईचे आदेश

‘डब्लूएफआय’ आणि कुस्तीगिरांमधील संघर्षांपासून या ना त्या कारणाने प्रत्येकवेळी लांबणीवर पडलेल्या निवडणुकीची सगळी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाने २५ सप्टेंबर रोजी निवडणुकीवर स्थगितीचा आदेश दिला होता. त्यानंतर हंगामी समितीने या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. या याचिकेवरील सुनावणी मंगळवारी पार पडली, तेव्हा न्यायमूर्ती अभय एस. ओका आणि पंकज मित्तल यांच्या खंडपीठाने महासंघाच्या निवडणुकीवरील स्थगिती उठविण्याचा आदेश दिला.

‘‘न्यायालयाच्या निर्णयानंतर माझे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांशी बोलणे झाले असून, ते आदेशाच्या प्रतीची प्रतीक्षा करत आहेत. आता निवडणूक प्रक्रिया नव्याने केव्हापासून राबवायची याबाबतच निर्णय सर्वस्वी त्यांच्यावर अवलंबून असेल. बुधवारी या संदर्भात ते निर्णय घेतील असा अंदाज आहे,’’ असे भूपेंदरसिंग बाजवा यांनी सांगितले.

हेही वाचा >>>IND vs AUS 3rd T20 : मॅक्सवेलच्या शतकी खेळीपुढे भारतीय गोलंदाज भुईसपाट, पाच गडी राखून ऑस्टेलियाचा रोमहर्षक विजय

कुस्तीगिरांनी ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात आंदोलन पुकारल्यानंतर भारतीय ऑलिम्पिक संघटनेने ‘डब्ल्यूएफआय’चे कामकाज पाहण्यासाठी हंगामी समितीची २७ एप्रिल रोजी नियुक्ती केली होती. ‘‘आम्ही निवडणुकीला तयार आहोत. निवडणुकीला आधीच उशीर झाला असून, आंरतराष्ट्रीय संघटनेने ‘डब्लूएफआय’वर बंदीही आणली आहे. परंतु आता ही निवडणूक पार पडेल असा विश्वास आहे,’’ असे बाजवा यांनी म्हटले आहे. सर्वसाधारणपणे आदेश आल्यानंतर हंगामी समिती ४५ दिवसांत निवडणूक घेईल अशी अपेक्षा वर्तवण्यात येत आहे.

निवडणूक प्रक्रियाच स्थगित का?

हरियाणा कुस्ती संघटनेने मतदान अधिकाराची मागणी करताना केलेल्या याचिकेचा दाखला देताना पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाने कुस्ती महासंघाची निवडणूक प्रक्रिया स्थगित केली होती. मात्र, एका याचिकेसाठी संपूर्ण निवडणूक प्रक्रिया कशी रोखली जाऊ शकते हे समजू शकले नसल्याचे न्यायमूर्ती अभय एस. ओका आणि पंकज मित्तल यांच्या खंडपीठाने नमूद करताना ही स्थगिती उठवली. त्याच वेळी प्रलंबित याचिकेवरील निर्णयाचा निवडणुकीवर परिणाम होऊ शकेल अशी पुष्टीही खंडपीठाने दिली आहे.