क्रिकेटचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या २००व्या आणि अखेरच्या कसोटी सामन्याच्या ऑनलाईन तिकीट विक्रीला सोमवारी अकरा वाजल्यापासून सुरुवात झाली खरी पण एकाचवेळी अनेकांनी kyazoonga.com या संकेतस्थळावर तिकीट खरेदीसाठी ‘लॉग ईन’ केल्याने संकेतस्थळ बंद पडले. या संकेतस्थळावर जाताच ‘सर्व्हर’ व्यस्त असल्याचे दिसते आहे.
कसोटीनंतर एमसीएकडून सचिनचा सत्कार
मुंबई क्रिकेट असोसिएशनने या कसोटीसाठी खास सचिनचे छायाचित्र आणि त्याच्या विक्रमांची माहिती देणारी तिकीटे छापली आहेत. सामन्याचे विशेष तिकीट तब्बल १०,००० रुपयांचे आहे. वानखेडे स्टेडियमची आसनक्षमता सुमारे ३३,००० असली, तरी केवळ साडेतीन ते चार हजार तिकीटे सामान्य प्रेक्षकांसाठी उपलब्ध आहेत.
सचिननेच सुचविले होते धोनीचे नाव- शरद पवार
संकेतस्थळावर १००० आणि २५०० रुपयांची तिकीटे उपलब्ध असून एका व्यक्तीला केवळ दोनच तिकिटे खरेदी करता येणार होती. वानखेडेवर उपस्थित राहून सचिनचा अखेरचा सामना प्रत्यक्षात पाहण्याची उत्सुकता असल्याने संकेतस्थळावरील तिकीट विक्रीला सुरुवात होताच संकेतस्थळ बंद पडले.
शेवटच्या श्वासापर्यंत सचिनप्रेमाचा वसा जपेन!
फोटो गॅलरी: …अन् शेवट गोड व्हावा
सचिनची २००वी कसोटी: ऑनलाईन तिकीट विक्रीचे संकेतस्थळ ‘क्रॅश’
एकाचवेळी अनेकांनी kyazoonga.com या संकेतस्थळावर तिकीट खरेदीसाठी 'लॉगइन' केल्याने संकेतस्थळ बंद पडले आहे.
First published on: 11-11-2013 at 11:30 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The website selling tickets for sachin tendulkars 200th test crashed due to heavy traffic