वृत्तसंस्था, नवी दिल्ली

भारताचा नवनियुक्त प्रशिक्षक गौतम गंभीरने आपल्या पहिल्याच संघनिवडीत काही आश्चर्यकारक निर्णय घेतले असून श्रीलंका दौऱ्यातील तीन सामन्यांच्या ट्वेन्टी-२० मालिकेसाठी सूर्यकुमार यादवकडे नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली आहे. त्याच वेळी तारांकित अष्टपैलू हार्दिक पंड्याला उपकर्णधारपदापासूनही दूर ठेवण्यात आले आहे. ट्वेन्टी-२० आणि एकदिवसीय अशा दोन्ही संघांच्या उपकर्णधारपदी शुभमन गिलची नियुक्ती करण्यात आली. तसेच एकदिवसीय संघात कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचाही समावेश करण्यात आला आहे.

Jasprit Bumrah and Tabraiz Shamsi have similar T20I stats
Jasprit Bumrah : तबरेझ शम्सीच्या पोस्टने क्रिकेट विश्वाला दिला आश्चर्याचा धक्का! जसप्रीत बुमराहबरोबर घडला असा योगायोग की विश्वासच बसणार नाही
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
IND vs AUS virat Kohli Is Emotional Said Glenn MacGrath Urges Australia to Go Hard on Him in Border Gavaskar Trophy
IND vs AUS: “विराट कोहली भावनिक आहे, त्याचा फायदा…”, ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूने कांगारू संघाला दिला मोलाचा सल्ला
Suryakumar Yadav Speech in dressing room video
Suryakumar Yadav : ‘आता सगळ्यांनी मायदेशात जाऊन…’, दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका जिंकल्यानंतर सूर्याने संघाला दिला महत्त्वाचा सल्ला
Suryakumar Yadav won the hearts of fans video viral
Suryakumar Yadav : याला म्हणतात देशभक्ती… देशाचा अपमान होताना पाहून सूर्यकुमार यादवने केलं असं काही की, तुम्हीही कराल सलाम, पाहा VIDEO
Tim Southee Retirement From Test Cricket After 3 match Home Series Against England Said its tough decision but it is the right one
रोहित-सेहवागपेक्षा सर्वाधिक षटकार लगावणाऱ्या गोलंदाजाने जाहीर केली निवृत्ती, ‘हा’ कसोटी सामना अखेरचा
KL Rahul Injured in Intra Squad Match Simulation Session Perth Walks Off Field for Scanning Ahead Border Gavaskar Trophy IND vs AUS
IND vs AUS: भारताला पर्थ कसोटीपूर्वी मोठा धक्का, केएल राहुलला सराव सामन्यात दुखापत, सोडावं लागलं मैदान!

भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यात प्रत्येकी तीन सामन्यांची ट्वेन्टी-२० आणि एकदिवसीय मालिका खेळणार आहे. ट्वेन्टी-२० मालिकेचे सामने अनुक्रमे २७, २८ आणि ३० जुलैला पालेकेले, तर एकदिवसीय सामने अनुक्रमे २, ४ आणि ७ ऑगस्टला कोलंबो येथे खेळविण्यात येणार आहेत. रियान परागला दोन्ही मालिकांसाठी भारतीय संघात स्थान मिळाले असून श्रेयस अय्यर आणि केएल राहुल यांचा एकदिवसीय संघात समावेश आहे.

रोहित शर्माच्या आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-२० क्रिकेटमधील निवृत्तीनंतर नव्या कर्णधारचा शोध भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सुरू केला होता. गेल्या महिन्यात भारताने ट्वेन्टी-२० विश्वचषक जिंकला आणि यात हार्दिकने महत्त्वाची भूमिका बजावली होती. तसेच या स्पर्धेसाठी त्याच्याकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी होती. त्यामुळे ट्वेन्टी-२० संघाचा नवा पूर्णवेळ कर्णधार म्हणून हार्दिकला पहिली पसंती मिळणे अपेक्षित होते. मात्र, राहुल द्रविडचा कार्यकाळ संपल्यानंतर गंभीरची मुख्य प्रशिक्षकपदी निवड झाली आणि सर्व समीकरणे बदलली.

