महिला टी-२० विश्वचषक २०२२ मध्ये भारताने विजयाने सुरुवात केली आहे. भारताने पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा ७ विकेट्सने धुव्वा उडवला. पाकिस्तानने भारताला १५० धावांचे लक्ष्य दिले होते. जे भारताने १९ षटकांत ३ विकेट्स गमावून पूर्ण केले. जेमिमाह रॉड्रिग्जने शानदार अर्धशतकी खेळी खेळली. त्याचवेळी ऋचा घोषने तिला चांगली साथ दिली. या विजयानंतर जेमिमा रॉड्रिग्ज आणि ऋचा घोषसह टीम इंडियाने एकच जल्लोष केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

१९व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर जेमिमाहला अर्धशतक पूर्ण करण्यासाठी एका धावेची गरज होती. तिने चौकार मारून आपले अर्धशतकही पूर्ण केले आणि टीम इंडियाला विजय मिळवून दिला. त्याचबरोबर जेमिमाच्या टी-२० कारकिर्दीतील हे १०वे अर्धशतक होते.

जेमिमा ३८ चेंडूत ५३ धावांवर नाबाद राहिली. त्याचबरोबर ऋचानने २० चेंडूत नाबाद ३० धावा केल्या. जेमिमाहने आपल्या डावात चार चौकार मारले, तर रिचाने पाच चौकार मारले. दोघींमध्ये चौथ्या विकेटसाठी नाबाद ५८ धावांची भागीदारी झाली. त्यामुळे भारतीय संघाने १९ षटकांत ३ बाद १५१ धावा केल्या. याबरोबरच जेमिमाला सामनावीर म्हणूनही गौरविण्यात आले. पाकिस्तानकडून गोलंदाजी करताना नशरा संधूने दोन आणि सादिया इक्बालने एक विकेट घेतली.

हेही वाचा – INDW vs PAKW: सिद्रा आमीनने सीमारेषेवर हवेत झेपावत पकडला अप्रतिम झेल, पाहा VIDEO

तत्पुर्वी पाकिसतान संघान प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत ४ बाद १४९ धावा केल्या होत्या. बिस्माहने आयशासोबत पाचव्या विकेटसाठी ४७ चेंडूत नाबाद ८१ धावांची भागीदारी केली. बिस्माहने ५५ चेंडूत ६८ धावांची नाबाद खेळी खेळली. तिने आपल्या खेळीत सात चौकार मारले. त्याचवेळी आयशाने २५ चेंडूत ४३ धावांची नाबाद तुफानी खेळी केली. आपल्या खेळीत तिने दोन चौकार आणि दोन षटकार मारले. भारताकडून राधा यादवने सर्वाधिक विकेट्स घेतल्या.