Angelo Mathews Hit Wicket Video Viral : श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यातील एकमेव कसोटी सामन्यात अनुभवी फलंदाज अँजेलो मॅथ्यूजने शानदार शतक झळकावले. त्याने १४१ धावांची शानदार खेळी केली. मॅथ्यूजच्या बळावर श्रीलंकेने सामन्याच्या दुसऱ्या दिवशी पहिल्या डावात सहा विकेट गमावत ४१० धावा केल्या. खेळ संपेपर्यंत त्याच्याकडे २१२ धावांची आघाडी होती. अफगाणिस्तानने पहिल्या डावात १९८ धावा केल्या होत्या. मात्र, सध्या मॅथ्यूजच्या शतकापेक्षाही तो ज्या पद्धतीने बाद झाला त्याचीच अधिक चर्चा आहे.

या सामन्यात मॅथ्यूजशिवाय दिनेश चंडिमलनेही शतक झळकावले. त्याने १०७ धावांची खेळी खेळली. मॅथ्यूज दुसऱ्या दिवशी नाबाद राहून पॅव्हेलियनमध्ये परतेल असे वाटत होते, पण त्याने अशी चूक केली ज्याचा कोणी विचारही केला नसेल. डावाच्या १०२ व्या षटकात मॅथ्यूजने अफगाणिस्तानचा फिरकी गोलंदाज कॅश अहमदच्या चेंडूवर लेग साइडवर चौकार मारला. चेंडू सीमारेषेपलीकडे गेला, पण मॅथ्यूजला आनंद झाला नाही. कारण वास्तविक, फटका मारताना मॅथ्यूजचे शरीरावरील नियंत्रण सुटले आणि तो हिट विकेट आऊट झाला. तो कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत सहा वेगवेगळ्या पद्धतीने आऊट झाला आहे.

Karun Nair Smashed 88 Runs Against Maharashtra in Semi Final Vijay Hazare Trophy Innings
Karun Nair: करूण नायरचं विजय हजारे ट्रॉफीमधील वादळ कायम, सेमीफायनलमध्ये महाराष्ट्राच्या गोलंदाजांना दिवसा दाखवले तारे
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Akash Deep has revealed How Virat Kohli gifted his bat that saved Gabba Test for India
Virat Kohli : ‘मी बॅट मागितली नव्हती, त्यानेच…’, गाबा कसोटी वाचवणाऱ्या आकाशदीपचा विराटच्या बॅटबद्दल मोठा खुलासा
mahesh gaikwad
कल्याण : फरार मारेकऱ्यांना पकडण्यासाठी महेश गायकवाड यांचे २५ हजार रूपयांचे बक्षिस
hasan mushrif ajit pawar (1)
“…तर अजित पवार धनंजय मुंडेंना सोडणार नाहीत”, हसन मुश्रीफांचं वक्तव्य
Virat Kohli Didnt Liked Ambati Rayudu Robin Uthappa Reveals 2019 World Cup Team Selection
Robin Uthappa on Virat Kohli: “विराटला तो आवडत नव्हता”, स्फोटक फलंदाजाला २०१९ च्या वर्ल्डकप संघातून वगळण्याबाबत रॉबिन उथप्पाचा मोठा खुलासा
bjp plan to contest local bodies elections alone after huge success in assembly elections
भाजप शत-प्रतिशतकडे; शिर्डीच्या महाविजयी मेळाव्यात दिशादर्शन; शहांची उपस्थिती
bjp and ajit pawar ncp political conflict over allegations against dhananjay munde
धनंजय मुंडे यांच्या विरोधात भाजपचे सुरेश धस, चित्रा वाघ यांचा बोलविता धनी कोण ?

श्रीलंकेच्या सात फलंदाज झाले आहेत हिट विकेट –

मॅथ्यूजची बॅट स्टंपला लागली आणि त्याल आऊट घोषित केले. श्रीलंकेच्या कसोटी इतिहासात हिट विकेट आऊट होणारा मॅथ्यूज हा सातवा फलंदाज आहे. धनंजय डी सिल्वा आणि रोमेश कालुविथरना हे प्रत्येकी दोन वेळा हिट विकेट आऊट झाले आहेत. अरविंदा डी सिल्वा हा कसोटीत हिट विकेट आऊट होणारा पहिला श्रीलंकेचा फलंदाज होता. १९८५ मध्ये पाकिस्तानविरुद्ध सियालकोटमध्ये तो हिट विकेट आऊट झाला होता. नुवान प्रदीप, अर्जुन रणतुंगा आणि कुमार संगकारा हे देखील प्रत्येकी एकदा हिट विकेट्स झाले आहेत.

हेही वाचा – IND vs ENG : “मला अजूनही आश्चर्य वाटते की…”, दुसऱ्या कसोटीतील खेळपट्टी पाहून सौरव गांगुलीने उपस्थित केला प्रश्न

मॅथ्यूज आणि चंडिमलची २३२ धावांची भागीदारी –

पहिल्या डावात श्रीलंकेची सुरुवात चांगली झाली होती. निशान मदुशंका आणि दिमुथ करुणारत्ने यांनी पहिल्या विकेटसाठी ९३ धावांची भागीदारी केली. नवीद झाद्रानच्या चेंडूवर ३७ धावा करून मधुशंका बाद झाला. कुशल मेडिन्सला (१० धावा) निजात मसूदने पॅव्हेलियनमध्ये पाठवले. करुणारत्ने ७७ धावा करून कॅश अहमदचा बळी ठरला. त्यानंतर मॅथ्यूज आणि चंडीमल यांनी चौथ्या विकेटसाठी २३२ धावांची भागीदारी केली. चंडीमल १०७ धावा करून नवी झाद्रानच्या गोलंदाजीवर बाद झाला. कर्णधार धनंजय डी सिल्वा खाते उघडू शकला नाही आणि धावबाद झाला. सदिरा समरविक्रमा २१ धावांवर नाबाद आहे.

Story img Loader