‘आयओए’ अध्यक्ष पीटी उषा यांचे खडे बोल

पीटीआय, नवी दिल्ली

लैंगिक शोषणाविरोधात आवाज उठवत दिल्लीतील जंतरमंतर येथे आंदोलन करणाऱ्या आघाडीच्या कुस्तीगिरांना भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या (आयओए) अध्यक्ष पीटी उषा यांनी खडे बोल सुनावले आहेत. रस्त्यावर उतरून आंदोलन करणे हे बेशिस्त वागणुकीचे लक्षण असून त्यामुळे भारताची प्रतिमा डागाळली आहे, असे उषा गुरुवारी म्हणाल्या.

Ajit Pawar on Yogi Adityanath
योगी आदित्यनाथांमुळे अजित पवारांची गोची; मोदी-शाहांची एकही सभा नाही; अस्तित्वाची लढाई राष्ट्रवादी कशी लढणार?
15 November Mesh To Meen Horoscope
१५ नोव्हेंबर पंचांग: कार्तिक पौर्णिमेला कोणाला होईल धनप्राप्ती?…
Nitin Gadkari Umarkhed, Nitin Gadkari Kisan Wankhade,
“काँग्रेसने जातीयवाद आणि सांप्रदायिकतेच विष कालवले,” नितीन गडकरी यांची यवतमाळात टीका
Amit Shah on Uddhav Thackeray
Amit Shah : “उद्धव ठाकरे तुमच्यात दम असेल तर…”, अमित शाहांचं भर सभेत खुलं आव्हान, म्हणाले…
Dhule City Polarization of votes beneficial to any candidate print politics news
लक्षवेधी लढत: धुळे शहर : मतांचे ध्रुवीकरण कोणाला फायदेशीर?
Dhananjay Mahadik On Ladki Bahin Yojana
Dhananjay Mahadik : Video : “लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी काँग्रेसच्या रॅलीत दिसल्या तर..”, भाजपा खासदार धनंजय महाडिकांचं वादग्रस्त विधान
Ajit Pawar on Udyanraje Bhosale
Ajit Pawar: ‘साताऱ्याला पिपाणीनं वाचवलं, नाहीतर…’, अजित पवारांच्या मिश्किल टिप्पणीनं भाजपाचीच कोंडी
Sunil Tatkare on Jayant Patil
“जयंत पाटील आतल्या गाठीचे, त्यांनी…”, अजित पवार गटाकडून टीका; म्हणाले, ‘यावेळी त्यांचा करेक्ट कार्यक्रम करणार’

भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावरील महिला कुस्तीगिरांच्या लैंगिक शोषणाच्या आरोपांच्या चौकशीचा अहवाल सार्वजनिक करणे आणि त्यांच्या अटकेची मागणी करत रविवारपासून आघाडीचे कुस्तीगीर पुन्हा आंदोलन करत आहेत. यामध्ये विनेश फोगट, बजरंग पुनिया आणि साक्षी मलिका या कुस्तीगिरांचाही समावेश आहे.

‘आयओए’च्या कार्यकारी समितीची गुरुवारी बैठक झाली. या बैठकीनंतर उषा यांनी आंदोलनकर्त्यां कुस्तीगिरांना खडे बोल सुनावले. ‘‘कुस्तीगिरांनी आमच्याकडे येण्याऐवजी थेट रस्त्यावर उतरून आंदोलन करणे हे बेशिस्त वागणुकीचे लक्षण आहे. त्यांनी देखरेख समितीचा चौकशी अहवाल समोर येण्याची वाट पाहणे गरजेचे होते. त्यांनी उचललेले पाऊल योग्य नाही. लैंगिक शोषणाच्या तक्रारींसाठी ‘आयओए’ची समिती आणि खेळाडूंचा आयोग आहे. त्यामुळे कुस्तीगिरांनी रस्त्यावर उतरण्यापेक्षा आमच्याकडे येणे आवश्यक होते. जगभरात भारताचे नाव मानाने घेतले जाते. कुस्तीगिरांच्या कृतीमुळे भारताची प्रतिमा डागाळली आहे,’’ अशी तीव्र प्रतिक्रिया उषा यांनी व्यक्त केली.

गुरुवारी झालेल्या बैठकीत ‘आयओए’ने भारतीय कुस्ती महासंघाचे कामकाज पाहण्यासाठी तीन सदस्यीय हंगामी समितीची नेमणूक केली. यात माजी नेमबाज सुमा शिरूर, भारतीय वुशू संघटनेचे अध्यक्ष भुपेंद्र सिंग बाजवा आणि उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश यांचा समावेश आहे. उच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीशांचे नाव उघड करण्यात आले नसले तरी ते या समितीचे अध्यक्षपद भूषवणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी कुस्तीगिरांनी ब्रिजभूषण यांच्यावर केलेल्या आरोपांच्या चौकशीसाठी देखरेख समितीची स्थापना केली होती. मेरी कोमच्या अध्यक्षतेखालील या सहा सदस्यीय समितीने ५ एप्रिल रोजी आपला चौकशी अहवाल क्रीडा मंत्रालयाकडे सादर केला होता. मात्र, क्रीडा मंत्रालयाने हा अहवाल अद्याप सार्वजनिक केलेला नाही.

कुस्तीगिरांना बाजू मांडण्याची पूर्ण संधी -ठाकूर

शिमला : कुस्तीगिरांना देखरेख समितीपुढे त्यांची बाजू मांडण्यासाठी सरकारने पूर्ण संधी दिली होती आणि या प्रकरणाच्या निष्पक्ष चौकशीसाठी सर्व पावले उचलल्याचे केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर गुरुवारी म्हणाले. ‘‘जंतरमंतर येथे आंदोलन करणाऱ्या कुस्तीगिरांशी मी चर्चा केली होती. मी पहिल्या दिवशी सात तास, मग दुसऱ्या दिवशी पाच तास त्यांच्यासोबत होतो. त्यांच्या तक्रारी ऐकल्यानंतर मी रात्री २-२.३० वाजता पत्रकार परिषद घेतली होती आणि देखरेख समितीची स्थापना केली होती. कुस्तीगिरांनी आम्हाला एक सदस्य वाढवण्यास सांगितल्यावर आम्ही बबिता फोगटचा समावेश केला. आम्ही निष्पक्ष चौकशीसाठी सर्व पावले उचलली. कुस्तीगिरांना देखरेख समितीपुढे बाजू मांडण्याची पूर्ण संधी दिली. आम्ही चौकशीसाठीचा कालावधी वाढवला. आम्ही आमच्या परीने सर्व गोष्टी केल्या,’’ असे ठाकूर म्हणाले.

‘आयओए’ अध्यक्ष पीटी उषा यांच्याकडून आम्हाला अशा प्रकारच्या विधानाची अपेक्षा नव्हती. त्या माजी खेळाडू आहेत. स्वत: महिला आहेत. त्यामुळे त्या आम्हाला समर्थन आणि पाठिंबा देतील अशी आम्हाला अपेक्षा होती. –बजरंग पुनिया