WPL 2024 to be held in Delhi Bangalore : महिला प्रीमियर लीग २०२४ (डब्ल्यूपीएल) संदर्भात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. महिला प्रीमियर लीगचा पहिला सीझन म्हणजे डब्ल्यूपीएल २०२३ स्पर्धा मुंबईत आयोजित केली होती. स्पर्धेतील सर्व २२ सामने मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियम आणि नवी मुंबईतील डीवाय पाटील स्पोर्ट्स अकादमी येथे खेळले गेले होते. पण आता मीडिया रिपोर्ट्समधून मिळालेल्या माहितीनुसार या स्पर्धेचा दुसरा हंगाम बंगळुरू आणि दिल्ली येथे खेळवला जाईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘ईएसपीएनक्रिकइंन्फो’च्या अहवालानुसार, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) डब्ल्यूपीएल २०२४ च्या आयोजनासाठी दिल्ली आणि बंगळुरू या ठिकाणांची निवड केली आहे. स्पर्धेचा पहिला टप्पा बंगळुरू येथे खेळवला जाणार आहे. याशिवाय, नॉकआऊट सामन्यांसह स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्याचे सामने दिल्लीत होणार आहेत. आयपीएल २०२४ साठी खेळपट्ट्या फ्रेश ठेवण्यासाठी हे केले जात आहे. आयपीएलचा आगामी हंगाम २२ मार्चपासून खेळवला जाणार आहे.

महिला प्रीमियर लीग २०२४ सुरू होण्याची तारीखही समोर येत आहे. वृत्तानुसार, बीसीसीआयने यासाठी एक विंडोही निश्चित केली आहे. दुसरा सीझन २२ फेब्रुवारी ते १७ मार्च दरम्यान खेळवला जाऊ शकतो. गेल्या हंगामाप्रमाणेच डब्ल्यूपीएल २०२४ मध्ये पाच संघ सहभागी होणार असून एकूण २२ सामने खेळवले जातील.

हेही वाचा – IND vs AFG : ‘तो टी-२० विश्वचषकातील…’, शिवम दुबेबद्दल सुरेश रैनाची मोठी भविष्यवाणी

पहिल्या सत्रात मुंबई इंडियन्स ठरली होती चॅम्पियन –

डब्ल्यूपीएल २०२४ ची सुरुवात गेल्या वर्षी म्हणजेच २०२३ मध्ये झाली. पहिल्या सत्रात या स्पर्धेत एकूण पाच संघ सहभागी झाले होते. स्पर्धेचा दुसरा हंगामही पाच संघांमध्ये खेळवला जाणार आहे. पहिल्या सत्रात दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स हे संघ अंतिम फेरीत पोहोचले होते.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The womens premier league 2024 season will be played in delhi and bangalore vbm