पीटीआय, राउरकेला
गेल्या वर्षी टोक्यो ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कांस्यकमाई करणारा भारतीय पुरुष संघ आता विश्वचषक हॉकी स्पर्धेतील ४८ वर्षांपासूनचा पदकांचा दुष्काळ संपवण्यासाठी उत्सुक आहे. भारताला सलग दुसऱ्यांदा विश्वचषक हॉकी स्पर्धेच्या यजमानपदाचा मान मिळाला असून या स्पर्धेला शुक्रवारपासून सुरुवात होणार आहे. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी भारतापुढे सलामीला तुल्यबळ स्पेनचे आव्हान असेल.
ऑलिम्पिकमध्ये तब्बल आठ सुवर्णपदके पटकावणारा भारतीय संघ गेल्या जवळपास पाच दशकांपासून विश्वचषकात मात्र पदकापासून वंचित आहे. १९७१च्या पहिल्या विश्वचषकात भारताने कांस्यपदक पटकावले होते. त्यानंतर १९७३च्या पुढील पर्वात भारताने रौप्यपदक जिंकले. त्यानंतर १९७५च्या विश्वचषकात भारताने एक पाऊल पुढे जात जेतेपदावर मोहोर उमटवली होती. परंतु, १९७८ ते २०१८ या कालावधीत भारताला विश्वचषकात साखळी फेरीचा टप्पाही ओलांडता आला नाही. यंदा मात्र भारताकडून अधिक दर्जेदार कामगिरीची अपेक्षा केली जाते आहे.
जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानी असलेल्या भारतीय संघाला विश्वचषकाच्या जेतेपदासाठी दावेदार मानले जात आहे. बचावपटू आणि ड्रॅगफ्लिकर हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाला घरच्या मैदानावर खेळताना चाहत्यांचाही भरघोस पाठिंबा लाभेल. भारतीय संघाने विश्वचषकापूर्वी झालेली ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका १-४ अशी गमावली. मात्र, भारताने जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेल्या ऑस्ट्रेलियाला कडवी झुंज दिली. त्यांना सहा वर्षांत पहिल्यांदा ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळवण्यातही यश आले. त्यामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास वाढलेला आहे.
ग्रॅहम रीड यांची २०१९ मध्ये प्रशिक्षकपदी निवड झाल्यापासून भारतीय हॉकी संघाची कामगिरी उंचावल्याचे पाहायला मिळाले आहे. ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदकासह भारताने प्रो लीग हॉकीच्या २०२१-२२च्या हंगामात तिसरे स्थान मिळवले होते. रीड यांनी खेळाडूंना आत्मविश्वास देताना त्यांच्याकडून सर्वोत्तम कामगिरी करून घेतली आहे. तसेच भारतीय संघ आक्रमक शैलीत खेळत असून तांत्रिकदृष्टय़ा खेळाडूंमध्ये सुधारणा झाली आहे.
यंदाच्या स्पर्धेत भारताचा सलामीचा सामना शुक्रवारी स्पेनशी राउरकेला येथे रंगणार आहे. त्यानंतर भारताचे पुढील साखळी सामने इंग्लंड (रविवार, १५ जानेवारी) आणि वेल्स (गुरुवार, १९ जानेवारी) यांच्याविरुद्ध भुवनेश्वर येथील किलगा स्टेडियमवर होतील. भारताला साखळी फेरीचा अडथळा पार करण्यात यश आल्यास अंतिम आठमध्ये त्यांच्यापुढे गतविजेत्या बेल्जियमचे आव्हान असू शकेल.
ठिकाण : बिरसा मुंडा स्टेडियम, राउरकेला पहिल्या दिवसाचे अन्य सामने
अर्जेटिना वि. दक्षिण आफ्रिका वेळ : दु. १ वा.
ऑस्ट्रेलिया वि. फ्रान्स वेळ : दु. ३ वा.
इंग्लंड वि. वेल्स वेळ : सायं. ५ वा.
वेळ : सायं. ७ वा.
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्टस २, फस्र्ट