क्रिकेटचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या २००व्या आणि अखेरच्या कसोटी सामन्याच्या ऑनलाईन तिकीट विक्रीला सोमवारी अकरा वाजल्यापासून सुरुवात झाली खरी पण एकाचवेळी अनेकांनी kyazoonga.com या संकेतस्थळावर  तिकीट खरेदीसाठी ‘लॉग ईन’ केल्याने संकेतस्थळ बंद पडले. या संकेतस्थळावर जाताच ‘सर्व्हर’ व्यस्त असल्याचे दिसते आहे.
कसोटीनंतर एमसीएकडून सचिनचा सत्कार
मुंबई क्रिकेट असोसिएशनने या कसोटीसाठी खास सचिनचे छायाचित्र आणि त्याच्या विक्रमांची माहिती देणारी तिकीटे छापली आहेत. सामन्याचे विशेष तिकीट तब्बल १०,००० रुपयांचे आहे. वानखेडे स्टेडियमची आसनक्षमता सुमारे ३३,००० असली, तरी केवळ साडेतीन ते चार हजार तिकीटे सामान्य प्रेक्षकांसाठी उपलब्ध आहेत.
सचिननेच सुचविले होते धोनीचे नाव- शरद पवार
संकेतस्थळावर १००० आणि २५०० रुपयांची तिकीटे उपलब्ध असून एका व्यक्तीला केवळ दोनच तिकिटे खरेदी करता येणार होती. वानखेडेवर उपस्थित राहून सचिनचा अखेरचा सामना प्रत्यक्षात पाहण्याची उत्सुकता असल्याने संकेतस्थळावरील तिकीट विक्रीला सुरुवात होताच संकेतस्थळ बंद पडले.
शेवटच्या श्वासापर्यंत सचिनप्रेमाचा वसा जपेन!
फोटो गॅलरी: …अन् शेवट गोड व्हावा
 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा