Ajit Agarkar’s reaction to Hardik Pandya : आयसीसी टी-२० विश्वचषकासाठी भारताचा १५ सदस्यीय संघ ३० एप्रिलला जाहीर करण्यात आला आहे. ज्यामध्ये हार्दिक पंड्याला उपकर्णधार म्हणून नियुक्त केले आहे. हार्दिक पंड्याला उपकर्णधार नियुक्त केल्याने बीसीसीआयवर सोशल मीडियावर सडकून टीका केली होती. आता नुकतीच भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि बीसीसीआयच्या निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांची पत्रकार परिषद पार पडला. या पत्रकार परिषदेत दोघांनीही हार्दिकची निवड का केली आणि त्याला उपकर्णधार का केले, याबद्दल खुलासा केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हार्दिकबद्दल अजित आगरकर काय म्हणाले?

हार्दिकच्या फॉर्मबद्दल विचारल्यावर अजित आगरकर म्हणाले, “उपकर्णधारपदाबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. एक क्रिकेटर म्हणून हार्दिक काय करू शकतो हे आपल्या सर्वांना माहीत आहे. तो कर्णधाराला अनेक पर्यायही देतो आणि दीर्घ विश्रांतीनंतर तो पुनरागमन करत आहे. त्याची रिप्लेसमेंट नाही. तो जे करू शकतो ते आश्चर्यकारक आहे. प्रदीर्घ विश्रांतीनंतर तो संघात येत आहे. आम्हाला आशा आहे की तो त्याच्या दुखापतीवर आणि फॉर्मवर काम करत आहे. विशेषत: तो ज्या पद्धतीने गोलंदाजी करतो, त्यामुळे तो (कर्णधार) रोहितला बराच समतोल राखण्यासाठी पर्याय देईल.”

भारताचा पंधरा सदस्यीय संघ :

रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र यादव चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: There is no replacement for what hardik pandya can do chief selector ajit agarkar statement vbm