Sri Lankan cricketer Muttiah Muralitharan: श्रीलंकेचा महान खेळाडू मुथय्या मुरलीधरनच्या जीवनावर बनत असलेल्या बायोपिक चित्रपट ‘800’चा ट्रेलर ५ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा टीझर आज रिलीज झाला आहे, तर ट्रेलर सचिन तेंडुलकर मुंबईत लॉन्च करणार आहे. या चित्रपटात मुरलीधरनची भूमिका अभिनेता मधुर मित्तल करत आहे, ज्याने स्लमडॉग मिलेनियर या ऑस्कर विजेत्या चित्रपटात काम केले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुथय्या मुरलीधरनचा चित्रपट ‘800’ हा एमएस श्रीपाथी यांनी लिहिला आणि दिग्दर्शित केला आहे. हा चित्रपट ३ भारतीय भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे, ज्यात हिंदी व्यतिरिक्त तामिळ आणि तेलुगूचा समावेश आहे. ट्रेलर लॉन्चच्या निमित्ताने मुरलीधरनच्या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेची माहिती दिली जाईल. रिलीज झालेल्या या चित्रपटाच्या टीझरमध्ये मुरलीधरनच्या आयुष्याशी संबंधित काही महत्त्वाच्या घटना दाखवण्यात आल्या आहेत.

या चित्रपटासाठी सुरुवातीला प्रसिद्ध अभिनेता विजय सेतुपती मुरलीधरनची भूमिका साकारणार होता, पण नंतर विरोध झाल्याने त्यांनी आपले नाव मागे घेतले. मुरलीधरनने आपल्या कारकिर्दीत १३ वेळा सचिन तेंडुलकरला आपला आऊट केले होते. तर मुरलीधरनने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना भारताविरुद्धच खेळला होता. त्याचबरोबर मुथय्या मुरलीधरनने २००५ मध्ये चेन्नई येथील रहिवासी मधिमलर राममूर्तीशी लग्न केले होते.

हेही वाचा – Rahkeem Cornwall: १४० किलो वजनाच्या क्रिकेटपटूचे वादळी शतक! षटकारांचा पाडला पाऊस, पाहा VIDEO

कसोटी क्रिकेटमध्ये ८०० बळी घेणारा पहिला गोलंदाज –

१९९२ मध्ये मुथय्या मुरलीधरनने पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रवेश केला होता. यानंतर मुरलीधरनने १३३ कसोटी सामन्यात २२.७३च्या सरासरीने ८०० बळी घेतले. तो हा कारनामा करणारा जगातील पहिला गोलंदाज आहे. या कालावधीत मुरलीधरनने ६७ वेळा एका डावात ५ आणि २२ वेळा डावात १० विकेट्स घेण्याचा पराक्रम केला होता. याशिवाय ३५० वनडे खेळताना मुरलीधरनने ५३४ विकेट्स घेतल्या आहेत.