Babar Azam’s new look Video Viral: पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम तब्बल ४५ दिवसांनंतर आपल्या देशात परतला आहे. पाकिस्तान संघाला या महिन्यात श्रीलंका दौऱ्यावर जायचे आहे, जेथे ते दोन कसोटी सामने खेळणार आहेत. या मालिकेपूर्वी लाहोरमध्ये संघातील खेळाडूंसाठी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. बाबर आझम मंगळवारी शिबिरात सामील झाला. बाबर कॅम्पमध्ये येण्यापूर्वीच त्याच्या नवीन लूकचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
बाबर आझम हजहून पाकिस्तानला परतला –
पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझमचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो त्याच्या आई आणि मित्रांसह हजवरून परतत आहे. व्हिडीओमध्ये बाबर आपल्या आईच्या धैर्याची प्रशंसा करतो आणि म्हणतो की ती कुटुंबासह हजला गेली याचा मला आनंद आहे. दरम्यान, तो अचानक आपल्या डोक्यावरची टोपी काढतो.
बाबरचा नवा लूक चाहत्यांना आवडला –
हजदरम्यान बाबर आझम टक्कल करुन आला आहे. त्याने टोपी काढली, तेव्हा त्याच्या डोक्यावर एक केसही नव्हता. बाबरने त्याचा लूक शेअर केला. यादरम्यान गाडीत बसलेले लोक त्यासा हाजीसाहेब म्हणू चिडवताना दिसतात. हे ऐकून बाबरही हसू लागतो. हा व्हिडीओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाला. बाबरचा हा नवा लूक चाहत्यांना खूप आवडला. बाबर प्रथम हॉवर्डच्या दौऱ्यावर होता आणि नंतर कुटुंबासह हजला गेला होता. सुमारे ४५ दिवसांनंतर तो पाकिस्तानात परतला असून आता तो श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे.
बाबर आझम पुनरागमनासाठी सज्ज –
बाबर आझमचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये तो त्याच्या घरी बसून क्रिकेट किट उघडत आहे. बऱ्याच दिवसांनी बाबर हातात बॅट घेऊन खूप खुश दिसत होता. बाबरसाठी येणारा महिना अत्यंत व्यस्त असणार आहे. द्विपक्षीय मालिकेशिवाय आशिया चषक आणि भारतात होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेतही तो सहभागी होणार आहे.