हेही वाचा >>>ट्वेन्टी२० संघाचे सूर्यकुमारकडे नेतृत्व; हार्दिक उपकर्णधारपदापासूनही दूरच

गेल्या दोन दिवसांत झालेल्या बैठकींनंतर ‘बीसीसीआय’, निवड समिती आणि प्रशिक्षकांनी मिळून ट्वेन्टी-२० संघाच्या कर्णधारपदासाठी सूर्यकुमारला प्राधान्य दिले. ३३ वर्षीय सूर्यकुमारची निवड सध्या केवळ श्रीलंका दौऱ्यासाठी असली, तरी भविष्यातही त्याच्याकडेच ही जबाबदारी कायम राहण्याची दाट शक्यता आहे.

हार्दिकच्या तंदुरुस्तीची निवड समितीला चिंता असल्याचे समजते. याआधी अनेकदा दुखापतीमुळे त्याला महत्त्वाच्या स्पर्धांतून माघार घ्यावी लागली आहे. १ जानेवारी २०२२ पासून भारतीय संघाने एकूण ७९ ट्वेन्टी-२० सामने खेळले असून यापैकी ३३ सामन्यांना हार्दिक मुकला आहे. त्यामुळे निवड समितीने सूर्यकुमारला कर्णधारपद, तर गिलला उपकर्णधारपदासाठी पसंती दिली.

दुसरीकडे, प्रशिक्षक म्हणून गंभीरच्या पहिल्या मालिकेसाठी रोहित आणि विराट यांनी उपलब्ध राहण्याचा निर्णय घेतला आहे. या दोघांचा एकदिवसीय संघात समावेश असून रोहित कर्णधारपदी कायम आहे. यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंतचेही एकदिवसीय संघात पुनरागमन झाले आहे.

तसेच हार्दिक वैयक्तिक कारणास्तव एकदिवसीय मालिकेत खेळणार नसल्याने अष्टपैलू म्हणून मुंबईकर शिवम दुबेला संधी देण्यात आली आहे. दिल्लीकर वेगवान गोलंदाज हर्षिक राणालाही एकदिवसीय संघात स्थान मिळाले आहे.

कर्णधार म्हणून यश…

गेल्या वर्षी एकदिवसीय विश्वचषकानंतर लगेचच झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध ट्वेन्टी-२० मालिकेसाठी सूर्यकुमारची कर्णधारपदी निवड झाली होती. प्रथमच भारतीय संघाचे नेतृत्व करताना सूर्यकुमारने यशस्वी कामगिरी केली होती. भारताने पाच सामन्यांची ही मालिका ४-१ अशी जिंकली होती. त्यानंतर या वर्षाच्या सुरुवातीला दक्षिण आफ्रिका दौऱ्यात सूर्यकुमारच्या नेतृत्वाखाली भारताने दोनपैकी एक ट्वेन्टी-२० सामना जिंकला होता.

देशांतर्गत स्पर्धांतील कामगिरीकडे लक्ष

श्रीलंका दौऱ्यासाठी संघ जाहीर करतानाच ‘बीसीसीआय’ने देशांतर्गत क्रिकेटच्या आगामी हंगामातील खेळाडूंचा सहभाग आणि त्यांची उपलब्धता यावर आपले लक्ष असणार असल्याचेही स्पष्ट केले. ‘बीसीसीआय’चे सचिव जय शहा यांनी याआधीच भारतीय संघाचा भाग नसलेल्या खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळण्याची सूचना केली आहे. त्यांच्या सुचनांकडे दुर्लक्ष केल्याचा इशान किशन आणि श्रेयस अय्यर यांना फटका बसला.