Ronaldo Nazario saying that he does not know Virat Kohli : विराट कोहली हा जगभरातील सर्वाधिक फॉलो केल्या जाणाऱ्या खेळाडूंपैकी एक आहे. पोर्तुगालचा महान स्ट्रायकर ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि अर्जेंटिनाचा विश्वविजेता कर्णधार लिओनेल मेस्सी यांच्यानंतर तो सर्वाधिक फॉलो केला जाणार खेळाडू आहे. सर्च इंजिन दिग्गज गुगलच्या संपूर्ण २५ वर्षांच्या इतिहासात सर्वाधिक सर्च करण्यात आलेल्या क्रिकेटपटूंमध्ये तो अव्वल ठरला आहे. आता तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, जेव्हा एका फुटबॉलपटूला विराटबद्दल विचारण्यात आले, तेव्हा त्याने त्याला ओळखण्यास नकार दिला.
रोनाल्डोने विराट कोहलीला ओळखले नाही –
ब्राझीलचा माजी दिग्गज फुटबॉलपटू रोनाल्डो नाझारियोचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तो विराट कोहलीच्या जबरा फॅनसोबत दिसला ‘आय शो स्पीड’ जो वर्ल्ड कप २०२३ दरम्यान व्हायरल झाला होता. विराट कोहलीच्या या विदेशी चाहत्याबरोबरच्या व्हिडीओमध्ये दिग्गज फुटबॉलपटूने आपण विराट कोहलीला ओळखत नसल्याचे म्हटले आहे.
स्पीडने विचारले: तुम्ही विराट कोहलीला ओळखता का?
रोनाल्डोने: कोण विराट कोहली?
स्पीड : विराट कोहली, भारताकडून.
रोनाल्डो : नाही.
स्पीड : तुम्ही विराट कोहलीला ओळखत नाही!
रोनाल्डो : ते काय आहे? एक खेळाडू?
स्पीड : तो क्रिकेटपटू आहे.
रोनाल्डो : तो येथे फारसा लोकप्रिय नाही.
आश्चर्यचकित होऊन, स्पीडने त्याच्या फोनवर विराट कोहलीचा फोटो रोनाल्डोला दाखवला आणि म्हणाला: होय, होय. तो सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू आहे. तुम्ही या व्यक्तिला कधी पाहिलं नाही का?
रोनाल्डोने : हा.
हेही वाचा – IND vs AFG 1st T20 Live : टी-२० विश्वचषकाच्या रंगीत तालमीत टीम इंडिया आज करणार अफगाणिस्तानशी दोन हात
सोशल मीडियावर चाहते संतापले –
यानंतर सोशल मीडियावर लोकांनी ब्राझीलचा दिग्गज फुटबॉलपटू रोनाल्डोला ट्रोल करण्यास सुरुवात केली. इन्स्टाग्राम आणि एक्स या दोन्ही ठिकाणी कोहलीचे चाहते संतापले. लोक विचारू लागले की रोनाल्डो कोण? कोणीतरी असेही लिहिले की तो फक्त एक रोनाल्डो ओळखतो आणि तो म्हणजे ख्रिस्तियानो रोनाल्डो. तसेच, काही लोकांनी समजूतदार कमेंट्स केल्या आणि लिहिलं की असं नाही, ब्राझील हे क्रिकेटसाठी प्रचलित नसून फुटबॉलसाठी प्रसिद्ध असलेले राष्ट्र आहे. त्यामुळे रोनाल्डो विराटला ओळखत नसेल तर ही काही मोठी गोष्ट नाही.
हेही वाचा – IND vs AFG : अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी रोहित-विराटसाठी आखली खास योजना, प्रशिक्षकाने केला खुलासा
उल्लेखनीय म्हणजे अशाच प्रकारे रशियन टेनिस स्टार मारिया शारापोव्हाला एकदा महान सचिन तेंडुलकरबद्दल विचारण्यात आले होते. त्यावेळी शारापोव्हाने सचिनला ओळखत नसल्याचे म्हटले होते. यानंतर शारापोव्हाला मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले. तथापि, येथे एक गोष्ट नमूद करणे आवश्यक आहे की रशिया आणि ब्राझील हे दोन्ही देश असे आहेत, जेथे क्रिकेट हा खेळ फारसा लोकप्रिय नाही.