Sourav Ganguly On India vs Pakistan ODI World Cup Match: विश्वचषक २०२३चे वेळापत्रक जाहीर झाले आहे. भारतीय संघ आपल्या विश्वचषक मोहिमेची सुरुवात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्याने करणार आहे. भारत-ऑस्ट्रेलिया सामना ८ ऑक्टोबर रोजी चेन्नई येथे होणार आहे, दुसरीकडे बहुचर्चित भारत आणि पाकिस्तानचे संघ १५ ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आमनेसामने येतील. मात्र, भारत-पाकिस्तान सामन्यावर भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने मोठे वक्तव्य केले आहे. वास्तविक, गांगुलीचे मत आहे की, “भारत-ऑस्ट्रेलिया सामना भारत-पाकिस्तान सामन्यापेक्षा चांगला आहे.”

भारत-पाकिस्तान सामन्यासाठी लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे, पण गुणवत्ता नाही- गांगुली

आता या सामन्याबाबत भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीचे एक आश्चर्यचकित करणारे विधान समोर आले आहे. सौरवने स्टार स्पोर्ट्सशी बोलताना सांगितले की, “दोन पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये झालेले सर्व सामने भारताने जिंकले आहेत. मात्र, दोन्ही देशांमधील सामन्यांबाबतचा प्रचार, प्रसार, गोंगाट आणि वातावरण निर्मिती यामुळेच तो सामना कायम चर्चेत असतो. मात्र आता गुणवत्तेअभावी दोन्ही देशांमधील स्पर्धेला चांगलाच फटका बसला आहे. भारत आणि पाकिस्तान फक्त आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये एकमेकांविरुद्ध खेळतात, अगदी अलीकडे ऑस्ट्रेलियात झालेल्या टी२० विश्वचषकादरम्यान.”

uddhav thackeray fact check video
“मी गोमांस खातो, काय माझं वाकडं करायचं ते करा” उद्धव ठाकरेंनी दिली जाहीर कबुली? या खोट्या VIDEO ची खरी बाजू पाहा
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Market Technique Stock Market
बाजाराचा तंत्र-कल : शेअर बाजाराला बाळसं की सूज?
maharashtra assembly election 2024 ravindra dhangekar vs hemant rasane kasba peth assembly constituency
धंगेकर-रासने लढतीच्या दुसऱ्या फेरीत कोणाची बाजी?
Political Parties in Maharashtra Vidhan Sabha Election 2024
रविवार प्रचारवार; घरोघरी भेटी, गृहनिर्माण संकुलांना भेटी, चौक सभा यांना जोर
icc cancels november 11 due to bcci and pcb fight over champions trophy schedule
चॅम्पियन्स करंडकाबाबत संभ्रमच! वेळापत्रक घोषणेचा आजचा कार्यक्रम ‘आयसीसी’कडून रद्द
maha vikas aghadi releases manifesto for maharashtra assembly poll 2024
महिला, शेतकऱ्यांवर आश्वासनांची खैरात; मविआचा ‘महाराष्ट्रनामा’ जाहीर
congress mp abhishek manu singhvi remarks on cji chandrachud
चंद्रचूड यांच्या कार्यकाळात सत्तासंघर्षाचा निकाल लांबणीवर पडणे अतर्क्य ; सिंघवी

हेही वाचा: ENG vs AUS: “खेळभावना फक्त काय आम्हालाच…”, माजी खेळाडू गौतम गंभीर ऑस्ट्रेलियन संघावर भडकला

माजी भारतीय संघाचा कर्णधार पुढे म्हणाला, “गेल्या अनेक वर्षांत भारत-पाकिस्तान सामना जवळपास प्रत्येक वेळी एकतर्फी होत असल्याचे आपण पाहिले आहे. भारत-पाकिस्तान सामन्यासाठी लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे, मात्र गेल्या अनेक वर्षांत दर्जेदार सामने झाले नाहीत. भारतीय संघ पाकिस्तानवर वर्चस्व गाजवत आहे. गेल्या वर्षी टी२० विश्वचषकात भारत आणि पाकिस्तानचे संघ आमनेसामने आले होते. उभय संघांमधील सामना शेवटच्या चेंडूपर्यंत गेला, ज्यामध्ये टीम इंडियाने पाकिस्तानचा ४ गडी राखून पराभव केला.”

हेही वाचा: Ravindra Jadeja: चर्चा नव्या 3D प्लेयरची! ऑस्ट्रेलियन दिग्गजाने केली ‘या’ पाकिस्तानी खेळाडूची ‘जड्डू’शी तुलना

भारत-ऑस्ट्रेलियामध्ये रंगणार रोमांचक मुकाबला- सौरव गांगुली

बीसीसीआयचा माजी अध्यक्ष सौरव गांगुलीने २०२१च्या टी२० विश्वचषकाची आठवण करून दिली, जेव्हा या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान आमनेसामने आले होते. त्या सामन्यात बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानी संघाने भारताचा १० गडी राखून पराभव केला होता. २०२३च्या विश्वचषक स्पर्धेत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात मजेशीर सामना होईल, असा विश्वास सौरव गांगुलीने व्यक्त केला आहे. दोन्ही संघांमध्ये दर्जेदार क्रिकेट पाहायला मिळेल. विशेष म्हणजे ८ ऑक्टोबर रोजी भारत-ऑस्ट्रेलिया सामना चेन्नईत होणार आहे. २०२३च्या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा हा पहिलाच सामना असेल.